व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड परिसरातील संघटीत व असंघटीत कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने येत्या शनिवारी (दि. 3 नोव्हेंबर) रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे दुपारी 3 वाजता ‘कामगार परिषदेचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत निमंत्रक व माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, समन्वयक दिलीप पवार, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, कामगार नेते महेश डोंगरे, महाद्रंग वाघेरे, चारुशिला जोशी, मनोज माछरे, सुनिल पाटसकर, पद्मजा पवार, दामोदर वहिले, योगेश कोंढाळकर, किरण देशमुख, रविंद्र घाडगे, सुरेश काशीद, संतोष नाणेकर, हरप्रित सलुजा, फझल शेख आदी उपस्थित होते. या कामगार परिषदेचे उद्घाटन किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीष बापट मार्गदर्शन करणार आहेत. खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढाळराव पाटील, सुप्रिया सुळे, अमर साबळे, अनिल शिरोळे, महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ॲड. गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे, सुरेश गोरे, संग्राम थोपटे, पिंपरी चिंचवड मनपाचे पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने उपस्थित राहणार आहेत. कामगार नेते अजित अभ्यंकर, सी. श्रीकुमार, अरविंद श्रोत्री, कैलास कदम, मेघा थत्ते, बबन झिंजुर्डे, बाबा कांबळे, विजय पाळेकर, मारुती जगदाळे, उदय भट आदी मार्गदर्शन करणार आहेत.
या कामगार परिषदेत केंद्र व राज्य सरकारने कामगार कायद्यात केलेले बदल, राष्ट्रीय रोजगार वृध्दी मिशन (नीम), आय.टी, संरक्षण खात्यातील, एमआयडीसीतील तसेच इतर क्षेत्रातील संघटीत व असंघटीत कामगारांच्या विविध प्रश्नांविषयी चर्चा केली जाणार आहे. संसद व विधीमंडळात नेतृत्व करणा-या लोकप्रतिनिधींसमोर हि चर्चा व्हावी व भविष्यात त्यांनी सभागृहात कामगारांना भेडसावणा-या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी प्रयत्न करावेत हा या कामगार परिषद आयोजित करण्यामागे उद्देश आहे.
यावेळी एच.ए., नीम, संरक्षण खात्यात परकीय गुंतवणूक त्यामुळे कामगारांचे भवितव्य, एमआयडीसीत कामगारांची होणारी फसवणूक, कंत्राटी कामगार, कमवा शिका योजना, ईएसआय योजना, पेन्शन, ग्रॅच्युईटी, महागाई भत्ता, वेतनवाढ करार, व्यवसाय कर, घरेलू कामगार, आयटीमधील कामगार, कामगार आयुक्तालयाशी संबंधीत प्रश्न आदी विषयांवर साधक बाधक चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. परिषदेत झालेल्या चिंतनानंतर सर्व कामगार संघटनांना एका व्यासपिठावर आणून त्यांचा एकत्रित फोरम तयार करण्यात येईल. या परिषदेत पिंपरी चिंचवड, मावळ, मुळशी, चाकण, हिंजवडी परिसरातील सर्व कामगार संघटनांचे प्रतिनिधी व कामगारांनी उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे निमंत्रक अरुण बो-हाडे यांनी केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002