व्हिएस न्युज - पिंपरी-चिंचवडमध्ये गाडयांच्या तोडफोडीचे सत्र कायम आहे. शहराच्या पिंपळे गुरव भागात अज्ञात समाजकंटकांनी ओंकार कॉलनी मधील रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या रिक्षा आणि चारचाकी अशा सात ते आठ गाड्यांची तोडफोड केली. या प्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत. सहा ते सात जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन धुडगूस घालत गाड्यांची तोडफोड केली. ही घटना मध्यरात्री घडली आहे. शेखर चांदणे यांच्या मालकीच्या तीन गाड्या फोडल्या आहेत.
याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. ओंकार कॉलनी मध्ये गाडी घेऊन येत असताना चांदणे यांच्या गाडीवर अज्ञात टोळक्याने हल्ला केला यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत. त्यांच्या पुतण्याला काच लागली असून तिघे जण सुदैवाने बचावले आहेत.
व्हीएस न्युज - हिंजवडी येथे पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण कसबे (वय २७) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रवीणला पोलीस ठाण्यात बोलावले होते. प्रवीण कसबेविरोधात त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी समज देण्यासाठी प्रवीणला पोलीस ठाण्यात बोलावले होते. पोलिसांनी समज दिल्यानंतर प्रवीण घरी परतला. घरी गेल्यावर त्याने पुन्हा पत्नीशी भांडण केले. पोलिसांनी माझे काय केले अस म्हणत त्याने पुन्हा पत्नीला शिवीगाळ केली.
या प्रकाराने संतापलेल्या सासऱ्यांनी जावयाविरोधात तक्रार करण्यासाठी पुन्हा पोलीस ठाणे गाठले. त्यांच्यापाठोपाठ प्रवीणही हिंजवडी पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलीस ठाण्यात हवालदार अविनाश बोराटे यांनी प्रवीणला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवीणने त्यांना देखील शिवीगाळ केली. शेवटी शिवीगाळ करणे, धमकावणे आणि सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण विरोधात गुन्हा दाखल केला.
व्हीएस न्युज - शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत मटण शॉप दुकानातील २२ बकऱ्या आणि २ बोकडांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत ५ दुकान जळून खाक झाली आहेत. ही घटना रविवारी पहाटेच्या ५ च्या सुमारास मोरवाडी लाल टोपीनगर येथे घडली.
या आगीत एकूण ७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या विभागाने दिली आहे. मोरवाडी लाल टोपीनगर येथे पहाटे ५ च्या सुमारास मारुती टायर दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली, आगीने रोद्ररूप धारण करत शेजारी असलेल्या शानदार मटण शॉप या दुकानाला देखील आगीने घेरले.या दुकाना मधील २२ बकऱ्या आणि २ पाळलेल्या बोकडांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शानदार मटण शॉप मालक आणि मारुती टायर विक्री करणाऱ्या दुकानदाराचे ७ लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देताच घटनास्थळी भोसरी, संत तुकाराम नगर, चिखली, प्राधिकरण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले.
व्हीएस न्युज - पोलिस पत्नीने स्वतः अत्महत्या करून दोन वर्षाच्या स्वतःच्या कोवळ्या मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना हडपसर येथे शनिवारी(ता.22) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सासरच्या छळास कंटाळून ही आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल व कौटूंबिक हिसाचार केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सासु-सासऱ्यां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूनम उर्फ जान्हवी (वय २२, रा. टिळेकरवस्ती) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर शिवांश असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार पूनमचा पती अमित दत्तात्रय कांबळे हे हडपसर पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई आहेत. ते रात्रपाळीत कामाला होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते घरी गेले असता. घराची खिडकी उघडी होती व बेडरूमची लाईट चालू होती. त्यामुळे त्यांनी घरात पाहिले असता साडीच्या सहाय्याने पूनम हिने फॅनला गळफास घेतल्याचा व मुलाचा उशीने गळा दाबून खून केल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. त्यात पूनमने या घटनेस कोणालाही जबाबदार धरू नये असे नमूद केले आहे.
पूनमचे वडील सुरेश जगताप म्हणाले, ''मुलीला सासुरवास होता. तीचे लग्न चार वर्षांपूर्वीच झाले होते. ती सतत आम्हाला फोन करून सासरवास होत असल्याची माहिती देत. मात्र परिस्थित सुधारेल या हेतूने आम्ही तिला समजावून सांगत होतो. आम्ही घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.
