व्हीएस न्युज - विश्व हिंदू परिषद बजरंग दल पिंपरी चिंचवड शहर विभागाच्या वतीने रविवारी (दि. 28) शहरात व मावळ विभागात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 2 नोव्हेंबर 1990 रोजी कारसेवकांवर झालेल्या गोळीबारात हौताम्य प्राप्त झालेले कोठारी बंधू आणि हजारों रामभक्तांच्या स्मरणार्थ घेण्यात येणा-या या शिबीरात रक्तदान करण्या-या सर्वांना बजरंग दलाच्या वतीने टी शर्ट भेट देण्यात येणार आहेत. अशी माहिती बजरंग दल प्रांत संयोजक लहुजी धोत्रे, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संदेश भेगडे यांनी गुरुवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल साठे, विश्व हिंदू परिषदेचे शहर मंत्री नितीन वाटकर, बजरंग दल शहर संयोजक नाना सावंत तसेच सागर चव्हाण, अभिजीत शिंदे आदी उपस्थित होते.
संदेश भेगडे यांनी सांगितले की, बजरंग दल देव, देश, धर्म रक्षणाकरीता सेवा, सुरक्षा, संस्काराच्या माध्यमातून सदैव कार्य करीत आहे. राम जन्मभूमी येथे कारसेवकांवर 2 नोव्हेंबर 1990 रोजी गोळीबार करण्यात आला त्यावेळी कोठारी कुटूंबातील दोन सख्ये भाऊ आणि हजारो रामभक्तांना हौताम्य प्राप्त झाले. त्यांच्या स्मरणार्थ श्रध्दांजली वाहण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल गेल्या अनेक वर्षांपासून देशभर महारक्तदान शिबीराचे आयोजन करते. या महायज्ञात लाखों रक्तदाते उर्स्फुतपणे सहभागी होऊन रक्तदान करतात.
संकलित रक्त आवश्यक त्या सैनिकांना देशभरातील मिलेट्री हॉस्पीटलला आणि गरजू रुग्णांना देण्यात येते. या महारक्तदान शिबीराअंतर्गत पिंपरी गावात सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भैरवनाथ मंदीर येथे रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच चिंचवड - मनपा शाळा वाल्हेकरवाडी चौक आणि केंद्राई गो शाळा सुदर्शन नगर, भोसरी - सखुबाई गवळी उद्यान, मोशी - भारत माता चौक, चिंबळी - जिल्हा परिषद शाळा, चिखली - विठ्ठल रुखमाई मंदीर आणि घरकुल वसाहत, निगडी - सिध्दी विनायक नगरी, आकुर्डी - संजय काळे मैदान, कासारवाडी - गणेश मंदीरासमोर शास्त्रीनगर, थेरगाव - बोट क्लब रोड दत्तनगर, शिवमंदीर गणेश नगर, गणपती मंदीर भोरडेनगर, साई मंदीर थेरगाव गावठाण, वाकड - म्हातोबा मंदीर, पिंपळे सौदागर - महादेव मंदीर पोलिस चौकीसमोर, पिंपळे गुरव - ज्येष्ठ नागरिक संघ सुदर्शन नगर, बोपखेल - मारुती मंदीर, दापोडी - हनुमान मंदीर दापोडी गावठाण, सांगवी - नरसिंह हायस्कुल, रहाटणी - नखाते वस्ती, काळेवाडी - विठ्ठल रुख्मीनी मंदीर, इंद्रायणी नगर - मिनी मार्केट इंद्रायणी नगर, यमुनानगर - सावित्रीबाई फुले बिल्डींग, रुपीनगर - हनुमाननगर अशा सत्तावीस ठिकाणी आणि मावळ विभागात सतरा ठिकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महापालिका सभेत कृत्रिम पाणी टंचाईवरून तब्बल ६ तास चर्चा झाली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल चढविला, परंतू नेमके पाणी मुरतयं कुठे? याचा उलघडा त्यावेळी आयुक्तांकडून झाला नव्हता. आज आयुक्तांनी या अपुऱ्या पाणी पुरवठ्याचे ‘खापर’ अनधिकृत नळजोड धारकांवर फोडले. शहरात दररोज होत असलेल्या पाणी पुरवठ्या पैकी तब्बल ३८ टक्के पाण्याची गळती आणि चोरी होत असल्याचा ‘धक्कादायक’ खुलासा त्यांनी केला.
