Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
खळबळजनक ! प्रोफेशनल डान्सरसह तिघांनी चोरल्या 25 दुचाकी

व्हिएस न्यूज -पुणे शहरातील विविध भागात मागील सहा महिन्यांमध्ये 25 दुचाकी चोरणाऱ्या चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एका प्रोफेशनल डान्सरचाही समावेश असून या सर्व आरोपींनी मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

संजय हरीष भोसले ऊर्फ सोन्या (वय 20 रा. शेवाळवाडी), हृषिकेश बाबासाहेब डोंगरे ऊर्फ बिटू (वय 19 रा. शेवाळवाडी), अभिषेक अनिल भडंगे ऊर्फ मोनु (वय 19 रा. नऱ्हे आंबेगाव) आणि अजित कैलास कांबळे ऊर्फ विठ्ठल (वय 21 रा. शेवाळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील मगरपट्टा चौकात असलेल्या वाहन पार्किंगमध्ये चारजण संशयितपणे फिरत असल्याची माहिती हडपसर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता चौघेजण गाड्यांची पाहणी करताना दिसले. त्या चौघांकडे चौकशी केली असता, शहरात 25 दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली. या चोर्‍या मौजमजा करण्यासाठी केल्या असून यातील आरोपी अभिषेक अनिल भडंगे ऊर्फ मोनु हा तरुण प्रोफेशनल डान्सर आहे. त्या आरोपीने अनेक स्टेज शो आणि काही माहितीपटांमध्येही काम केले आहे. आरोपींकडे अजून चौकशी सुरू असून आणखी काही गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली केली. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस करित आहेत.

...Read More

V. S. News
वारीस पठाण यांना विश्व हिंदू परिषदेचा इशारा

व्हिएस न्यूज -वारीस पठाण यांनी केलेले वक्तव्य हे धमकी वजा आहे. त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं. हिंदूना धमकावल्याच त्याचा चांगला परिणाम होणार नाही,” असे सडेतोड उत्तर विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांनी पठाण यांना दिले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त व्क्तव्य केलं होतं. या सभेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि मनसेनं वारिस पठाण यांच्या टीका केली आहे.

काय म्हणाले होते वारिस पठाण?

सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू,” असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते. १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

विश्व हिंदू परिषदेचे उत्तर

पठाण यांच्यावर चहूबाजूने टिका होत असतानाच आता विश्व हिंदू परिषदेनेही याप्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परिषदेचे मिलिंद परांडे यांनी वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. “त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं. हिंदुना धमकावून परिणाम होणार नाही. इतिहास काळापासून जे काही हिंदू समाजावर संकट आली आहेत. त्याची हिंदू समाज चिंता करायला सक्षम आहे,” असा थेट इशाराच परांडे यांनी वारीस पठाण यांना दिला.

...Read More

V. S. News
हरिपाठ न आल्याने महाराजांनी केली बेदम मारहाण; मुलगा आठ दिवसांपासून कोमात

व्हिएस न्यूज - लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये हरिपाठ न आल्याने मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून ११ वर्षीय मुलगा कोमात होता. ओम राजू चौधरी असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव असून सध्या त्याच्यावर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, त्यांची प्रकृती नाजूक असून तो अद्यापही कोमात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भगवान महाराज पोव्हणे असे मारहाण करणाऱ्या आरोपी महाराजांचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मुलाची आई कविता राजू चौधरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार महाराजांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान महाराज पोव्हणे याचे आळंदीत श्री माऊली ज्ञानराज कृपा प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्था आहे. त्यात अनेक मूल अध्यात्मिक शिक्षण घेतात. गेल्या एक वर्षांपासून जखमी ओम देखील त्या ठिकाणी अध्यात्मिक धडे गिरवत आहे. १० फेब्रुवारी ला ओम ला हरिपाठ आला नाही म्हणून आरोपी भगवान पोव्हणे याने त्याला काठी ने बेदम मारहाण केली. यात फुफ्फुस आणि हृदयाच्या मधोमध मार लागला. दुसऱ्या दिवशी औरंगाबाद येथे कीर्तन असल्याने आरोपी पोव्हणे याने ओमसह सर्व मुलांना घेऊन त्या ठिकाणी गेला. तिथे गेल्यानंतर ओम ची तब्बेत बिघडली. महाराजांनी ओम ची आई कविता यांना फोन वरून मुलाची तब्बेत बरी नसल्याचे सांगितले.