व्हीएस न्युज - ऑस्ट्रेलिया मध्ये चालू असलेल्या बिग बॅश टि - 20 क्रिकेटच्या सामन्यांवर बेकायदेशीर सट्टा घेणार्या मनीष राजकुमार तलरेजा (वय-४१,राहणार - विजयनगर काळेवाडी) नितीन तिरंतदास कूकरेजा(वय-३५, राहणार - पिंपरी)या दोघांना काळेवाडी येथून (दि. २१) शुक्रवारी अटक करण्यात आली.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड खंडणी - दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे यांनी केली. बडे यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहीत मिळताच के. डि. एम प्लॅनेट, बि. बिल्डिंग, फ्लॅट क्र- ५०१, विजयनगर, काळेवाडी, पिंपरी येथे बेकायदेशीर सट्टा चालवणार्या दोन आरोपींना सापळा रचून छापा टाकून अटक केली.
या कारवाई मध्ये त्यांच्याकडून एलईडी टिव्ही, सेट टॉप बॉक्स, ९ मोबाईल हँन्डसेट, वही, पेन्सिल, प्लँस्टिक टेबल, टेबल कव्हर, इलेक्ट्रीक वायर, मोबाईल चार्जिंग हब, मोबाईल चार्जिंग बॉक्स, लँपटॉप व चार्जर, असा एकूण एक लाख १५,१०५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहा. पोलीस आयुक्त सतीश पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, राजेंद्र शिंदे, अजय भोसले, विक्रांत गायकवाड, आशिष बोटके, नितीन लोखंडे, शैलेश सुर्वे, नितीन जाधव, नितीन खेसे व अनिता जाधव यांचे पथकाने केली आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्ना बाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी केंद्रीय केमिकल फर्टीलायझर मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स ही भारत सरकारची कंपनी अनेक समस्यांनी ग्रासली आहे. कंपनीच्या कामगारांचा १९ महिन्याचा पगार प्रलंबित असून कंपनीकडे पुरेसे पैसे नसल्याने कंपनी चालू ठेवणे व्यवस्थापनाला कठीण जात आहे. कंपनीच्या जमीन विक्रीची परवानगी मिळूनही जमिनीची विक्री होऊ शकली नाही. यासाठी दोन वेळा जाहिरात प्रसिद्ध करूनही कोणी खरेदीदार पुढे आला नाही. या सर्व कारणाने कंपनी चालू ठेवणे अधिकच कठीण झाले आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठ्पुराव्याणे कंपनीला केंद्र सरकार कडून १०० कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळाले होते. त्यात कंपनीच्या कामगारांचा थकीत पगार देऊन कंपनीचे उत्पादन चालू करण्यात आले आहे. कंपनी सुस्थित चालू ठेवण्यासाठी मोठा निधी आवश्यक आहे. कंपनी पूर्वस्थितीत आणण्यासाठी तसेच सेवा निवृतीची रक्कम व कामगारांचे थकीत पगार देण्यासाठी केंद्रीय केमिकल फार्टीलायझर मंत्रालयाने केंद्रीय आर्थिक संबधि कॅबिनेट कमिटी पुढे ४५० करोड रुपये कंपनीस देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यास आज पर्यंत मंजुरी मिळाली नसल्याने एच. ए कंपनीच्या अडचणी अधिकच वाढत चालल्या आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी आज संबधित खात्याचे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली .
सरकार या प्रश्ना बाबत सकारात्मक असून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संबधित विभागाच्या आधिकाऱ्या समवेत बैठक बोलावली असुन एच.ए कंपनीला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा म्हणाले असल्याचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रत्रकात म्हटले आहे.
व्हीएस न्युज - रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिस व आरटीओकडून नियम तोडणाऱ्या वाहनचालकांकडून दंड आकारला जातो. मात्र दंड आकारूनही वाहचालकांवर फारसा परक पडत नाही. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधित वाहनचालकाचा परवानाच निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठवावा आणि आरटीओने परवाना निलंबित करावा, असे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले आहेत.
त्यानुसार पाच प्रकारचे वाहतूक नियम तोडणाऱ्यांचा वाहन चालवण्याचा परवाना निलंबित होणार आहे. अपघात रोखण्यासाठी सरकारने विविध विभागांमार्फत अनेक उपाययोजना केल्या आहेत. तसेच विविध समित्यांचीही स्थापना केली आहे. एवढे करूनही रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी होताना किंवा रोखण्यात यश येत नाही. त्यामुळे सरकारने आता अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी गंभीर कारवाईचा निर्णय घेतला आहे. अपघात रोखण्यासाठी केवळ वाहतूक पोलिस आणि आरटीओंनाच जबाबदारी न देता या दोन विभागांसोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग पोलिस, आरोग्य विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रसिद्धी कार्यालयांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यातील मुख्य जबाबदारी ही आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची राहणार आहे.