३१ ऑक्टोंबरपासून अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून या विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्याचे सांगत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एकप्रकारे अघोषित ‘पाणीबाणी’ जाहीर केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात होत असलेल्या विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून महासभेत नगरसेवकांनी अनेक तक्रारी केल्या.
यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी परतीचा पाऊस झालेला नाही. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे रावेत बंधाऱ्यात पाणी न आल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याच्या घटना गेल्या महिन्यात अनेकदा घडल्यात. धरणात पाणी असले तरी वर्षभर पुरवायचे आहे. १ एप्रिल २०१७ पासून शहरात ५० हजार नवीन नळ कनेक्शन दिले असून सुमारे ३ लाखाने लोकसंख्या वाढली आहे. शहरात अनधिकृत नळजोड मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे पाणी गळतीही वाढली असून पाणी दुषित होत आहे. अशा सर्व अनधिकृत नळजोड धारकांचे सर्व्हे सुरू आहेत. शहरातील या सर्व अनधिकृत नळजोड धारकांनी ३१ ऑक्टोंबर पर्यंत पालिकेला कळवून त्यांचे कनेक्शन दंड भरून अधिकृत करून घ्यावेत. अन्यथा ३१ ऑक्टोंबर पासून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कृत्रिम पाणी टंचाई होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. शहरात जर कोणी बांधकामांकरिता पाण्याचा गैरवापर करत असेल तर दंडात्मक कारवाई केली जाईल.
२४x७ पाणी पुरवठ्याचे काम असमाधानकारक दिसल्यास ठेकेदारावर कठोर कारवाई केली जाईल. आंध्रा, भामा आसखेड तसेच पवना बंद पाईप लाईनच्या कामाचा पाठपुरावा सुरू आहे. पुढील १० दिवस पाणी पुरवठ्याशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात. शहरात मोटार पंप लाऊन पाणी चोरणाऱ्यांची शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या कारवाई दरम्यान राजकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी शेवटी बोलताना स्पष्ट केले.
व्हिएस न्युज - चिंचवड दळवीनगर झोपडपट्टीत गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला असून या अग्नितांडवात पाच घरं जळून खाक झाली आहेत. प्रदीप मेटे आणि शंकर क्षीरसागर अशी या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
दळवीनगर झोपडपट्टीतील एका घरात गुरुवारी पहाटे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे भीषण आग लागली. ही आग लगतच्या घरांमध्येही पसरली. या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून आगीत पाच घरं जळून खाक झाली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
समलिंगी मित्राच्या घरी जाणं जीवावर बेतलं
आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या दोघांतील शंकर क्षीरसागर हा तृतीयपंथी आहे, त्यांना भेटण्यासाठी प्रदीप मोटे हे रात्री उशिरा आले होते. रात्री प्रदीप आला आणि अचानक पहाटे ही भीषण घटना घडली यात प्रदीप आणि शंकर यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शंकर क्षीरसागर हा तृतीय पंथी आहे, त्यांना भेटण्यासाठी प्रदीप मोटे हे रात्री आले होते.
रात्री प्रदीप आला आणि अचानक पहाटे ही भीषण घटना घडली यात प्रदीप आणि शंकर यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शंकर सोबत भाचा,आई,बहीण,दाजी हे सर्व एकत्र घरात राहतात ते या भीषण अपघातातून बचावले आहेत. प्रदीप आणि शंकर यांच्यात चांगले मैत्रीचे संबंध होते. अशी माहिती चिंचवड पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक व्ही.व्ही.खुळे यांनी दिली आहे.
व्हीएस न्युज - प्रभाग क्र २७ काळेवाडी राहटणीतील आदिनाथ कॉलनी येथील परिसरात पालिकेने चालु केलेल्या ड्रेनेज लाईनच्या दुरूस्तीचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना तिरोडा मतदार संघाचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी "ग" प्रभाग मुख्य अधिकारी (थेरगाव) सौ. झगडे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती.
