Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
'संयम मोबाईल ॲप’ द्वारे पुण्यातील विलगीकरण केलेल्या रूग्णांवर ठेवले जाणार लक्ष

व्हिएस न्युज - स्मार्ट शहर योजनेअंतर्गत(smart cities mission SCM) पुणे महानगरपालिकेने संयम नावाचे मोबाईल ॲप बनवले असून त्याद्वारे विलगीकरण केलेले रुग्ण घरातच रहात आहेत अथवा घराबाहेर पडत नाहीत, याची खातरजमा केली जाणार आहे. पुणे शहर व्यवस्थापनाने तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शहरातील घरगुती विलगीकरण केलेल्या रूग्णांवर निगराणी ठेवणे सुरु केले आहे. त्यासाठी शहरात घरगुती विलगीकरण केलेल्या रूग्णांवर दररोज लक्ष ठेवण्यासाठी पाच विभागांमधून समर्पितपणे काम करणाऱ्या लोकांची पथके तयार केली आहेत. ही पथके परदेशातून प्रवास करून आलेल्या, तसेच कोविड-19 चे उपचार पूर्ण करून घरी पाठवलेल्या रूग्णांवर लक्ष ठेवतील. ही पथके या लोकांच्या तब्येतीची अद्ययावत माहिती मिळवतील तसेच त्या रूग्णांच्या सहवासात आलेल्या लोकांची देखील चौकशी करतील.घरगुती विलगीकरण केलेल्या, ज्यांच्यावर शिक्का मारला आहे, असे लोक आपले अन्न ,बिछाने,भांडी, कपडे आणि स्वच्छतागृहे वेगळी ठेवत आहेत किंवा नाही, याचीही खातरजमा करतील.

संयम मोबाईल ॲप अशा लोकांनी डाऊनलोड केले आहे का,हे देखील पहातील.या मोबाईल ॲपमधे GPS ट्रँकींग बसवले असून घरगुती विलगीकरण केलेले लोक घराबाहेर पडतात का ते कळेल, त्यायोगे शहर आस्थापनेला त्याची माहिती मिळून विभागातील स्थानिक पोलिसांना त्याची वर्दी मिळेल.

...Read More

V. S. News
पुणे ;मूल निवासी मुस्लीम मंचाने घेतली, अंत्यसंस्काराची जबाबदारी

व्हिएस न्युज - करोना विषाणूमुळे जगभरात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या विषाणूंमुळे पुण्यात देखील आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला असून, अशा रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकपुढे येत नसल्याचे चित्र आहे. अशांवर प्रशासनामार्फत अंत्यसंस्कार केले जात आहेत. तर आता पुण्यातील मूल निवासी मुस्लीम मंचाने देखील अशा मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

यावेळी मूल निवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार म्हणाले की, करोनामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास घरातील कोणी पुढे येत नाही. त्यामुळे आता आपणच पुढे येऊन हे कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि पुणे महापालिकेसोबत पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर या कामास परवानगी देखील मिळाली.

त्यानुसार आजपर्यंत 4 मृतांवर अंत्यसंस्कार केले असून आम्ही प्रत्येक धर्माच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करीत आहोत. हे कार्य करीत असताना एकच वाटते की, मृतांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता अंत्यसंस्कार करण्यास पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

...Read More

V. S. News
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परीक्षा वेळापत्रकाबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घोषणा

व्हिएस न्युज - कोरोना विषाणू साथीच्या आजारामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने 15 एप्रिल 2020 रोजी एक विशेष बैठक आयोजित केली होती.

सामाजिक अंतराच्या नियमांसह सध्याचे लॉकडाऊन निर्बंध लक्षात घेत, भरती मंडळे जिथे उमेदवार आणि सल्लागारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे गरजेचे असल्याने सर्व मुलाखती, परीक्षांच्या तारखांचे वेळोवेळी पुनरावलोकन केले जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच 3 मे 2020 नंतर उर्वरित नागरी सेवा-2019 व्यक्तिमत्व चाचणीच्या नवीन तारखांसंदर्भात निर्णय घेतला जाईल. नागरी सेवा -2020 (प्राथमिक), अभियांत्रिकी सेवा (मुख्य) आणि भूगर्भशास्त्र सेवा (मुख्य) परीक्षेच्या तारखांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. सध्याची बदलती परिस्थिती पाहता या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्यास युपीएससीच्या संकेतस्थळावर याबाबत सूचित केले जाईल. एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा, भारतीय वित्तीय सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2020 साठी विलंब नोटिस यापूर्वीच जारी केलीआहे. सीएपीएफ परीक्षा 2020 च्या तारखा देखील यूपीएससी संकेतस्थळावर सूचित केल्या जातील. राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (एनडीए-1) परीक्षा पुढील माहिती मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. एनडीए-2 च्या परीक्षेचा निर्णय 10 जून, 2020 रोजी तिच्या अधिसूचनेसाठी निश्चित करण्यात येईल. सर्व परीक्षा, मुलाखती आणि भरती मंडळाच्या संदर्भात आयोगाचा इतर कोणताही निर्णय तातडीने आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

