व्हीएस न्युज - पिंपरीच्या मिलिंद नगर परिसरात ६ दुचाकी गाड्या जळल्याची घटना घडली आहे.पहाटे चार च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.परंतु अद्याप गाड्या जाळल्या गेल्या की,शॉर्ट सर्किटमुळे घटना घडली हे अस्पष्ट आहे.या घटने दुचाकीसह कपडे आणि घरातील साहित्य जळाले आहे.या घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरी च्या मिलिंद नगर परिसरातील कपिला हाऊसिंग सोसायटी येथील इमारतीच्या घरासमोर पार्क केलेल्या गाड्यांना पहाटे अचानक आग लागली.यामुळे परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू झाली.या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना स्थानिक नागरिकांनी दिली.त्यानुसार तातडीने घटनास्थळी येऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.या घटनेत ऐकून ६ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
दरम्यान इमारतीच्या तळ मजल्याला घर आहेत.गाड्या लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नाही.त्यामुळे येथील नागरिक आपापल्या घरासमोर दुचाकी पार्क करतात.पहाटे अचानक दुचाकी गाड्यांना आग लागली यात दुचाकीसह शेजारील घरातील कपडे आणि साहित्य जळाले आहे.यात ऐकून चार लाख रुपयांच नुकसान झालं आहे अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी भगवान यमगर यांनी दिली आहे.दुचाकी गाड्या शॉर्ट सर्किटमुळे जळाल्या आहेत की काही समाज कंटकांनी पेटवून दिल्या हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.परंतु गाड्या पेटवून दिल्या असाव्यात असा संशय अग्निशमन दलाचे अधिकारी यमगर यांनी व्यक्त केला आहे.याचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीसाठी अभिनेत्री व राज्यसभा खासदार रेखा यांनी खासदार निधीतून तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यापैकी दोन कोटी २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता महापालिकेकडे वर्ग झाला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाम लांडे यांनी पाठपुरावा केला आहे.
कासारवाडी येथील सर्व्हे क्रमांक 420 येथील छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिराच्या आवारात पाच मजली शाळेच्या इमारतीचे काम सुरू आहे. यामध्ये 41 खोल्या असणार आहेत. प्रत्येक मजल्यावर मुली, मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छातागृह, प्रयोगशाळा, ग्रंथालय देखील आहे. या शाळेच्या इमारतीसाठी 13 कोटी 71 लाख 32 हजार 197 रुपये खर्च आहे.
या शाळेच्या बांधकामासाठी खासदार निधीतून मदत करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक शाम लांडे यांनी खासदार व अभिनेत्री रेखा यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी खासदार निधीतून तीन कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहे. त्याचा 2 कोटी 25 लाखांचा पहिला हप्ता 31 ऑक्टोबर रोजी महापालिकेकडे वर्ग केली आहे. उर्वरित 75 लाख रूपये शाळेचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरसेवक लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
व्हीएस न्युज - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन कांदा घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. भरधाव वेगात मुंबईच्या दिशेने निघालेला हा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरुन थेट खाली कोसळला. यामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला असून चालक आणि क्लिनर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, द्रुतगतीमार्गावरून जात असताना वलवन एक्झिट येथे हा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरुन थेट खाली जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कोसळला. यात चालक आणि क्लिनर हे गंभीर जखमी झाले मात्र, त्यांना मदत करायची सोडून परिसरातील नागरिकांनी पुलाखाली अस्ताव्यस्त पडलेला कांदा गोळा करायला गर्दी केली. लोकांना कांदा घेऊन जाणारा ट्रक कोसळल्याचे कळताच ते घरातून पिशव्या, मोठ्या गोण्या घेऊन घटनास्थळी आले. तसेच हा फुकटात मिळणारा कांदा आपल्या पिशव्यांमध्ये भरण्यातच मग्न होते, अशी माहिती लोणावळा पोलीसांनी दिली. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर जुना पुणे-मुंबई महामार्ग अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