या मागणीची दखल घेत ‘ग प्रभाग’ क्षेत्रीय प्रशासन अधिकारी यांनी स्थापत्य (ड्रेनेज दुरूस्ती) विभागाकडुन श्रीनगरमधील आदिनाथ कॉलनीमध्ये ड्रेनेज दुरूस्तीचे काम हाती घेउन पूर्ण केले आहे.
कामाच्या दिरंगाईमुळे कॉलनीतील महिला, जेष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थीं यांना मनस्ताप सहन करावा लागत होता, तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते व साथीच्या रोगांना आयतेच निमंत्रण मिळत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, शिवसेना तिरोडा मतदार संघाचे संपर्कप्रमुख युवराज दाखले, रहाटणी उपविभागप्रमुख प्रदिप दळवी, रहाटणी शाखा प्रमुख अंकुश कोळेकर आदींच्यावतीने प्रशासनाकडे पाठपुरावा चालू होता. प्रशासनाने प्रभागातील ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ पूर्ण न केल्यास, खोदकाम केलेल्या जागी वृक्षारोपण करू असा इशारा देण्यात आला होता.
त्यामुळे शिवसेनेच्या मागणीची दखल घेत ‘ग प्रभाग’ अधिकारी’ सौ. झगडे यांनी प्रशासनाच्या माध्यमातून या परिसरातील काम पूर्ण केले आहे.
परिसरातील नागरिकांच्या वतीने युवराज दाखले आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांका पालिका प्रशासनाचे आणि ‘ग प्रभाग’ अधिकारी’ सौ. झगडे यांचे आभार मानले असून, केलेल्या कामाचे समाधान व्यक्त केले आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या १६ पोलीस निरीक्षक, ४३ फौजदार आणि सहायक पोलीस निरीक्षकांच्या सोमवारी वारी अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. यामध्ये ९ सहायक पोलीस निरीक्षक तर ३४ फौजदारांचा समावेश आहे.
बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांच्या यादीत खालील नावांचा समावेश आहे. (कंसात बदलीचे ठिकाण)
सतीश पवार (देहूरोड तळेगाव वाहतूक विभाग), शहाजी पवार (पिंपरी पोलीस स्टेशन), सुनील दहिफळे (चाकण पोलीस स्टेशन), प्रकाश जाधव (नियंत्रण कक्ष), अजय जोगदंड (विशेष शाखा), पांडुरंग गोफणे (भोसरी पोलीस स्टेशन), विठ्ठल कुबडे (आळंदी-दिघी वाहतूक विभाग), राजेंद्र निकाळजे (तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन), रविंद्र जोंधळे (विशेष शाखा व अतिरिक्त पदभार पिंपरी-चिंचवड अतिक्रमण विभाग), अमरनाथ वाघमोडे (देहूरोड गुन्हे व प्रशासन), अजय भोसले (निगडी पोलीस स्टेशन), मसाजी काळे (चिखली पोलीस स्टेशन), बालाजी सोनटक्के (एमओबी व पीसीबी), सुधाकर काटे (युनीट २ व सायबर गुन्हे), सुधीर अस्पत (खंडणी व दरोडा) व श्रीराम पोळ (अंमली पदार्थ व आर्थिक गुन्हे)
व्हीएस न्युज - कोंढवा पोलीस ठाण्याचे तात्कालीन वरिष्ठ निरीक्षक मिलींद वसंतराव गायकवाड यांची राजकीय हेतूने बदली केल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणाऱ्या शिवसेनेच्या माजी आमदार, राष्ट्रवादीचे माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक, नगरसेविकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक गणेश कामठे, गंगाधर बधे, नगरसेविका संगिता ठोसर, समीर तुपे आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नारायण लोणकर, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी नगरसेवक जालिंदर कामठे, रशीद शेख, नगरसेविका नंदा लोणकर, संजय लोणकर, फिरोज शेख, राकेश कामठे आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवसेना जनसंपर्क कार्यालय कोंढवा ते कोंढवा पोलीस स्टेशनपर्यंत विनापरवाना बेकायदेशीर मोर्चाचे आयोजन करुन स्पीकर द्वारे भाषण करुन बेकायदेशीर जमाव जमवुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनीदिलेल्या नोटिसीचा भंग करुन तसेच सह पोलीस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
व्हीएस न्युज - विमान खरेदीत केंद्राने 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून तो जागतिक स्तरावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (ता.21) पिंपरी चिंचवड येथे केला. या मोदी सरकारने मोदी सरकारने साडेचार वर्षाच्या काळात 21 लाख कोटींपेक्षा अधिक कर जमा केला. मात्र, त्यानंतरही जनतेला अच्छे दिन पहायला मिळाले नाहीत, असेही ते म्हणाले.