आयोगाने या बैठकीत कोरोना विषाणू साथीच्या आजारामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. राष्ट्रीय स्तरावर आर्थिक स्रोतांचे संरक्षण करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्रीय लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी एप्रिल 2020 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी त्याच्या मूळ वेतनाच्या 30 टक्के रक्कम स्वेच्छेने न घेण्याचे ठरविले आहे.

याव्यतिरिक्त, युपीएससीच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी सदस्यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार स्वेच्छेने पीएम केअर्स निधीला दिला आहे.

...Read More

V. S. News
‘इसीआर’दाखल करण्यासाठी आस्थापनांना महिनाभराची मुदतवाढ

व्हिएस न्युज - कोविड-19 महामारीमुळे देशभरामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी दि.24 मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लॉकडाउन घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनेक वित्तीय समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय योजना म्हणून केंद्र सरकारने मार्च 2020 या महिन्याचे इसीआर म्हणजेच इलेट्रॉनिक चलन रिटर्न भरण्यासाठी महिनाभराची मुदतवाढ दिली आहे. यानुसार सर्व आस्थापना आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे इ-चलन 15 एप्रिल, 2020 ऐवजी आता 15 मे,2020 पर्यंत भरू शकणार आहेत.

मार्च 2020 च्या वेतन चलन भरण्याची नियमित तारीख 15 एप्रिल 2020 आहे. मात्र ईपीएफ आणि एमपी कायदा, 1952 अनुसार सर्व आस्थापनांसाठी 30 दिवसांचा अवधी दिलेला असतो. त्या काळामध्ये प्रशासकीय शुल्काची पूर्तता केली जाते. आता या कालावधीला मुदत वाढवून दिली आहे.

या संदर्भात श्रम आणि रोजगार मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आस्थापनांच्या प्रमुखांना दिलासा देण्यासाठी आणि कोविड-19 महामारीच्या काळात कर्मचारी वर्गाला वेळेवर वेतन देण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे,यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कर्मचारी वर्गाला वेतन मिळण्यात कोणतीही अडचण निर्माण होवू नये. तसेच प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेला प्रोत्साहन देण्याचा हेतूही यामागे आहे.

या सवलतीचा लाभ सुमारे 6लाख आस्थापनांना होणार आहे. त्यांना इसीआर भरण्यास विलंब होणार नाही. आणि या संस्था जवळपास 5 कोटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देवू शकणार आहेत.

आस्थापनांना वेतन आणि प्रशासकीय शुल्क आता 15 मे, 2020 पर्यंत देय असणार आहे.

मार्च 2020चे वेतन वितरीत करणाऱ्या मालकांना मार्च,2020 च्या ईपीएफच्या थकबाकीच्या देय तारखेला मुदतवाढीची सवलत मिळेल शिवाय, 15 मे, 2020 रोजी किंवा त्यापूर्वी पैसे भरल्यास व्याज आणि दंडही आकारला जाणार नाही.

...Read More

V. S. News
कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात आरोग्य सेवेतील व्यावसायिकांना संरक्षण देण्यासाठी एप्रिल 2020 मध्ये 30,000 कव्हरऑल्सची (पीपीई) निर्मिती करण्याची भारतीय रेल्वेची योजना

व्हिएस न्युज - कोविड-19 रुग्णावर उपचार करताना संक्रमणाचा धोका असलेल्या वैद्यकीय आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेच्या उत्पादन केंद्र, विभागीय कार्यशाळा आणि फील्ड युनिट्सने वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) कव्हरऑल्स तयार करण्यास सुरवात केली आहे.

एप्रिल 2020 मध्ये भारतीय रेल्वे अशा 30,000 हून अधिक कव्हरऑल्सचे उत्पादन करेल आणि मे 2020 मध्ये 1,00,000 कव्हरऑल्सची निर्मिती करण्याची रेल्वेची योजना आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या ग्वाल्हेर येथील अधिकृत प्रयोगशाळेत प्रायोगिक तत्त्वावरील कव्हरऑल्सच्या निर्धारित चाचण्या उच्च श्रेयांक मिळवून मंजूर झाल्या आहेत.