या अपघाताची माहिती कळताच लोणावळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच गंभीर जखमी असलेल्या चालक आणि क्लीनरला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर अर्ध्या तासाने वाहून सुरळीत झाली.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड येथील कुदळवाडी चिखली येथे फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. कंपनीत कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
तब्बल साडेचार तासानंतर आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण आणले. अक्षय सुरेश बाफना आणि सुरेश दलीचंद बाफना यांच्या मालकीची ही कंपनी आहे. पिंपरी-चिंचवड येथील कुदळवाडी चिखली येथे फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. कंपनीत कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. तब्बल साडेचार तासानंतर आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण आणले. अक्षय सुरेश बाफना आणि सुरेश दलीचंद बाफना यांच्या मालकीची ही कंपनी आहे.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बाराच्या सुमारास पंचशील फिल्टर्स या कंपनीला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे भीषण आग लागली. या घटनेची माहिती राजू गर्जे नावाच्या व्यक्तीने अग्निशमन दलाच्या विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. परंतु आग मोठी असल्याने पिंपरी, भोसरी, चिखली, तळवडे, प्राधिकरण, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी, पुणे मनपा या अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले. मात्र पाणी कमी पडत असल्याने अखेर बजाज कंपनी, टाटा मोटर्स, चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, मोशी या ठिकाणच्या पाण्याचे टँकर पाणी पुरवठा करत होते. असे एकूण १५ ते २० टँकर आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर पहाटे साडेचार वाजता नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीत प्लास्टिक आणि कागदाचे साहित्य मोठ्या प्रमाणावर होते. ते आगीत जळून खाक झाले आहे.
या भीषण आगीमुळे कुदळवाडी चिखली परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करावा लागला होता. यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरवर याचा परिणाम झाला होता. या कंपनीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. तसेच कंपनीमध्ये केवळ एकच सुरक्षा रक्षक होता, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी येथील संत तुकाराम नगर परिसरात असलेली गोल भाजी मंडई ही भाजी मंडई राहिली नसून वसाहत झाली असल्याचे निदर्शनास येते. या इमारतीचे नाव गोल भाजी मंडई हे फक्त नाम मात्र राहिले आहे.या ठिकाणी भाजी विकण्याचा व्यावसाय कमी तर केशकर्तनाचा व्यावसाय जास्त प्रमाणात केला जातो. या ठिकाणी प्रत्येक शलून मध्ये किमान 12 ते 15 कामगार काम करतात, आश्चर्य म्हणजे हा सर्व कामगार वर्ग गोल भाजी मंडईतच राहतो,म्हणुन या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे.
प्रातविधी साठी, स्नानासाठी, भांडी व कपडे धुण्यासाठी प्रतेक कामासाठी पाण्याची नासाडी होते. इमारतीच्या आतील बाजूस कपडे वाळत घातलेले असतात. दुकानातील कचरा, शांपूचे पाकीट, टिश्यू पेपर इमारतीच्या चेंबर मध्ये टाकले जातात म्हणुन सांड पाणी साचून मंडईत दुर्गंधी पसरत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मालमत्ता कर विभागाचे कार्यालय आहे. कटींग केलेले केस गोल मंडईच्या परिसरात फेकले जातात. अनेकवेळा तक्रार करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत आहे असे स्थानिक नागरिक मत आहे.
भाजीत केस आढळून येत असल्याने ग्राहक सुद्धा गोल भाजी मंडईतून भाजी घेण्यास काचकूच करतात, याचाच परिणाम म्हणजे भाजी व फळ विक्रेते हातगाडी रस्त्यावर लावतात आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
पिंपरी चिंचवड मध्ये खुनाचे, चोरीचे, बलात्काराचे प्रमाण जास्त असतानाही पोलीस प्रशासन अश्या ठिकाणच्या सलून, हॉटेल्स, दुकानान मध्ये काम करणार्या परप्रांतीय कामगारांची पोलिस पडताळणी करण्याची सक्ती का करत नाही असा प्रश्न स्थानिक नागरिकांना मनात उद्भवत आहे. सलून मालकांनी ग्राहकाच्या सोई साठी बर्याच ठीकाणी अतिक्रमण करुन आलिशान वातानुकूलित सलून थाटले पण कामगारांची राहण्याची व्यवस्था करायला विसरलेच असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. या इमारतीच्या हद्दीत प्रतेक मजल्यावर अतिक्रमण केलेले आहे.