केंद्र व राज्यातील सरकार जुमलेबाज असून त्यामुळे महाराष्ट्राचा विकासदर पिछाडीवर असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांच्या संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे केल्यानंतर ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, शिबिराचे प्रशिक्षक आमदार रामहरी रुपनवर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार शरद रणपिसे, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, श्यामला सोनवणे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, सध्या देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून जात आहे. रुपयाची अत्यंत दयनीय अवस्था आहे. डॉलरच्या तुलनेत तो सतत पिछाडीवर जात आहे. गेल्या चार वर्षांत 48 हजार कोटींची गुंतवणूक देशाबाहेर गेली आहे. प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची थकीत कर्जे वाढत चालली आहेत. त्यातच आयएफएलएसचा आर्थिक घोटाळा समोर आला असून त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
युपीएच्या कार्यकाळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 47 होती ती ऑक्टो. 2018 मध्ये 73 रुपयांवर आली असून रुपयाचा हा निचांक आहे. भारतीय चलनाची किंमत घटल्यामुळे आयात महाग झाली आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये ही वारेमाप वाढ झाली आहे. युपीएच्या सत्ताकाळात आयात आणि व्हॅट 25 टक्के होता. तो आता 39 टक्के आकारला जातो. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शेतक-यांना कर्ज माफ केल्याचे जाहीर केले. परंतु, अद्याप शेतक-यांचे कर्ज माफ झालेले नाही. सिडकोचा जमीन व्यवहार आणि प्रकाश मेहता यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. येत्या निवडणुकीत या सर्व प्रश्नांची उत्तरे सत्ताधा-यांना द्यावीच लागतील. सरकारचा भ्रष्ट कारभार जनता पाहत असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तो जनतेच्या समोर मांडावा, असेही त्यांनी सांगितले.
व्हीएस न्युज - पोलिसी कामातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी पुन्हा चिंता व्यक्त केली. गुन्हेगाराला सोडविण्यासाठी फोन करणाऱ्या नेत्यांची स्टेशन डायरीत पोलिसांनी नोंद करावी, असा फंडा त्यांनी सुचविला. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप व गुन्हेगारीही कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केलेल्या कामांचा आढावा जनतेसमोर मांडून त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी 'संवाद खासदारांचा थेट जनतेशी' या कार्यक्रमात बारणे बोलत होते. यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, जिल्हा महिला संपर्क संघटीका वैशाली सूर्यवंशी, शहरप्रमुख योगेश बाबर, मधुकर बाबर, महिला शहर संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, जितेंद्र ननावरे आदी उपस्थित होते.
बारणे म्हणाले, ''पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराला पाण्याचा तुटवडा भासत आहे. जेवढे पाणी पवना धरणातून उचलले जात आहे, तेवढे सगळे पाणी शहरापर्यंत पोहोचले तरी सुदधा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. पोलिसांना आपले काम चोखपणे करता यावे यासाठी त्यांच्या कामातील राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे. एखादा लोकप्रतिनिधी जर पोलीसांवर दबाव आणत असेल तर जनतेने त्याचे पितळ उघडे करायला हवे."
सध्या राजकीय क्षेत्रात बुवाबाजी सुरू झाली असून त्यापासून प्रत्येकाने सावध राहायला हवे, असा सल्ला बानगुडे पाटील यांनी यावेळी दिला. शिवसेना, भाजप यांची युती होईल न होईल, पण मावळ लोकसभा मतदारसंघातून बारणे हेच निवडून येतील, असा विश्वास मधुकर बाबर यांनी व्यक्त केला.
व्हीएस न्युज- आळंदी येथील एका पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला चिखली पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून तीन दुचाकी वाहने, हत्यारे, मोबाईल असा एकूण २ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चिखली पोलीस स्टेशन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस स्टेशन च्या हद्दीत गस्त घालत असताना आळंदी रस्ता येथील वडाचा मळा परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुनील शिंदे, नरहरी नानेकर यांना मिळाली. माहिती मिळताच चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने छापा मारून ६ आरोपींसह दोनाल पण मुलांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कडे १२ मोबाईल, ३ दुचाकी, कोयता, तलवार व दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले.