भारतीय रेल्वेचे डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिक, इतर आरोग्य कर्मचारी आणि काळजी घेणारे लोक कोविड -19 आजाराचा मुकाबला करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. संक्रमित रूग्णांमध्ये काम करताना या सर्व कर्मचाऱ्यांना थेट कोविड -19 या आजाराचा धोका आहे. नवीन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांना विशिष्ट प्रकारचे संरक्षक कवच प्रदान करणे जे विषाणूला आणि हा आजार संक्रमित करणाऱ्या द्रवबिंदुना अटकाव करेल. अशा प्रकारचे कव्हरऑल्स एकदाच वापरले जाऊ शकतात म्हणून मोठ्या प्रमाणात त्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. कोविड-19 च्या संक्रमणाचे प्रमाण तुलनेने नियंत्रित असले तरी पीपीई कव्हरऑल्सची आवश्यकताही वाढत चालली आहे.

पीपीईची उपलब्धता व आवश्‍यकतेमधील अंतर भरुन काढण्यासाठी उत्तर रेल्वेच्या जगधारी कार्यशाळेने पीपीईची प्रायोगिक तत्वावर रचना आणि निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या ग्वाल्हेर येथील अधिकृत प्रयोगशाळेत प्रायोगिक तत्त्वावरील कव्हरऑल्सच्या निर्धारित चाचण्या उच्च श्रेयांक मिळवून मंजूर झाल्या आहेत.

हा पुढाकार घेऊन भारतीय रेल्वे चालू महिन्यात (एप्रिल 2020मध्ये ) 30,000हून अधिक पीपीई कव्हरऑल्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करून तो आपल्या कार्यशाळांमध्ये आणि अन्य युनिटमध्ये वितरित करण्यास सक्षम झाली आहे.

उत्पादन सुरू झाले असून मोठ्या प्रमाणावर या कव्हरऑल्सची निर्मिती होत असल्यामुळे भारतीय रेल्वेचे स्वत: चे डॉक्टर, आणि इतर आरोग्य सेवेतील कर्मचारी त्याचा वापर करून बघत आहेत. वाढती गरज भागविण्यासाठी, भारतीय रेल्वेने मे, २०२० मध्ये आणखी 1,00,000 पीपीई तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि योग्य कच्चा माल त्यासाठी मिळविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पीपीई कव्हरऑल्स तयार करण्यासाठी लागणाऱ्या योग्य त्या कच्च्या मालाचा आणि यंत्रसामुग्रीचा जागतिक स्तरावर तुटवडा असतानासुद्धा रेल्वेने हे उद्दिष्ट साकार केले आहे. या प्रयत्नांच्या मागे जगातील सर्वोत्तम अशा भारतीय रेल्वेच्या कार्यशाळा आणि उत्पादन केंद्रांची वेळेवर परीक्षण करण्याची क्षमता कारणीभूत आहे. फील्ड युनिट्स आणि कार्यशाळेत उच्च दर्जाच्या पीपीई कव्हरऑल्सचे उत्पादन इतक्या वेगाने सुरू करण्यासाठी या क्षमता, कौशल्याचा उपयोग केला आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की याच समर्पण भावनेने भारतीय रेल्वेने अगदी कमी कालावधीत आपल्या 5000 पेक्षा जास्त प्रवासी डब्यांना विलगीकरण/अलगीकरण कक्षात रूपांतरित केले आहे.

...Read More

V. S. News
कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात सुमारे 2,000 एनसीसी प्रशिक्षणार्थी आणि 50,000 हून अधिक स्वयंसेवक कार्यरत

व्हिएस न्युज - कोविड-19 महामारीविरुद्धच्या लढ्यात 1 एप्रिल 2020 पासून राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षणार्थी (एनसीसी) स्वयंसेवक, 'एनसीसी योगदान' या उपक्रमाअंतर्गत नागरी, संरक्षण आणि पोलिस कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून नागरी प्रशासनास मदत करीत आहेत. सुमारे 2,000 प्रशिक्षणार्थींची याआधीच 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे, ज्यात तामिळनाडूमध्ये जास्तीत जास्त तैनात असून त्यातील 306 प्रशिक्षणार्थी विविध कर्तव्ये पार पाडत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

लॉकडाऊन चालूच असल्याने अधिकाधिक राज्ये विविध कामांसाठी एनसीसी स्वयंसेवकांची मागणी करीत आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुख्यालयाचे महासंचालक या प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांच्या संख्येवर लक्ष ठेवून आहेत. 'एनसीसी योगदान' या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत सुमारे 50,000 स्वयंसेवकांनी स्वेच्छेने काम केले आहे.

