व्हिएस न्युज - पिंपरी-चिंचवड नजीकच्या पुनावळे येथे इमारतीचे रंगकाम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. राधेशाम रामबच्चन वर्मा (वय ३३) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश वर्मा यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. ठेकेदाराने कामगारांना सुरक्षा साधने पुरवली नाहीत. याप्रकरणी ठेकेदार तुषार पाटील, विजय बालवाडकर यांच्याविरुद्ध कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल निष्काळजीपणा दाखविल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
व्हीएस न्युज - पुणे शहरातील नागरिकाची आजच्या दिवसाची सुरुवात चंदननगर येथील गोळीबाराच्या घटनेने झाली. चंदननगर परिसरातील आनंद गृहरचना सोसायटीत सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. खानवळ चालविणार्या एकता ब्रिजेश भाटी (वय.३८) यांच्या वर अनोळखी दोन व्यक्तीनी पिस्तूल मधून गोळ्या झाडल्या. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती चंदननगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या घटनेतील आरोपीच्या शोधासाठी शहरातील अनेक भागात पोलिसाची पथके रवाना करण्यात आली. या घटनेतील आरोपीचा शोध सुरू असताना. येवलेवाडी येथील गणेश ज्वलर्सवर दुपारी पावणे दोनच्या सुमारास दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चार व्यक्तीनी केलेल्या गोळीबारात दुकानातील कामगार जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती कोंढवा पोलिसाना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे पुणे शहरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या दोन्ही घटनांमुळे शहरातील नागरिक सुरक्षित आहेत का यावर सोशल मीडिया प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.
तर या दोन्ही घटना थांबत नाही तोवर चंदननगर येथील महिलेची हत्या करणारे आरोपी हे पुणे स्टेशन येथून झेलम एक्क्सप्रेसने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पुणे स्टेशन येथे पाच च्या दरम्यान फ्लॅट फर्म क्रमांक 3 वर पोहचले. त्यावेळी दोन आरोपी रेल्वेमध्ये बसल्याचे त्यांना कळताच त्याना पकडताना दोन आरोपीं पैकी एकाने क्राइम ब्रँच चे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील दोन गोळ्या पोटात मध्ये लागल्या. यामुळे पवार खाली कोसळले. त्याच्या बरोबर असलेल्या पोलिसानी त्यातील एका आरोपीला जागेवर पकडले. तर दुसर्या आरोपी तेथून पळून गेला. तेथून काही अंतरावर त्याला देखील पकडले.
पोलिसांवर आरोपीनी गोळीबार केल्याची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली आणि गजानन पवार यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच रेल्वे स्थानकात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच शहरातील दिवसभरातील तिसरी गोळीबाराची घटना असल्याने सर्व सामान्य नागरिकांपासून आता पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
व्हिएस न्युज - बुधवारी दिवसभरात गोळीबाराच्या तीन घटनांनी पुणे शहर हादरले असून संध्याकाळी रेल्वे स्टेशनवर एका आरोपीने थेट पोलीस निरीक्षकावरच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात पोलीस निरीक्षक गजानन पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटात दोन गोळ्या लागल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुण्यातील चंदननगरमधील आनंद पार्क परिसरात राहणाऱ्या एकता भाटी यांच्यावर बुधवारी सकाळी राहत्या घरी हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात एकता भाटी यांचा मृत्यू झाला होता. एकता यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी हा झेलम एक्स्प्रेसने फरार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस त्यांना पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. पोलिसांना पाहताच आरोपीने पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या त्यांच्या पोटात लागल्या आहे. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर पवार यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. घटना स्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली
व्हिएस न्युज - रस्ता ओलांडत असताना स्ट्रीट लाईटचे झाकण उघडे असल्याने शॉक लागून पादचाऱ्या तरुणाचा पत्नीसमोरच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (दि.२ ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास भोसरी येथील नाशिक हायवेवर रोशन गार्डनसमोर घडली.
चेतन जाधव (वय २४, रा. बि.१३/२२, अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी किरण यांनी भोसरी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.१७ नोव्हेंबर) तक्रार दाखल केली आहे.त्यानुसार, निष्काळजीपणा करुन स्ट्रीट लाईटचे झाकण उघडे ठेवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२ ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास मयत चेतन आणि त्यांची २१ वर्षीय पत्नी किरण हे दोघेही भोसरी येथील नाशिक हायवेवरील रोशन गार्डनसमोरील रस्ता ओलांडत होते. यावेळी तेथील स्ट्रीट लाईटचे झाकण उघडे असल्याने त्यांचा जोरदार शॉक चेतन यांना लागला आणि ते जागीच बेशुध्द पडले. किरण यांनी लोकांच्या मदतीने चेतन यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे किरण या धक्क्यात होत्या यामुळे त्यांनी शनिवारी उशीरा निष्काळजीपणा करुन स्ट्रीट लाईटचे झाकण उघडे ठेवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विद्युत विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.
व्हिएस न्युज - ‘वायसीएम’ रूग्णालयातील एका डॉक्टराने महिलेला दूरध्वनी करून शरीरसुखाची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि.१६) निगडी येथून समोर आला आहे. या प्रकरणी डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एका ३६ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डॉ. विनायक पाटील (रा.संत तुकारामनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नांव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी डॉ. विनायक पाटील हे वायसीएम रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. तर फिर्यादी महिला या घरकाम करत आहेत. शुक्रवारी रात्री पावनेनऊच्या सुमारास डॉ. पाटील यांनी महिलेला फोन करून शरीरसुखाची मागणी केली. तसेच माझ्या फ्लॅटवर नाही आल्यास तुझी बदनामी करून तुला जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.
