व्हीएस न्यूज - सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्यावतीने रविवारी रावेत येथील पवनानदीच्या घाटावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नुकत्याच झालेल्या छट पूजेनंतर या घाटावर मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नदीचा घाट स्वच्छ केला. या अभियानाचे नेतृत्व मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी केले. यावेळी, नगरसेवक नामदेव ढाके, मोरेश्वर भोंडवे, अरविंद पालव, प्रमोद राणे, अंकुशराव साईल, रामकृष्ण राणे, अक्षता पाताडे, सिद्धी चिंदरकर, मनाली पाताडे आदी मान्यवर उपस्थित होते. अभियान यशस्वीतेसाठी ॲड.चंद्रकांत गायकवाड, अरुण दळवी, विश्वास राणे, संजय सावंत, पराग पालकर, शरद कवठणकर, प्रशांत परब, संतोष गावडे, प्रकाश परब, मयुर राणे, नंदकुमार सावंत, एकनाथ गवस बिर्जे, सुजीत पाटील यांनी सहकार्य केले. सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळातर्फे असे अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.