तेव्हा, आई तातडीने त्या ठिकाणी गेली आणि मुलाला घेऊन आली. परंतु, प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याच्यावर कविता काम करत असलेल्या रुग्णालयात उपचार सुरू केले. तो कोमात गेला होता, त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्याच्या छातीचा एक्सरे काढण्यात आला त्यात त्याच्या छातीत पाणी झाल्याचे स्पष्ट झाले असून पुन्हा त्याला पिंपरी-चिंचवडमधील डी.वाय. पाटील रुग्णालयात हलवले, त्याच्या छातीतून दोनशे मि.ली पाणी काढण्यात आले आहे. दरम्यान, तो अतिदक्षता विभागात असून ओम कोमात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. भगवान महाराज पोव्हणे याच्यांवर खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला एका सप्ताह मधून अटक करण्यात आली आहे. ओमची प्रकृती बरी व्हावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

...Read More

V. S. News
धक्कादायक ! हडसर किल्ल्यावरून दरीत पडल्याने मुंबईतील युवतीचा मृत्यू

व्हिएस न्यूज - जुन्नर परिसरातील हडसर किल्ल्यावर श्री शिवजयंतीनिमित्त दुर्ग स्वच्छता मोहिमेसाठी मुंबईतील एका गटाबरोबर आलेल्या युवतीचा दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. सिद्धी सुनील कामठे (वय २०, सध्या रा. चिंचपोकळी, मुंबई, मूळ रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे) असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे.

जुन्नरहून तेरा किलोमीटर अंतरावर हडसर किल्ला आहे. हडसर किल्ल्यावर ठाण्यातील सह्य़ाद्री ट्रेकर्स फाऊं डेशनकडून श्री शिवजयंती निमित्त दुर्ग स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार होती. या मोहिमेत गिर्यारोहण संस्थेतील ३५ सदस्य सहभागी झाले होते. गिर्यारोहकांच्या गटात सिद्धी होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास गिर्यारोहकांचा गट अवघड अशा पायवाटेवरून किल्ल्यावर जात होता. त्यावेळी गवतावरून सिद्धीचा पाय घसरला आणि काही कळण्याच्या आत ती दरीत पडली.

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सिद्धीला तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने दरीतून बाहेर काढण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असल्याची माहिती जुन्नर पोलिसांनी दिली.,

...Read More

V. S. News
धक्कादायक !भरधाव वेगात असलेली मिनी बस चहाच्या दुकानात शिरली;पाच जखमी

व्हीएस न्यूज -पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरात भरधाव वेगात असलेली मोटार (व्हॅन) चहाच्या दुकानात शिरली. ही घटना(२०फेब्रु )आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एकूण पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, भरधाव वेगातील व्हॅन चालक हा दुचाकीला वाचवताना त्याचे नियंत्रण सुटले आणि व्हॅन थेट चहाच्या दुकानात शिरली.

चहा प्यायला थांबलेल्या व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी पळ काढला. दैव बलवत्तर असल्याने जीवितहानी नाही, परंतु, घटनेत काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

...Read More

V. S. News
मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने छञपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्सहात साजरी.

व्हिएस न्युज - १९ फेब्रुवारी रोजी जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उ्साहात साजरी केली जाते, त्याच प्रमाणे यंदाही मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त काळेवाडी येथील एम.एम. शाळे पासून ते एच.ए. कॉलनी येथे स्तिथ शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत टू व्हीलर रॅली कडण्यात आली. अनेक शिवप्रेमींनी या रॅली मध्ये सहभाग घेतला.

छञपती शिवाजी महाराजांच्या पूतळ्यास मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांच्या हस्ते पूष्प हार अर्पण करण्यात आला व जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या वेळी मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर,शहर कार्याध्यक्ष गोरख पाटील, अधिकराव भोसले, बाळासाहेब शिरसाठ, संजय गायके, आभिजीत गोफण, बाळासाहेब गायकवाड, भरत इंगळे, मारूती म्हस्के, दत्ता गिरी, महेश गूळगोंडा, दिपक भक्त, माऊली जाधव, विशाल बाविस्कर, नरसिंग माने, प्रदिप दळवी, अंकूश कोळेकर, निलेश भोरे, राहूल कदम, सागर तायडे, बबलू कदम व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
पिंपरी:बुद्ध प्रेरणा बुद्ध विहार सामाजिक ट्रस्ट तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी.