या कर्तव्यपूर्तीसाठी 18 वर्षांवरील वरिष्ठ विभागातील मुले आणि मुलींना स्वयंसेवक म्हणून नेमले जाते. हे प्रशिक्षणार्थी स्वेच्छेने कार्यात योगदान देत आहेत. तैनात करण्यापूर्वी हे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित असल्याची आणि त्यांना सोपविल्या जाणाऱ्या कामाबद्दल ते अवगत असल्याची खातरजमा केली जाते.

सर्व प्रशिक्षणार्थीना त्यांच्या तैनातीच्या वेळी मास्क, ग्लोव्ज इत्यादी योग्य ती सुरक्षा उपकरणे पुरविली जात असल्याची खात्री राज्य यंत्रणा करुन घेत आहे. प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षिततेसाठी अधिकारी, कनिष्ठ आयुक्त अधिकारी, कायमस्वरूपी मार्गदर्शक कर्मचारी आणि एनसीसीचे सहाय्यक अधिकारी यांच्या देखरेखीखाली या प्रशिक्षणार्थींची नेमणूक केली जात आहे. ज्या राज्यांनी एखादा विभाग सील केला असेल किंवा हॉटस्पॉट म्हणून घोषित केला असेल अशा ठिकाणी या प्रशिक्षणार्थींची नेमणूक केली जात नाही.

वाहतूक व्यवस्थापन, पुरवठा साखळी व्यवस्थापन, खाद्यपदार्थांची तयारी व पॅकेजिंग, अन्न व आवश्यक वस्तूंचे वितरण, रांग व्यवस्थापन, सामाजिक अंतर, नियंत्रण केंद्रांचे व्यवस्थापन आणि सीसीटीव्ही कंट्रोल रूम अशा विविध कर्तव्यासाठी हे प्रशिक्षणार्थी तैनात आहेत. याशिवाय एनसीसी प्रशिक्षणार्थी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी समाज माध्यमांवर संदेश पाठवून कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात नागरिकांना जागरूक करीत आहेत.

या देशाला सर्वात मोठी गरज असताना एनसीसी पुन्हा एकदा आपला बिनदिक्कत पाठिंबा देऊन चर्चेत आली आहे. आज संपूर्ण देशभरात 14 लाख लोक तैनात असून 29 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनसीसीची 17 संचालनालय आहेत. या संचालनालयाचे पुढे 99 गट आणि 6२6 युनिटमध्ये विभागणी झाली आहे, जेणेकरून सर्व राज्यांत जिल्हा प्रशासनाकडे प्रशिक्षणार्थींची उपलब्धता सुनिश्चित होईल. सूचना व पुरवठा साखळी व्यवस्थापन कर्तव्यांसाठी प्रशिक्षणार्थींच्या वापराबाबतच्या सूचना विविध जिल्हा मुख्यालयात पोहोचल्या असल्याने जिल्हा प्रशासनाकडून एनसीसी संचालकांकडून त्यांच्या मागणीविषयी पाठपुरावा केला जात आहे.

...Read More

V. S. News
इस्टरनिमित्त राष्ट्रपतींचा संदेश

व्हिएस न्युज - इस्टरच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संदेश दिला आहे.

''इस्टरच्या पवित्र सणानिमित्त मी सर्व नागरिकांना विशेषतः भारतातील आणि परदेशातील ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा देतो.

असे मानले जाते की याच दिवशी येशू ख्रिस्तांचे पुनरावतरण झाले. या शुभ घटनेच्या आनंदाप्रीत्यर्थ इस्टर साजरा केला जातो. ख्रिश्चचनांसाठी अत्यंत पवित्र असलेला हा सण लोकांना प्रेम, त्याग आणि क्षमेचा मार्ग अनुसरण्याची प्रेरणा देतो. येशू ख्रिस्तांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊया आणि संपूर्ण मानवजातीच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करूया.

या सणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये एकतेची भावना अधिक दृढ होउदे आणि आपले राष्ट्र तसेच समाजाच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी आपण सगळे प्रतिबद्ध होऊन पुढे वाटचाल करत राहू. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या या संकटाच्या क्षणी सामाजिक अंतर आणि इतर सरकारी निर्देशांचे पालन करत हा पवित्र उत्सव घरातच राहून कुटुंबासह साजरा करण्याचा संकल्प करूया.''