दारू पिऊन वाहन चालवणारे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहून चालवणे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे आणि क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे या पाच प्रकारांपैकी कोणताही वाहतूक नियम मोडला तर संबंधित वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता पोलिसांनी परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओ विभागाकडे पाठवतील. आरटीओ विभागाने वाहतूक पोलिसांच्या शिफारशीनुसार संबंधित वाहनचालकाचा परवाना निलंबित करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्याचप्रमाणे हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशात नमूद आहे.
व्हीएस न्युज - जुण्या भांडणाच्या रागातून दोघा जणांनी मिळून एका तरुणाच्या घरात घुसत त्याच्या डोक्यात चाकूने वार केले. ही घटना पिंपरी रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या सेनेटरी चाळीमध्ये घडली. विकी सतीश ठोकळ (वय २२, रा. सेनेटरी चाळ, पिंपरी रेल्वेस्टेशनजवळ, पिंपरी) असे चाकूने वार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अविनाश काशिनाथ काळे (वय २५) आणि कृष्णा काशिनाथ काळे (वय २०, दोघे रा. काळेवाडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विकी ठोकळ हे त्यांच्या पत्नीसोबत पिंपरीतील सेनेटरी चाळीतील भाड्याच्या खोलीत राहतात. जुण्या भांडणाच्या रागातून आरोपी अविनाश आणि कृष्णा हे दोघे त्यांच्या घरात घुसले. तसेच त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्या चाकूने वार करुन पसार झाले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत वाहन चोराला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड पोलीसांनी केली.
राजू बाबुराव जावळकर (वय ५०, रा. कोल्हेवाडी, ता. हवेली.) असे शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यासह त्याचा साथीदार सोमनाथ सुभाष चौधरी (वय ३२, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाणे हद्दीतून फेब्रुवारी २०१८ मध्ये टाटा कंपनीचा छोटा हत्ती (एमएच/१२/एफडी/६४२३) हा टेम्पो चोरीला गेला होता. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना वाकड पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली या प्रकरणातील चोरीचा टेम्पो हा खेड शिवापूर येथे आहे. यावर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन शोध घेतला असता एका शेड मध्ये आरोपी राजू आणि सोमनाथ हे दोघेही गॅस कटरच्या साहाय्याने तो टेम्पो कट करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने त्या दोघांना ताब्यात घेऊन टेम्पो जप्त केला. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी हा टेम्पो रहाटणी येथील बीआरटी रोडवरून चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून दोघा आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपी राजू जावळकर याच्यावर पुणे शहर, सातारा, नगर येथे तब्बल १०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तर सोमनाथ चौधरी याच्यावर २० ते २५ वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील दोन, वाकड, इंदापूर, चाकण, तळेगाव दाभाडे, कराड शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सात वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन डी सस्ते, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी देविदास शेळके, डी. डी. सणस, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, नितीन ढोरजे, जावेद पठाण, सुरेश भोसले, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड, विक्रम जगदाळे, दीपक भोसले, भैरोबा यादव, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, शाम बाबा, मधुकर चव्हाण, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.
चोरीच्या पैशांमधून मुलांचे शिक्षण
चोरीच्या कामातून मिळणाऱ्या पैशांमधून दोघेही संसार आणि मुलांच्या शिक्षणासाठी येणारा खर्च भागवायचे. राजू जावळकरला दोन मुले असून ते नेवासा येथील बोर्डिंगमध्ये शिक्षण घेत आहेत.त्यासाठी राजू हा दरवर्षी दोघांची ८० हजार रुपये फी भरतो. तर पत्नी ही गृहिणी आहे. आई-वडील हे पुण्याजवळील एका खेड्यात राहतात. राजू हा गेली २० वर्ष वाहनचोरीचे गुन्हे करत आहे. चार चाकी चोरुन ती भंगारात विकायचा. कवडीमोल किंमतीमध्ये भंगारात विकायचा. या पैशांमधून तो संसार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवतो. राजू इयत्ता ७ वी पर्यंत शिकलेला असून कमी कष्टात जास्त पैसे कमावण्यासाठी तो चोरी करु लागला. दरम्यान, चोरी केलेल्या गाडीमध्ये जीपीएस सिस्टम तर नाही ना हे पाहण्यासाठी चोरी केलेली गाडी निर्जनस्थळी ठेवली जायची. तिथे दोन दिवस पोलीस किंवा गाडी मालक तर येत नाही ना याची खात्री करून ते गाडी भंगारात काढायचे.
