शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर.
मुंबई
2025-06-08
व्हिएसन्युज | प्रतिनिधी | दिनांक ८ जून २०२५ - शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे यांच्या सुचनेनुसार व प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे यांच्या अनुमोदनाने सागर गंगाराम साळुंके यांची अमरावती जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातुन जाहीर केली.
नवनियुक्त अमरावती जिल्हा अध्यक्ष सागर साळुंके यांनी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग, माता भगिनी, दिव्यांग बांधव यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे व उपनेत्या उषामाई कांबळे यांनी दिल्या.