...Read More

V. S. News
कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत भारतीय वायू दलाचे पाठबळ

व्हिएस न्युज - नवीन कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी भारत सरकार अविरत प्रयत्न करत असुन कोणतेही काम हाती घेण्यासाठी भारतीय वायू दल (आयएएफ) निरंतर 24 तास सज्ज आहे. सर्व राज्यांच्या प्रमुख ठिकाणांपर्यंत अत्यावश्यक औषधे आणि अन्नधान्य वेळेवर वितरीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, ज्यायोगे राज्य सरकारे आणि सहाय्यक संस्थांना परीणामकाररित्या आणि कार्यक्षमतेने या आजाराचा सामना करण्यासाठी सुसज्ज केले जाईल.

मागील काही दिवसांमध्ये आयएएफने महारष्ट्रा, केरळ, तेलंगणा, नागालँड आणि जम्मू-काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांसह संपूर्ण देशभरातील विविध राज्यांमध्ये प्रमुख ठिकाणी अत्यावश्यक औषधे आणि वस्तू विमानाने पोहोचवल्या आहेत.

भारतीय वायू दलाने डीआरडीओसाठी काही समर्पित उड्डाणे केली आहेत आणि डीआरडीओच्या उत्पादन सुविधा केंद्रांवर पीपीई सूटच्या उत्पादनासाठी विविध प्रमुख ठिकाणांवरून 9000 किलो आवश्यक कच्चा माल विमानाने वितरीत केला आहे. तसेच डीआरडीओद्वारे निर्मित N95/99 मास्कची देखील विमानाद्वारे वाहतूक करण्यात आली. दरम्यान, ही सगळी कार्ये करताना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून भारत सरकार द्वारे निर्दिष्ट केलेली सर्व काळजी घेतली जात आहे याबद्दल आयएएफने खात्री दिली आहे.

या महामारीमुळे देशभरात उद्भवलेल्या परिस्थिती विरुद्धच्या लढाईला पाठिंबा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गरजांची पूर्तता करण्यासाठी आयएएफ सदैव तयार आहे.

...Read More

V. S. News
नाशवंत वस्तूंच्या पुरवठ्यासाठी रेल्वेकडून पार्सल विशेष गाड्यांचे 67 मार्ग निश्चित

व्हिएस न्यूज - लॉक डाऊन सुरु झाल्यापासून रेल्वेने फळे, भाजीपाला,दुध, दुग्धजन्य उत्पादने यासारख्या नाशवंत वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आणि कृषी क्षेत्रासाठीच्या बियाण्याच्या वाहतुकीसाठीच्या पार्सल विशेष गाडीकरिता 67 मार्ग (134 गाड्या )निश्चित केले आहेत.

10 एप्रिल पर्यंत 62 मार्ग अधिसूचित करण्यात आले असून या मार्गावर 171 गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत. देशाच्या दिल्ली,मुंबई,चेन्नई,हैदराबाद, बेंगळूरू यासारख्या महत्वाच्या शहरांशी या पार्सल गाड्या जोडल्या आहेत.देशाच्या ईशान्य भागाला पुरवठा सुरळीत राहावा यासाठी गुवाहाटीशी दळणवळण सुनिश्चित करण्यात येत आहे. भोपाळ, अल्लाहाबाद, डेहराडून, वाराणसी, अहमदाबाद, वारंगळ, विजयवाडा, विशाखापत्तणम, रुरकेला, विलासपूर, भुसावळ, तातानगर, जयपूर, झाशी, आग्रा, नाशिक, नागपूर, अकोला, जळगाव, पुणे, सुरत, रायपुर, पटणा, कानपूर, जयपूर, बिकानेर, अजमेर, ग्वाल्हेर, मथुरा, नेल्लोर, जबलपूर यासारखी शहरेही या गाड्यांनी जोडली गेली आहेत. देशाचा कोणताही भाग या सेवेपासून वंचित राहू नये यासाठी,जिथे मागणी कमी आहे अशा भागातही या गाड्या धावत आहेत. या गाड्यांना वाटेत थांबे देण्यात आले आहेत. ज्यामुळे जास्तीत जास्त पार्सल पोहचवले जाऊ शकतील.

फळे, भाजीपाला,दुध, दुग्धजन्य उत्पादने यासारख्या नाशवंत वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आणि कृषी क्षेत्रासाठीच्या बियाण्याच्या वाहतुकीसाठीच्या पार्सल विशेष गाड्यांच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे सचिव आणि फलोत्पादन अभियान संचालक यांच्या समवेत व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. देशभरातील 76 वरिष्ठ अधिकारी या व्हिडीओ कॉन्फरन्सला उपस्थित होते.