व्हीएस न्यूज - बुद्ध प्रेरणा बुद्ध विहार सामाजिक ट्रस्ट, पिंपरी अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केट येथे बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष फारुख सत्तार कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली त्यावेळेस पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा राजेंद्र निकाळजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी व त्यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) राजेंद्र निकाळजे यांना संविधानाची प्रत देऊन अध्यक्ष फारुख सत्तार कुरेशी यांच्या हस्ते त्यांचं सत्कार करण्यात आला.

या वेळी ट्रस्ट चे सचिव ॲड. बी.के. कांबळे, भारतीय जन्मत न्यूज पोर्टल चे डायरेक्टर प्रमोद गरड, संदिपान झोंबाडे, संतोष कसबे व सर्व सभासद उपस्थित होते.

दिवसा अखेर पर्यंत अनेक शिवभक्तांनी या ठिकाणी भेट दिली त्यात प्रामुख्याने नरेश जिनवाल, निलेश दुनघव, दीपक बुद्धन,सागर सूर्यवंशी इस्त्यादिंनी भेट दिली. संयोजकांनी सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.

...Read More

V. S. News
पिंपरी-चिंचवड मध्ये जुन्या मिळकतींच्या करवाढीस नागरिकांचा विरोध ..! सचिन साठे

व्हीएस न्यूज - कर्जरोखे काढण्याचा उद्योग कोणाच्या भल्यासाठी ..
स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने .
.

पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या मिळकतींना अडीच पट करवाढ आणि प्रतिमाणसी प्रतिदिन चाळीस लिटर पेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्या नळजोड धारकांना वाढीव पाणीपट्टी आकारण्याचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रस्तावित केले आहे. या प्रस्तावाला शहरातील मिळकतधारकरांचा तीव्र विरोध आहे.ही करवाढ सर्वसाधारण सभेने शंभर टक्के फेटाळावी. अन्यथा मिळकतधारक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिला आहे.
शहराला पाणी पुरवठा करणारऱ्या पवना धरणात गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक असतानाही आयुक्तांच्या आडमुठपणामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणी गळती रोखून बेकायदेशीर नळजोड शोधून त्यावर कारवाई करण्याऐवजी आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागासाठी ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे घेण्याचे प्रस्तावित केले आहे. महापालिकेच्या मुदत ठेवींच्या व्याजापोटी २०० कोटीहून जास्त रक्कम मिळत असताना कर्जरोखे काढण्याचा उद्योग नेमका कोणाच्या भल्यासाठी करणार आहे. याचे उत्तर करदात्या नागरिकांना मिळाले पाहिजे.( दि. १७ ) सोमवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०२०-२१ चा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले की,२००७ सालापूर्वीच्या सर्व रहिवाशी ,व्यापारी, वाणिज्य, औद्योगिक व मोकळ्या जागेतील मिळकतींना अडीच पट करवाढ करण्यात आली आहे. ही करवाढ गुरुवारी (२० फेब्रुवारी )होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने जरी फेटाळली, तरी मी माझ्या अधिकारात ही करवाढ लागू करेल, आयुक्तांच्या या मनमानीपणाचा तीव्र निषेध शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकात केला आहे.
शहरातील नागरिकांना माफक दरात रस्ते,वीज,ड्रेनेज सुविधा,स्वच्छता,कचरा व्यवस्थापन, प्राथमिक शिक्षण व प्राथमिक आरोग्य सुविधा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. शहरामध्ये पाच लाखांहून जास्त मिळकती असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. परंतु अद्यापही हजारो मिळकतींची आणि नळ जोडणींची नोंद प्रशासनाकडे नाही. त्यामुळे दरवर्षी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मिळकतधारकांवर आयुक्त अन्यायकारक अडीच पट करवाढ लागू करीत आहे केंद्र सरकारने मागील पाच वर्षात नोटाबंदी,जीएसटी सारख्या घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देशाचा जीडीपी कमी झाला आहे. त्याचा मुख्यत्वे औद्योगिक पट्ट्यावर जास्त परिणाम झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योजक व कामगारांचे शहर आहे. औद्योगिक मंदीचा परिणाम कामगारांच्या उत्पनावर झाला आहे संथगतीने सुरु असलेल्या विकास कामांमुळे मागील तीन चार महिन्यापासून खोदून ठेवलेले शहरातील बहुंतांशी रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. शहरभर धुळीचे साम्राज्य आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली डिजिटल सुविधा देण्यासाठी अनेक योजना आयुक्तांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये दूरसंचार वाहिन्यांचे नेटवर्क,वायफाय,किऑस्क यंत्र,डिजिटल बोर्ड,फेस्टिवल ऑफ फ्युचर,सिटीझन हॅकेथॉन, स्टार्टअप पिचफेस्ट,स्पिकर सिरीज या योजना म्हणजे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय. असे प्रकल्प म्हणजे नागरिकांना 'मुंगेरी लाल के हसीन सपने 'दाखविण्याचा प्रकार आहे.

