व्हीएस न्यूज - गुजरातमधील दंगलीतील सहभागाबद्दल नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधानपद बक्षीस म्हणून दिले आहे. त्यामुळे सरकारी धोरणांचा समाजावर विपरीत परिणाम होत असल्याची परखड टीका ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केली. ‘हम समाजवादी संस्थाए’तर्फे आयोजित अखिल भारतीय समाजवादी महिला संमेलनात ते बोलत होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर म्हणाल्या, की सामाजिक समस्या, निसर्गाच्या विरोधात जाऊन होणार्या विकास प्रकल्पांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये महिलांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अनेक संघर्षांमध्ये महिल्या आक्रमक राहिल्या आहेत. देशभरात शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना यामध्ये महिला शेतकरी दिसून येत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. पण त्यांना त्या आत्मविश्वासाची जाणीव करुन दिली पाहिजे. धर्म, रूढी परंपरांच्या नावाने होणार्या पिळवणुकीच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी महिलांना जागृत करायला हवे. अन्यायाविरोधात लढण्यासाठी महिलांचा ढाल नव्हे तर तलवार म्हणून वापर झाला पाहिजे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे म्हणाल्या, की महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात, तेव्हा महिलांना सुधारायची, आणि मानसिकता बदलायची भाषा केली जाते. मात्र पुरुषी दृष्टी बदलायला हवी यावर कुणी परिश्रम घेत नसल्याचे त्यांनी निरीक्षण नोंदविले. या कार्यक्रमाला सुनिती सु. र., डॉ. मनीषा गुप्ते, रझिया पटेल आदी उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002