गोल भाजी मंडई मध्ये आणि जवळपासच्या परिसरात अगदी हाकेच्या अंतरावर शासकीय रुग्णालय, शाळा,महाविद्यालय, बुद्धविहार दाट लोकवस्ती असतानाही बीअर शॉपी आणि बीअर बारचा व्यवसाय सर्रासपणे करण्यात येत आहे.
गोल भाजी मंडई म्हणजे रात्री उशिरा पर्यंत दारू आणि गांजा पिण्याचे ठिकाण झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांन कडून मिळाली.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड परिसरातील संघटीत व असंघटीत कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने येत्या शनिवारी (दि. 3 नोव्हेंबर) रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे दुपारी 3 वाजता ‘कामगार परिषदेचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत निमंत्रक व माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, समन्वयक दिलीप पवार, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, कामगार नेते महेश डोंगरे, महाद्रंग वाघेरे, चारुशिला जोशी, मनोज माछरे, सुनिल पाटसकर, पद्मजा पवार, दामोदर वहिले, योगेश कोंढाळकर, किरण देशमुख, रविंद्र घाडगे, सुरेश काशीद, संतोष नाणेकर, हरप्रित सलुजा, फझल शेख आदी उपस्थित होते. या कामगार परिषदेचे उद्घाटन किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीष बापट मार्गदर्शन करणार आहेत. खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढाळराव पाटील, सुप्रिया सुळे, अमर साबळे, अनिल शिरोळे, महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ॲड. गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे, सुरेश गोरे, संग्राम थोपटे, पिंपरी चिंचवड मनपाचे पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने उपस्थित राहणार आहेत. कामगार नेते अजित अभ्यंकर, सी. श्रीकुमार, अरविंद श्रोत्री, कैलास कदम, मेघा थत्ते, बबन झिंजुर्डे, बाबा कांबळे, विजय पाळेकर, मारुती जगदाळे, उदय भट आदी मार्गदर्शन करणार आहेत.
या कामगार परिषदेत केंद्र व राज्य सरकारने कामगार कायद्यात केलेले बदल, राष्ट्रीय रोजगार वृध्दी मिशन (नीम), आय.टी, संरक्षण खात्यातील, एमआयडीसीतील तसेच इतर क्षेत्रातील संघटीत व असंघटीत कामगारांच्या विविध प्रश्नांविषयी चर्चा केली जाणार आहे. संसद व विधीमंडळात नेतृत्व करणा-या लोकप्रतिनिधींसमोर हि चर्चा व्हावी व भविष्यात त्यांनी सभागृहात कामगारांना भेडसावणा-या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी प्रयत्न करावेत हा या कामगार परिषद आयोजित करण्यामागे उद्देश आहे.
यावेळी एच.ए., नीम, संरक्षण खात्यात परकीय गुंतवणूक त्यामुळे कामगारांचे भवितव्य, एमआयडीसीत कामगारांची होणारी फसवणूक, कंत्राटी कामगार, कमवा शिका योजना, ईएसआय योजना, पेन्शन, ग्रॅच्युईटी, महागाई भत्ता, वेतनवाढ करार, व्यवसाय कर, घरेलू कामगार, आयटीमधील कामगार, कामगार आयुक्तालयाशी संबंधीत प्रश्न आदी विषयांवर साधक बाधक चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. परिषदेत झालेल्या चिंतनानंतर सर्व कामगार संघटनांना एका व्यासपिठावर आणून त्यांचा एकत्रित फोरम तयार करण्यात येईल. या परिषदेत पिंपरी चिंचवड, मावळ, मुळशी, चाकण, हिंजवडी परिसरातील सर्व कामगार संघटनांचे प्रतिनिधी व कामगारांनी उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे निमंत्रक अरुण बो-हाडे यांनी केले आहे.