...Read More

V. S. News
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुढील वर्षी इंडो-फ्रेंच नॉलेज समिट

व्हीएस न्यूज : भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ करण्यासह शिक्षण, संशोधन आणि नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी सुरू झालेल्या ‘इंडो- फ्रेंच नॉलेज समिट’च्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. पुढील वर्षी(२०२१) ४ आणि ५ मार्चला ही परिषद होणार असून, फ्रान्स आणि भारत सरकारचे उच्चस्तरीय अधिकारी, शिक्षण संस्था, संशोधन संस्था, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा परिषदेत सहभाग असेल.

फ्रान्सच्या मुंबईतील महावाणिज्य दूत सोनिया बार्बरी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या नवसंकल्पना केंद्राच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, फ्रेंच दूतावासातील अधिकारी ऑलिव्हर फुडूम, फिलिप गुलियन आदी या वेळी उपस्थित होते. अवकाश विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवस्थापन अशी नऊ प्रमुख क्षेत्रे आणि संबंधित विषयांवर या परिषदेत चर्चा केली जाईल, विद्यापीठांशी सामंजस्य करार केले जातील, विविध विषयांवरील एकत्रित संशोधन प्रकल्प राबवण्यासंदर्भातील ठराव केले जातील.

बार्बरी म्हणाल्या, ‘भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ आहेत. अवकाश विज्ञान, संरक्षण अशा क्षेत्रांत एकमेकांचे सहकार्य घेत आहेत. दोन्ही देशांसाठी विद्यापीठे आणि संशोधन हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करणे शक्य आहे. पुणे हे शिक्षणाचे केंद्र असल्याने ही परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचे ठरले. या पूर्वीच्या दोन परिषदांमध्ये सुरू झालेले प्रकल्प पुण्यात होणाऱ्या तिसऱ्या परिषदेत सादर केले जातील. ही परिषद फलदायी ठरेल, अशी अपेक्षा आहे.’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला या परिषदेच्या आयोजनाचा मान मिळणे ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठ अन्य संस्थांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करेल. या परिषदेमुळे विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, नव्या विषयांसंदर्भातील अभ्यासक्रम, काही महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेता येतील. या पूर्वीच्या दोन परिषदांमुळे एव्हिएशन, इलेक्ट्रिक मोबिलिटी संदर्भातील दोन अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर निर्माण झाली. त्यामुळे या परिषदेतूनही शिक्षण, संशोधन, विज्ञानासंदर्भातील महत्त्वपूर्ण घडामोडी होऊ शकतील, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

पहिल्यांदाच विद्यापीठात परिषद

फ्रान्सच्या अध्यक्षांनी २०१८ मध्ये भारताला भेट दिली होती. त्या वेळी फ्रान्स दूतावासातर्फे ही परिषद आयोजित केली होती. पहिली परिषद २०१८ मध्ये दिल्लीत आणि २०१९ मध्ये फ्रान्समधील लिऑन येथे झाली. आता २०२१ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारी परिषद पहिल्यांदाच एखाद्या विद्यापीठात होणार आहे.