या विशेष गाड्यांचा लाभ घेण्यासाठी संसाधने गतिमान करण्याचेआवाहन, संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे सचिव आणि राज्य अभियान संचालकाना करण्यात आले. राज्याकडून नव्या मार्गासाठी किंवा थांब्यासाठी मागणी करण्यात आली तर त्याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

विशेष गाडीचे वेळापत्रक, बुकिंगसाठीची प्रक्रिया,विविध विभागांच्या मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापकांची सूची,मालभाडे यासंदर्भातली सर्व माहिती व्यापक प्रसिद्धीसाठी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.

पार्सल विशेष गाडीसाठीची लिंक भारतीय रेल्वेच्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे-

indianrailways.gov.in

पार्सल विशेष गाडीसाठीची थेट लिंक अशी आहे-

https://enquiry.indianrail.gov.in/mntes/q?opt=TrainRunning&subOpt=splTrnDtl

...Read More

V. S. News
कोविड-19 शी संबंधित उपक्रमांबाबत CSR च्या म्हणजे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी खर्चाच्या पात्रतेविषयी कॉर्पोरेट मंत्रालयाला वारंवार विचारले जाणारे प्रश्न

व्हिएस न्युज - कोविड19 शी संबधित उपक्रमांबाबत सीएसआर म्हणजेच, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या खर्चविषयक पात्रतेसंबंधी कार्पोरेट मंत्रालयाला विविध हितसंबंधीयांकडून अनेक प्रश्न,/निवेदने प्राप्त होत आहेत. या सर्व प्रश्न आणि निवेदनांची दखल घेत, मंत्रालयाने वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे असा एक संच तयार केला आहे जेणेकरुन या संदर्भात विविध घटकांना असलेल्या समस्यांचे निराकरण होईल.

अनुक्रमांक .

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

उत्तरे

पीएम केअर्स फंड अंतर्गत केलेली मदत सीएसआर खर्च म्हणून पात्र ठरते का?

पीएम केअर्स निधी अंतर्गत दिले जाणारे योगदान, कंपनी कायदा 2013 च्या कलम सात अंतर्गत क्रमांक आठ तरतुदीनुसार सीएसआर खर्च म्हणून पात्र ठरतो. आणि या संदर्भात सविस्तर माहिती मंत्रालयाच्या निवेदन क्रमांक F. No. CSR-05/1/2020-CSR-MCA dated 28th March, 2020, मध्ये देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत कोविड-19 साठी केलेली मदत सीएसआर खर्च म्हणून पात्र ठरते का?

कंपनी कायदा 2013 च्या कलम सात अंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधी किंवा राज्य सहायता निधी चा समावेश करण्यात आलेला नाही, त्यामुळे हा निधी सीएसआर खर्च म्हणून पात्र ठरु शकत नाही.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत दिलेले योगदान सीएसआर खर्च म्हणून पात्र ठरू शकेल का?

कोविड-19 चा सामना करण्यासाठी मदत म्हणून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत दिलेले योगदान कंपनी कायदा 2013 च्या कलम सात मधील तरतूद आठ नुसार सीएसआर खर्च म्हणून पात्र ठरू शकेल. या संदर्भात सविस्तर माहिती, मंत्रालयाने 23 मार्च 2020 रोजी जारी केलेले परिपत्रक क्रमांक. 10/2020 मध्ये देण्यात आली आहे.

कोविड-19 साठी सीएसआर निधीतून करण्यात आलेला खर्च सीएसआर खर्च म्हणून पात्र ठरु शकेल का?

मंत्रालयाने आपल्या 23 मार्च 2020 च्या परिपत्रकात (क्रमांक. 10/2020) स्पष्ट केल्यानुसार , कोविड-19 साठी सीएसआर निधीतून करण्यात आलेला खर्च सीएसआर खर्च म्हणून पात्र ठरु शकेल. त्यापुढे सांगायचे झाल्यास, कोविड19 शी संबंधित कामे, ज्यात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि स्वच्छता तसेच आपत्ती व्यवस्थापन यासाठी केलेला खर्च कलम सात च्या एक आणि 2 तरतुदीनुसार पात्र ठरेल. तसेच, 18 जून 2018 ला जारी करण्यात आलेले परिपत्रक क्रमांक. 21/2014, कलम सात मध्ये नमूद वस्तू आणि कामे ढोबळ अर्थाने लिहिली असून या कामासाठी त्यांचे तसेच ढोबळ अन्वयार्थ काढता येतील.