पोलिसांनी या प्रकरणी, अश्वजीत सुभाष मोरे (वय १९ रा. पुण्यनगरी हौउसिंग सोसायटी, घरकुल चिखली) सचिन विक्रम मस्के (वय २० रा. नवचैतन्य सोसायटी टावर लाइन, मोरेवस्ती, चिखली) ज्ञानेश्वर श्रीराम ढाकणे (वय २० रा. जय गणेश हौसिंग सोसायटी सोसायटी, घरकुल चिखली) साजिद मुमताज खान (वय १९ रा. सिद्धेश्वर सोसायटी घरकुल चिखली) आतिश बलदेव कोरी (वय २० रा. गोकुळधाम हौसिंग सोसायटी, घरकुल चिखली) विकास उर्फ पांग्या जाधव (रा. शरद नगर चिखली) या सर्व आरोपींना अटक केली आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड चे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव,चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे,& पोलीस उपनिरीक्षक भरत चपाईतकर, पोलीस कर्मचारी मंगेश गायकवाड, किसन वडेकर, आनंद चव्हाण, सुनील शिंदे, नरहरी नानेकर, संतोष सपकाळ कबीर पिंजारी, आनंदा नांगरे, शंकर यमगर, सुरेश जाधव, विनोद जाधव, सचिन गायकवाड, किशोर धनवडे या& पथकाने केली.
व्हीएस न्युज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बीएस्सीच्या (संगणकशास्त्र) तृतीय वर्षांच्या ऑबजेक्ट ओरिएन्टेड सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग विषयाची प्रश्नपत्रिका फुटली. शनिवारी दुपारी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा-पंधरा मिनिटे आधीच मोबाइलमध्ये आली. ३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर येत असल्याचे प्रकार होत असून, विद्यापीठाकडून मात्र प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा दावा करण्यात आला.
बीएस्सीच्या संगणकशास्त्र अभ्यासक्रमातील द्वितीय आणि तृतीय वर्षांची परीक्षा ३ ऑक्टोबरपासून सुरू झाली. द्वितीय वर्षांच्या सत्र एक आणि दोनची परीक्षा दुपारी दहा ते बारा, तृतीय वर्षांच्या सत्र तीन आणि चारची परीक्षा दुपारी दोन ते चार या वेळेत पुणे, नाशिक, नगर जिल्ह्य़ांतील विविध केंद्रांवर सुरू आहे.
द्वितीय वर्षांच्या प्रश्नपत्रिका सुरू होण्यापूर्वी सव्वानऊच्या सुमारास, तर तृतीय वर्षांच्या प्रश्नपत्रिका दुपारी सव्वाच्या सुमारास परीक्षा केंद्रावरून व्हॉट्सअॅपद्वारे मिळू लागल्या. बुधवारी इंटरनेट प्रोग्रॅमिंग आणि शुक्रवारी प्रोग्रॅमिंग इन जावा या तृतीय वर्षांच्या प्रश्नपत्रिकाही अशाच पद्धतीने फुटल्या. शनिवारीही तृतीय वर्षांच्या ऑब्जेक्ट ओरिएन्टेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी दहा-पंधरा मिनिटे मोबाइलमध्ये मिळाल्याचे विद्यार्थ्यांची सांगितले.
विद्यापीठाची कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. विद्यापीठाकडून महाविद्यालयाला ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठवली जाते. त्यानंतर महाविद्यालयाकडून ती डाऊनलोड करण्यात येते. डाऊनलोड होण्याची वेळ आणि संबंधित महाविद्यालयाचा त्यावर वॉटरमार्क उमटतो. विद्यापीठाच्या माहितीनुसार कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, तशी तक्रारही आलेली नाही, असा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला.
चौकशीची मागणी
प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा व मूल्यमापन विभागाने केलेल्या उपाययोजना पूर्णत अयशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकारांची दखल घेऊन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.