...Read More

V. S. News
धक्कादायक! चाकणमध्ये दगडाने ठेचून केली हत्या

व्हीएस न्यूज - कानशिलात लगावल्याच्या कारणावरून चाकण एमआयडीसी मध्ये वर्कशॉप मालकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. हरीशचंद्र किसन देटे (वय-४५) असे खून झालेल्या वर्कशॉप मालकाचे नाव आहे. तर जीवन दत्ता डोंगरे असे आरोपीचे नाव असून त्याच्यासह ऐकून पाच जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रमोद वशिष्ट कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हरीशचंद्र किसन देटे यांचे चाकण एमआयडीसीमध्ये व्ही.एच.डी नावाचे वर्कशॉप आहे. त्याठिकाणी आरोपी जीवन डोंगरेची पत्नी काम करते. सोमवारी सकाळी आरोपी पत्नीला वर्कशॉपमध्ये सोडवण्यासाठी आला होता. तेव्हा, काही कारणामुळे मयत हरिशचंद्र देटे आणि आरोपी जीवन डोंगरे यांच्यात भांडण झाले. हरिशचंद्र यांनी आरोपीच्या दोन कानशिलात लागवल्या. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. परंतु, कानशिलात लगावल्याचा राग मनात असल्याने जीवन डोंगरे हा स्वस्त बसला नाही. त्याने आपल्या पाच ते सहा साथीदारांसह हरीशचंद्र यांचे पुन्हा वर्कशॉप गाठत धिंगाना घातला. वर्कशॉपचे मालक हरीशचंद्र हे बाहेर आले. त्यावेळी थेट लाथा बुक्क्यांनी मारहाण करत मुख्य आरोपी जीवन डोंगरे याने त्यांच्या डोक्यात दगड घातला. जखमी देठे यांना तत्काळ चाकणच्या एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. या घटनेनंतर आरोपींनी पळ काढला.

या घटनेमुळे चाकण एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार करत आहेत. आरोपी हा भाड्याने रिक्षा घेऊन चालवत असे असंही पोलिसांनी सांगितले आहे

...Read More

V. S. News
हिंजवडी येथे अग्नि तांडव;१०० जण थोडक्यात बचावले

व्हीएस न्यूज -तिसऱ्या शिफ्टमध्ये रात्रपाळीने काम करणारे १०० जण बजावले
हिंजवडी येथील माणमध्ये हेड लाईट आणि टेल लाईट तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. तिसऱ्या शिफ्टमध्ये रात्रपाळीने काम करणारे शंभर कामगार वेळीच बाहेर पडल्याने बचावले आहेत. ही आग पहाटे चार वाजताच्या सुमारास हिंजवडी माणमधील वेरॉक लाईटिंग सिस्टिम कंपनीला लागली होती. घ

टनेची माहिती मिळताच पुणे आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल घटनास्थळी दाखलं झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीमधील वेरॉक लाईटिंग सिस्टिम कंपनी ला आज पहाटे चार च्या सुमारास भीषण आग लागली होती. यात प्लास्टिक आणि थिनर या रसायनाचा जास्त वापर होत असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. जेव्हा आग लागली तेव्हा तिसऱ्या शिफ्टमध्ये काम करणारे शंभर कामगार कंपनीत काम करत होते. ते सर्व वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, प्रत्येक्ष दर्शी कामगाराने ही आग शॉर्टसर्किटमुळे स्टोअरमध्ये लागली त्यानंतर अवघ्या कंपनीत आग पसरली असे अधिकारी म्हणाले. पिंपरी-चिंचवड (राहटणी), हिंजवडी एमआयडीसी, पुणे (पीएमआरडीए) आणि खासगी टँकर च्या साहाय्याने तब्बल चार तास अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले. या घटनेत जीविहितहानी झालेली नाही. घटनास्थळी हिंजवडी पोलीस देखील उपस्थित होते.

...Read More

V. S. News
ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची मिरवणूक काढत पिंपरी-चिंचवडकरांनी दर्शवला पाठिंबा ..

व्हीएस न्यूज -इंदुरीकर महाराजांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
गेल्या काही दिवसांपासून ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात सुरू आहे. अनेक स्थरातुन इंदुरीकर महाजरांवर टीका सुरू असताना त्यांच्या समर्थनार्थ काही लोक पुढे येत आहेत. पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे इंदुरीकर महाराजांची बैलगाडीतुन मिरवणूक काढत पाठिंबा दर्शवला आहे. यावेळे वारकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणाव हजर होते.पिंपरी-चिंचवडमध्ये शिवजयंती निमित्त ह.भ.प महाराज इंदुरीकर महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करत, उपस्थित नागरिक, वारकरी यांनी बैलगाडी मधून इंदुरीकर महाराज यांची मिरवूनक काढत कीर्तनस्थळी नेहले. शेकडो नागरिकांची गर्दी पाहून महाराजही सर्वांना नमस्कार करत होते.प्रत्येक पिंपरी-चिंचवडकर तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन नागरिकांनी इंदुरीकर महाराजांना दिले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!