कोविड19 मुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी आणि कामगारांना दिलेले वेतन/मजुरी, ज्यात कंत्राटी कामगारांच्या मजुरीचाही समावेश असेल; ते कंपनीच्या सीएसआर खर्चात समाविष्ट होऊ शकेल का?

सामान्य काळात कर्मचारी आणि कामगारांचे वेतन/मजुरी देणे ही कंपनीची करारबद्ध आणि कायदेशीर जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे, जर कंपनीतील कर्मचारी आणि कामगार यांचे उत्पन्नाचे दुसरे काही स्त्रोत नसतील, तर,लॉकडाऊनच्या काळात वेतन/मजुरी देणे ही देखील कंपन्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांचे वेतन/मजुरी सीएसआर खर्च म्हणून समविष्ट केली जाणार नाही.

कोविड19 मुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळात हंगामी कर्मचारी/रोजंदारीवरचे कामगार यांना दिलेले वेतन/मजुरी,कंपनीच्या सीएसआर खर्चात समाविष्ट होऊ शकेल का?

हंगामी कर्मचारी अथवा तात्पुरते कर्मचारी, रोजंदारीवरचे कामगार यांचे वेतन/मजुरी देणे ही कंपनीची नैतिक/मानवतावादी/ करारबद्ध जबाबदारी आहे आणि हे बंधन सर्व कंपन्यांना-मग त्यांच्यावर सीएसआर योगदान देण्याचे बंधन असो अथवा नसो, कंपनी कायदा 2013 च्या कलम 135 नुसार, सर्व कंपन्यांची ही जबाबदारी आहे.त्यानुसार, लॉकडाऊन काळात, तात्पुरत्या अथवा हंगामी कर्मचाऱ्यांना दिलेले वेतन/मजुरी सीएसआर उपक्रमात समाविष्ट होणार नाही.

तात्पुरत्या/ हंगामी/ रोजंदारीवर असलेल्या कर्मचारयांना देण्यात आलेले सानुग्रह अनुदान सीएसआर खर्चात समाविष्ट होऊ शकेल का?

जर, सानुग्रह अनुदानाची रक्कम तात्पुरत्या/हंगामी/रोजंदारी वर असलेले कर्मचारी/कामगारांच्या नियमित वेतन/मजुरीपेक्षा जास्त आणि विशेषत्वाने कोविड19 संदर्भात देण्यात आली असेल, तर हे अनुदान एकवेळचा अपवाद म्हणून सीएसआर उपक्रमात समविष्ट केले जाऊ शकेल, मात्र त्याची स्पष्ट सूचना कंपनीच्या नियामक मंडळाने जारी केली असावी, आणि लेखापालाने ती रक्कम प्रमाणित केली असायला हवी.

...Read More

V. S. News
यापूर्वी आपला मंत्र ‘जान है तो जहान है’ होता, पण आता ‘जान भी जहान भी' : पंतप्रधान

व्हिएस न्युज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड -19 चा सामना करण्यासाठी रणनीती आखण्याबाबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांबरोबर साधलेला हा तिसरा संवाद आहे, यापूर्वीचा संवाद 2 एप्रिल आणि 20 मार्च 2020 रोजी झाला होता.

पंतप्रधान म्हणाले की केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोविड -19 चा परिणाम कमी होण्यात नक्कीच मदत झाली आहे , परंतु परिस्थिती वेगाने बदलत असल्यामुळे सतत दक्षता घेणे अतिशय गरजेचे आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा परिणाम जाणून घेण्यासाठी पुढील 3-4 आठवडे अतिशय महत्वाचे असल्यावर त्यांनी भर दिला आणि त्याचबरोबर या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी टीमवर्क ही गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशात अत्यावश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा आहे आणि आघाडीवर काम करत असलेल्यांना संरक्षणात्मक आणि महत्वपूर्ण उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याबद्दल पंतप्रधानांनी आश्वस्त केले. तसेच काळा बाजार आणि साठेबाजी विरोधात त्यांनी कठोर संदेश दिला. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्यांवरील हल्ल्याचा तसेच ईशान्य आणि काश्मीरमधील विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाच्या घटनांचा पंतप्रधानांनी निषेध केला. अशा प्रकरणांचा निर्धाराने सामना करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लॉकडाउनचे उल्लंघन रोखणे आणि सामाजिक अंतर पाळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

लॉकडाउनमधून बाहेर पडण्याच्या योजनेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, लॉकडाऊनचा कालावधी आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याबाबत राज्यांमध्ये एकमत असल्याचे दिसतआहे. यापूर्वी सरकारचे ब्रीदवाक्य ‘जान है तो जहान है’ हे होते पण आता ते ‘जान भी जहान भी’ असे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्याबाबत आणि टेली-मेडिसिनद्वारे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याबाबत पंतप्रधानांनी सूचना केल्या. मंडईंमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी शेतीच्या उत्पादनांसाठी थेट विपणनास प्रोत्साहन दिले जाऊ शकते, यासाठी एपीएमसीच्या आदर्श कायद्यांमध्ये त्वरित सुधारणा करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दारात उत्पादनांची विक्री करण्यास मदत होईल.