व्हिएस न्युज - श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अर्पण करण्यासाठी त्या परिसरातील पेढे आपण घेता. प्रसादाच्या रूपातील ते पेढे गणपतीपुढे मोठ्या भक्तिभावाने ठेवतो आणि स्वतःही नमस्कार करत पेढ्याचा तुकडा तोंडात टाकतो... पण दगडूशेठ गणपती मंदिराच्या परिसरात प्रसाद म्हणून विक्री होणाऱ्या पेढ्यांमध्ये भेसळ असल्याचा अहवाल राज्य आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. त्या आधारावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) येथील पेढे आणि मोदक विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू& केली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देशात प्रसिद्ध धृतराष्ट्र आहे. याच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. त्या वेळी हे भाविक आजूबाजूच्या दुकानांमधून प्रसाद म्हणून पेढे विकत घेतात. हे पेढे प्रसाद म्हणून वाटतात. या पेढ्यांच्या गुणवत्तेबद्दलच्या तक्रारी ‘एफडीए’कडे आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर या परिसरातील पेढ्यांच्या दुकानांची तपासणी करून त्यातील पेढे आणि मोदकांचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले.
अत्यंत अस्वच्छ वातावरणात हे पेढे तयार केले जात असल्याचेही अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यातून या पेढ्यांमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती ‘एफडीए’चे सहायक आयुक्त संजय शिंदे& यांनी दिली. गुजरातच्या खव्यापासून पेढे बनवून ग्राहकांची फसवणूक करू नये, असे आवाहन एफडीएने केले आहे.
अशी केली कारवाई
जय गणेश स्वीट सेंटरमध्ये स्पेशल बर्फीपासून गलिच्छ वातावरणात पेढे तयार करत असल्याचे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना दिसले. त्याच वेळी जय मातादी फोटो फ्रेममध्ये, नारळ व पेढ्यांची किरकोळ विक्री करणाऱ्याने श्रीमंत पेढेवाले यांच्याकडून पेढे खरेदी केल्याचे सांगितले. कमी दर्जाच्या स्पेशल बर्फीमध्ये रंग टाकून अस्वच्छ वातावरणात पेढे तयार केले जात होते. त्यासाठी अन्न परवानादेखील नव्हता, असे तपासणीच्या वेळी दिसून आले.
पेढे विक्रेत्याचा नफा आणि नफाच!!
गुजरात स्पेशल बर्फीपासून हे पेढे तयार केले जातात. गुजरातहून येणाऱ्या बसमध्ये टाकून ही बर्फी पुण्यात येते. ही बर्फी १२० रुपये किलो या दराने खरेदी केली जाते. त्यापासून पेढे तयार करताना त्याला फक्त तूप लावले जाते. त्यानंतर या एक किलो पेढ्याची किंमत ४०० रुपये होते.
दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातील कमी गुणवत्तेच्या पेढ्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई सुरू आहे. या परिसरातील आठ नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेला दिले होते. त्यापैकी दोन स्पेशल बर्फीचे होते. त्यात अपमिश्रित पदार्थ आढळून आला. तर, तीन पेढ्यांचे नमुने खराब आले आहेत. त्या आधारावर या विक्रेत्यांवर कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात येत आहे. - संजय शिंदे, सहायक आयुक्त, एफडीए, महाराष्ट्र राज्य
व्हीएस न्युज - अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांचे आदर्श ,महानायक,राजे मल्हाररावजी होळकर यांच्या बाबतीत सोशल मिडीयावर "वाल्याचा वालमीकी व मल्याचा मल्हारराव होळकर" आसे बेताल अपमानजनक टिपणी करणार्या राष्ट्रवादि कॉंग्रेस पाटीॕच्या बेआकल आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
४८तासाच्या आत जितेंद्र आव्हाड यांनी अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांची जाहीर माफी मागावी अशी मागणी गोंदियाचे शिवसेना तिरोडा विधानसभेचे संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले आणि शिवशाही व्यापारी संघांचे प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी केली आहे.
व्हीएस न्युज च्या प्रतिनिधींशी बोलताना दाखले म्हणाले कि "जितेंद्र आव्हाड यांनी माफी न मागितल्यास शिवसेना स्टाईलने जाब विचारला जाणार आसुन याकामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रशासनाची राहील".
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002