व्हिएस न्युज - संगमवाडी परिसरात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बॉम्बे सॅपर्स येथील वेपन ट्रेनिंग सेंटरच्या आवारातील मोकळ्या जागेत एका युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. सोमवारी (29 ऑक्टोबर) ही घटना उघडकीस आली. नरसिंग कुमार गर्ग (वय 38 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानमधील रहिवासी होता.
याप्रकरणी पोलिसांनी दुर्गेश गोस्वामी (वय29 वर्ष) अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग गर्ग आणि दुर्गेश गोस्वामी हे दोघेही सुतारकामाचा व्यवसाय करत होते. या सुतारकामाचे २ हजार रुपये गर्ग याने गोस्वामी याला द्यायचे होते. पण तो पैसे देत नव्हता. रविवारी गोस्वामी याने त्याच्याकडे पुन्हा पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने गोस्वामीला लोहगावहून बोलावून घेतले. रात्री दोघंही दारू प्यायले. यावेळी गर्गने त्याला १ हजार रुपये दिले. त्यानंतर दोघंही घरी जात असताना संगमवाडी येथे त्यांच्यात पुन्हा पैशाने वाद झाला. गोस्वामी याने आणखी एक हजार रुपये दे, असे त्याला सांगितले. वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यावेळेस गर्ग जमिनीवर पडला. तेव्हा गोस्वामीने दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. या घटनेत गर्गचा जागीच मृत्यू झाला. त्याला ठार करुन गोस्वामी लोहगावला घरी पसार झाला.
दरम्यान, संगमवाडी येथे एकाची हत्या झाल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपासाची चक्रे भराभर फिरवली आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे गोस्वामीचं घर गाठलं. गोस्वामीकडून पोलिसांनी गर्गचे पाकिट, मोबाइल जप्त केले आणि त्याला बेड्या ठोकल्या.
व्हिएस न्युज - वाळू ट्रक चालकास आडवून त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार न दाखल करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करून त्यापैकी १० हजार रुपये घेऊन गेल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या (आठवले गट) वाहतूक आघाडीच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील एका ट्रक चालकाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अॅड. मुकेश बी. शहारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास विश्रांतवाडीच्या मच्छी मार्केटजवळील बनाना लिफ हॉटेलच्या समोर हा प्रकार घडला. फिर्यादी हे वाळूचा ट्रक घेऊन जात असताना आरोपी मुकेश शहारे याने ट्रक आडवून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. जर खंडणी दिली नाही तर पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली. तसेच जाताना १० हजार रुपये घेऊन गेल्याने आरोपी मुकेश शहारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास फौजदार बोरसे करीत आहेत.
व्हीएस न्युज - क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावणार्यांवर पिंपरी पोलीसांनी कारवाई केली. पाकिस्तान विरूध्द ऑस्टेलिया यांच्यातील टी २० सामन्यावर सट्टा घेत असताना वैभवनगर येथील आरोपींच्या राहत्या घरी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. (राम गोवर्धन बजाज, वय ४४ रा. वैभवनगर पिंपरी), (गोविंद प्रभुदास ललवानी, वय ४१, रा. वैष्णवीदेवी मंदीरा जवळ, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजांची नावे आहेत.
या कारवाईक त्यांच्याकडून एलईडी टिव्ही, सेट ऑफ बॉक्स, १६ मोबाईल हँन्डसेट, वही, पेन्सिल, प्लँस्टिक टेबल, टेबल कव्हर, इलेक्ट्रीक वायर, व्हाईस रेकॉर्डर, मोबाईल चार्जिंग हब, मोबाईल चार्जिंग बॉक्स, लँपटॉप व चार्जर, रोख रक्कम असा एकूण २ लाख २३ ७१६ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक व्ही.बी. बढे पुढील तपास करत आहेत.