आरोग्य सेतू ॲप मोठ्या संख्येने डाउनलोड होणे सुनिश्चित करण्यासाठी ते लोकप्रिय करायचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. दक्षिण कोरिया आणि सिंगापूर यांना कोविड ग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात कसे यश मिळाले याबाबत त्यांनी माहिती दिली. या अनुभवांच्या आधारे, अॅपच्या माध्यमातून भारताने स्वत: प्रयत्न केले आहेत जे महामारी विरुद्धच्या लढ्यात भारताचे एक आवश्यक साधन असेल , असे ते म्हणाले. अॅपचा ई-पास होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली ज्यामुळे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी प्रवासाची सुविधा मिळू शकेल.

आर्थिक आव्हानांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हे संकट म्हणजे स्वयंपूर्ण होण्याची आणि देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याची संधी आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील कोविड बाधित रुग्णांबाबत , सामाजिक अंतर राखण्याबाबत , आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची निर्मिती , स्थलांतरितांच्या अडचणी कमी करणे आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या महामारीचा विरुद्धच्या लढाईत संसाधनांना चालना देण्यासाठी त्यांनी केंद्राकडे आर्थिक आणि वित्तीय मदतीची देखील मागणी केली.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री, आरोग्यमंत्री, प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव आणि केंद्र सरकारचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
जी-20 ऊर्जा मंत्र्यांची असाधारण बैठक

व्हिएस न्युज - पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान 10 एप्रिल 2020 रोजी जी-20 ऊर्जा मंत्र्यांच्या असाधारण आभासी बैठकीत सहभागी झाले होते. जी -20 अध्यक्ष पदाच्या क्षमतेत आणि सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलाझीझ यांच्या अध्यक्षतेखाली सौदी अरेबियाने ही बैठक बोलविली होती. या बैठकीला जी-20 देशांचे ऊर्जा मंत्री, अतिथी देश आणि ओपीईसी, आयईए सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख बैठकीला उपस्थितीत होते.

जी-20 ऊर्जा मंत्र्यांनी स्थिर ऊर्जा बाजारपेठेची खात्री देणाऱ्या मार्गांवर आणि उपायांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागणीवर परिणाम होऊन मागणीत घट झाली आहे तसेच चालू असलेल्या अतिरिक्त उत्पादना संबधित अनेक बाबींमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -20 च्या आव्हानात्मक अडचणींवर मात करण्यासाठी विशेषत: असुरक्षिततेवर मात करण्यासाठी मानव-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.

या संदर्भात बोलतांना प्रधान यांनी २३ बिलियन अमेरिकन डॉलरच्या मदत पॅकेजचा भाग म्हणून उज्वला योजनेंतर्गत 80.3 मिलियन गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी सिलेंडर देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला अधोरेखित केले. भारत हे जागतिक उर्जेचे मागणी केंद्र होते आणि राहील यावर त्यांनी यावेळी जोर दिला. आमचा धोरणात्मक पेट्रोलियम साठा पूर्ण करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

चालू उर्जा बाजारपेठेच्या चढउतारांच्या संदर्भात मंत्री म्हणाले की, उत्पादकांसाठी वाजवी आणि ग्राहकांना परवडणाऱ्या अशा स्थिर तेल बाजारपेठेसाठी भारताने कायमच समर्थन केले आहे. दीर्घकालीन टिकवासाठी आवश्यक असलेल्या पुरवठा बाजूच्या घटकांमध्ये संतुलन साधण्यासाठी ओपेक आणि ओपेक प्लस देशांच्या सामूहिक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. उपभोग आधारित मागणी पुनर्प्राप्ती साठी तेलाच्या किंमती परवडणाऱ्या स्तरावर असाव्यात असा आग्रह त्यांनी यावेळी केला.

जी -20 ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत संयुक्त निवेदनाचा अवलंब केला जाईल, ज्यात पुढील टप्प्यांवरील जी -20 ऊर्जा मंत्र्यांना सल्ला देण्यासाठी कृती दल स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये त्यामध्ये क्रियाशील राहण्याचे मान्य करण्यात आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!