व्हीएस न्यूज- महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कर्जमाफीच्या नावाखाली भाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. छत्रपतींच्या नावाचा गैरवापर करून भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांची पिळवणूक करु नका, असे आवाहन कॉंग्रेसचे चिंचवड विधानसभा ब्लॉक अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप केले. त्यानंतर या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर कर्जाऊ रक्कम जमा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. दिवाळीत बॅंका बंद असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम तांत्रिक कारणामुळे जमा होऊ शकली नाही. आता दिवाळी संपून आठवडा होत आला असला, तरीदेखील शेतकरी बॅंक खात्यावर रक्कम जमा होण्याची वाट पाहत आहेत. ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी भाजप सकरकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करु नये, असे आवाहन केले आहे.