व्हिएस न्युज - महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक दीपक मानकर जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्याप्रकरणी मागील काही महिन्यापासून अटकेत आहेत. या प्रकरणाचा तपास चालू असतानाच आता कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये मानकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून जमीन विक्री करून यातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मानकर यांच्यासह साधना वर्तक, मुकुंद माधवराव दीक्षित यांचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिती दीक्षित यांच्या शिवाजीनगर, पिंपरी वाघिरे, साधू वासवानी चौकातील जागेची बनावट कागदपत्रे तयार करून त्याची विक्री करण्यात आली. या जमीन विक्रीतून मिळालेले कोट्यवधी रुपये दीपक मानकर, साधना वर्तक आणि मुकुंद दीक्षित यांनी घेतले. ही जागा आपल्या मालकीची असताना त्या जागेच्या विक्रीतून मिळालेले पैसे आपल्याला देण्यात आले नाहीत अशी तक्रार आदिती दीक्षित यांनी दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र या प्रकरणामुळे दिपक मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असल्याचे चित्र आहे.
व्हीएस न्युज - शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शाब्दीक वादावादीचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले आहेत. शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे.
आज कोल्हापूरात अजित पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक ५वर्षे का रेंगाळले ? हा माझा प्रश्न चुकीचा नव्हता. स्पष्ट बोलल्यानेच त्यांना कोल्हापुरी मिरची झोंबली, असा शिवसेनेवर पलटवार केला. त्यानंतर पुण्यातील अभिनव चौकात सामना ऑफिस समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली सामना पेपरच्या काही प्रती जाळण्यात आल्या.
सामना ऑफिस समोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून शिवसैनिक देखील ऑफिस समोर आले आहेत. युवा एल्गार मेळावा संपल्यानंतर कोल्हापुरातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामनाच्या प्रतीचे दहन केले.
काय म्हटले शिवसेनेने
अजित पवारांची खोपडी रिकामी असून ते एक गटारी किडा आहे. गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. भ्रष्टाचाराच्याच प्राणवायूवर जगतो. अशा व्यक्तीस आम्ही किंमत देत नाही, काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू असून या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही, हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात, अशा शब्दात शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली.
व्हीएस न्युज - मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे या सामाजिक संघटनेचे 9 वे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी दि. 27 व रविवारी 28 ऑक्टोबर पीएनपी हॉल, अलिबाग, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आले करण्यात आले आहे. या अधिवेशनास पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरातुन हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे राज्य समन्वयक शांमाराम कुंजीर, राज्य संघटक रमेश हांडे, पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, पिंपरी चिंचवड महानगराध्यक्ष सुधीर दामोदर पुंडे यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (दि. 27) सकाळी 9 वाजता पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पद शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, पंडीत पाटील, धैर्यशिल पाटील, प्रशांत ठाकुर, माजी आमदार हसन मुश्रीफ, मिनाक्षीतार्इ पाटील तसेच मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए. इनामदार, बीआरएसपीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने, अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नार्इक आदी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनाच्या सुरुवातीला शिवशाहिर राजेंद्र कांबळे यांचा पोवाडा होणार आहे. दुपारच्या सत्रात दुपारी ‘आर्थिक सक्षमीकरण, आणि कृषी व उद्योग व्यवसायातील संधी’ या विषयावर उद्योजक राजेंद्र धुरगुडे-पाटील, उद्योजक मासिकचे संपादक धर्मेंद्र पवार, मिटकॉनचे मुख्यव्यवस्थापक गणेश खामगळ, नाशिकच्या सह्याद्री फाऊंडेशनचे विलास शिंदे, उद्योजक मनोज कदम मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार बाळाराम पाटील, भरतशेठ गोगावले, अनिकेत तटकरे, सुरेश लाड, उद्योजक जे. एम. म्हेत्रे व चित्रलेखा पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3:30 वाजता ‘दहशतवादाचे बदलते स्वरूप’; ‘भिमा कोरेगाव दंगल प्रकरण’; ‘सनातन संस्था समाजसुधारकांच्या झालेल्या हत्या’ आदी विषयांवर आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आयपीएस अधिकारी एस. एम. मुश्रीफ, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अमोल मिटकरी व प्रवक्ता यशवंत गोसावी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार निरंजन डावखरे, आमदार अवधुत तटकरे, आमदार मनोहरशेठ भोर्इर आदी उपस्थ्ति राहणार आहेत. सांयकाळी 5:30 वाजता ‘मोर्च पे चर्चा’; ‘मराठा समाजाने काढलेले मोर्चे’; ‘महाराष्ट्रात निघालेले बहुजन क्रांती मोर्चे’; ‘मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षण यापुढील समस्या’ या विषयांवर बामसेफचे नेते कुमार काळे, अखिल भारतीय मराठा महासंघचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, ओबीसी सेवा संघाचे प्रदिप ढोबळे, महाराष्ट्र मुस्लिम संघाचे अध्यक्ष फकीर मोहम्मद ठाकूर यांच्याशी झी चोविस तासचे निवेदक अजित चव्हाण संवाद साधणार आहेत.