व्हीएस न्युज - मोबाईल दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ६७ हजार २१० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवारी (दि.१५) रात्री अकरा ते रविवारी (दि.१६) पहाटे चारच्या दरम्यान भोसरी आळंदी रस्ता येथील शरयु एंटरप्रायजेस या मोबाईल विक्रीच्या दुकानात घडली.
याप्रकरणी दुकानाचे मालक विशाल प्रकाश पाटील (वय २३, रा. पसायदान सोसायटी, फ्लॅट नं.१०५, ए विंग परांदेनगर, दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल यांचे भोसरी आळंदी रस्ता येथे शरयु एंटरप्रायजेस नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. शनिवारी (दि.१५) रात्री अकराच्या सुमारास दुकानाला कुलुप लावून घरी गेले असता. रात्री अकरा ते पहाटे चारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. तसेच दुकानातील विविध कंपन्यांचे ४५ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ६७ हजार २१० रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - बेपत्ता विवाहितेच्या चौकशीसाठी तिच्या वयोवृद्ध वडिलांना भोसरी पोलीस ठाण्यात बोलावून सर्व नातेवाईकांसमोर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १६) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
वयोवृध्द इसमाला मारहाण करणाऱ्या भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षकाचे नाव विकास देशमुख असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुरुवारी (दि. १३) एक विवाहित महिला एक वर्षाच्या मुलासह बेपत्ता झाली होती. सगळीकडे शोधाशोध करूनही महिला सापडत नसल्याने सासरच्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेच्या वडिलांना गावी देखील याबाबत कल्पना देण्यात आली. वडिलांनी देखील सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ती मिळून आली नाही.
या प्रकरणाच्या तपासासाठी भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक विकास देशमुख यांनी महिलेच्या वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. यावेळी महिलेचे वडील नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात आल्यानंतर देशमुख यांनी त्यांना कोणावर संशय आहे का, असे विचारले. त्यावर त्यांनी महिलेचे लग्नापूर्वी एका तरुणासोबत मैत्रीचे संबंध असून त्याच्यासोबत गेल्याचा संशय वाटत असल्याचे सांगितले. ही माहिती देताच ही माहिती एवढ्या उशीरा का सांगितली म्हणत देशमुख यांनी बेपत्ता महिलेच्या वडिलांना मारहाण केली. तसेच बारा तासांच्या आत मला महिला आणि तिचा मुलगा इथे पाहिजे असे सांगून त्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून काढले. या घटनेमुळे सर्वच स्थरातून संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांना विचारले असता त्यांनी, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. मात्र याप्रकरणी वडिलांनी सुरुवातीला ही माहिती देणे अपेक्षीत होते. ती दिली नाही म्हणून त्यांच्यावर थोडा दबाव आणल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र संबंधीत अधिकाऱ्याने मारहाण केली आहे का याची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती दिली.
व्हीएस न्युज - दुचाकी घेऊन देतो असे सांगून एका महिलेकडून कागदपत्रे आणि २८ हजार ६०० रुपये घेऊन तिला दुचाकी घेऊन न देता तिघाजणांनी मिळून फसवणूक केली. ही घटना मंगळवार (दि.१३ नोव्हेंबर) ते मंगळवार (दि.४ डिसेंबर) दरम्यान नेहरुनगर येथील राजीव गांधी शाळे शेजारील इमारतीमध्ये घडली.
याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेचे बंधू अभिशेक सुभाष पाटील (वय २१, रा. वारंगवाडी रोड, डी.वाय.पाटील कॉलेज आंबीगाव तळेगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेंद्र सुरेश जैसवाल (रा. राजीव गांधी शाळेशेजारील पांढऱ्या रंगाची इमारत, रुम नं.३, नेहरुनगर, पिंपरी) आणि त्याचे इतर दोघा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.१३ नोव्हेंबर) ते मंगळवार (दि.४ डिसेंबर) या दरम्यान फिर्यादी अभिषेक यांच्या बहिणीला आरोपी महेंद्र आणि इतर दोघा आरोपींनी नवी दुचाकी घेऊन देतो असे सांगून त्यांच्याकडून त्यांचे घरभाडे अॅग्रीमेंट, आधार कार्ड आणि पॅनकार्ड घेतले. त्यानंतर एकूण २८ हजार ६०० रुपये त्यांच्याकडून घेऊन त्यांना दुचाकी घेऊन न देता त्यांची फसवणूक. आरोपींनी महिलेचे पैसेही परत केले नाही तसेच देलेल्या कागदपत्रांचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग केला.
याप्रकरणी महेंद्र आणि त्यांच्या दोघा साथीदारांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून अटक करण्यात आलेले नाहीत. पोलिस उपनिरीक्षक बोचरे तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002