रविवारी (दि.28) सकाळी 9 ते 10 प्रत्येक जिल्हा पदाधिका-यांचे मनोगत होणार आहे. सकाळी 10 वाजता ‘समाजकारण व राजकारणातील वर्तमान स्थिती’; ‘गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकारण’; ‘आर्थिकतेतून होणारे राजकारण लोकशाहिस मारक’; राजकारणाकडे युवकांचा पाहण्याचा दृष्टीकोन या विषयांवर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता श्रीमंत कोकाटे, राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार, ज्येष्ठ व्याख्याते प्रदिप सोळुंके मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 11: 30 वाजता ‘प्रचार, प्रसार माध्यमे व सोशल मिडीयाचे अनन्य साधारण महत्व’ विषयांवर ज्येष्ठ पत्रकार ब्रम्हा चट्टे पाटील, रविकांत वर्पे, राजकुमार घोगरे, भय्या पाटील, महादेव बारगुडे, अनिल माने आदी मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2 वाजता अशिवेशानाच्या समारोप सत्रात प्रमुख पाहुणे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार रणजितसिंह माहिते पाटील, बारामती ॲग्रोचे रोहीत राजेंद्र पवार, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील आणि अध्यक्षपदी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रविणदादा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठा सेवा संघाचे महासचिव विजय कुमार ठुबे, मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष विजय घोगरे, उद्योजक जेएम म्हात्रे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, ज्येष्ठ व्याख्याते प्रदिप साळुंखे, मराठा आंदोलक महिला नेत्या जयश्रीताई शेळके, राष्ट्रमाता जिजाऊ तैलचित्राचे निर्माते बंडूभाऊ मोरे, ॲड. समीर घाटवे, संजय उरमोडे यांना मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशीही माहिती पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे व पिंपरी चिंचवड महानगराध्यक्ष सुधिर दामोदर पुंडे यांनी दिली. तसेच अधिवेशनासाठी पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हातुन बहुसंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे राज्य समन्वयक शांमाराम कुंजीर, राज्य संघटक रमेश हांडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोदसिंह गोतराणे यांनी केले. यावेळी शहर उपाध्यक्ष प्रविण बोर्हाडे, लहुजी लांडगे, किर्तीसिंह कोरेकर, गणेश दहिभाते, विशाल जरे, वैभव जाधव, गौतम दिवे, रशिद सय्यद, गणेश गारगोटे, शिवाजी बोत्रे, स्वप्नील वर्पे, ॠषिकेश वाजगे, अॅड. संतोष दाते, बाळासाहेब साने, गौतम डावखर, सतिश काळे सोमनाथ बोत्रे, प्रतिक कांबळे, भैय्यासाहेब गजधने, अमोल मानकर, अंतिम जाधव, अक्षय गायकवाड, सुमित वाघमारे,विनोद साळुंके आदी उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002