व्हीएस न्युज - अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या पौड रस्त्यावरील कार्यालयाची तोडफोड करून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. काही दिवसांत प्रदर्शित होत असलेल्या मराठी चित्रपटावरून हे कार्यालय फोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर लाईव्ह करत हा प्रकार किरकोळ असून, तोडफोड करणारी मुले माझ्याच तालुक्यातील आहेत. गैरसमजातून त्यांनी हे केले असून, चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल, असे म्हटले आहे.
याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काही दिवसांमध्ये नवीन मराठी चित्रपट येत आहे. यातील काही संवाद आणि घटना पुण्यातील कुख्यात गुंड संदीप मोहोळवर आधारित असल्याबाबतची तक्रार पुणे पोलिसांकडे मोहोळ याच्या नातेवाइकांनी केली आहे.
दरम्यान, रविवारी दुपारी मोहोळ याच्या बहीण व नातेवाइकांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना फोन करून चित्रपटावर आक्षेप असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तरडे यांनी त्यांना चित्रपट पाहा त्यानंतर आक्षेपावर बोलू, असे म्हणत त्यांना पौड रोडवरील कार्यालयात बोलावले होते. त्यावेळेस काहीजण त्याठिकाणी गेले होते. चित्रपट पाहिल्यानंतर तरडे आणि त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर धक्काबुक्की व किरकोळ तोडफोडीचा प्रकार घडला असल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी दिली.
दरम्यान, चित्रपटातील गाण्यांमध्ये गुन्हेगारांच्या समावेशामुळे हा चित्रपट वादाच्या भोवर्यात आहे. तसेच यातील संवाद आणि घटनांमुळे मानहानी होत असल्याची तक्राराही मोहोळ याच्या बहिणीने केली आहे. त्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेकडूनही गोपनीय माहितीच्या आधारे टोळ्यांची झाडाझडती सुरू केली आहे. ही झाडाझडती काही सराईत पुन्हा सक्रिय झाल्याने केली जात असून, त्याला या चित्रपटाची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जाते.
व्हीएस न्युज - पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कार्यक्षेत्रामध्ये अकरा हजार आठशे सत्तर रिक्षांची नोंदणी झाली आहे. प्रत्यक्षात मात्र तीस ते पस्तीस हजार रिक्षा शहरात अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करतात. नोंदणी नसलेल्या रिक्षांवर वाहतूक पोलीस आणि आरटीओकडूनही कारवाई केली जात नाही. अनधिकृत आणि धोकादायक स्थितीत रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होत असली तरी प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
राज्यात जुलै २०१७ पासून मागेल त्याला रिक्षा परवाना देण्याच्या मुक्त धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाल्यापासून पिंपरीत तीन हजार २१६ रिक्षा चालकांना परवाना देण्यात आला आहे, तर ६ हजार ४७० नवीन रिक्षांची नोंदणी पिंपरी आरटीओ कार्यालयाकडे झाली आहे.
परवाना मुक्त धोरणाच्या आधी पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा चालविण्याचे परवाने अतिशय मर्यादित होते. परंतु त्यावेळीही रिक्षांची संख्या भरमसाठ होती. नवीन आणि जुन्या रिक्षांची नोंदणी केवळ ११ हजार ८७० आहे. परंतु प्रत्यक्षात ३० ते ३५ हजार रिक्षा रोज प्रवासी वाहतूक करतात. बेकायदा आणि आरटीओकडे नोंदणी नसलेल्या रिक्षा प्रवासी वाहतूक करत आहेत आणि रिक्षा चालविणारे चालकही अल्पवयीन आणि परराज्यातील असल्याचे चित्र सध्या शहरामध्ये दिसून येत आहे.
पिंपरी आरटीओ कार्यालयामध्ये सध्या दहा ऐवजी वीस रिक्षा परवान्याचा दैनंदिन कोटा ठरविण्यात आला आहे. त्यानुसार रोज वीस रिक्षांचे परवान्याचे वितरण करण्यात येते. त्यामुळे भविष्यात परवानाधारक रिक्षांची नोंदणी वाढणार आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर रिक्षा प्रवासी वाहतुकीकडे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची कारवाई होत नसल्याने राजरोसपणे रस्त्यावर बेकायदा रिक्षा प्रवासी वाहतूक करत आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलीस दोघेही मनुष्यबळाचे कारण देऊन हात झटकत आहेत.
भंगार झालेल्या रिक्षा तोडल्यानंतरच नवीन रिक्षांना परवाना दिला जातो. त्यामुळे परवान्याशिवाय जास्त रिक्षा प्रवासी वाहतूक करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. इतर जिल्ह्य़ातून आलेल्या रिक्षांवर वाहतूक पोलीस आणि आम्ही संयुक्तपणे कारवाई करत आहोत. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या शंभर रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार आहे.
– आनंद पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील ३० ते ३५ हजार रिक्षांची नोंदणी आरटीओ कार्यालयाकडे नाही. अशा रिक्षांवर कारवाई करावी अशी मागणी वेळोवेळी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे प्रामाणिक रिक्षा चालकांवर अन्याय होत आहे.
– श्रीधर काळे, अध्यक्ष, क्रांती रिक्षा संघटना, पिंपरी-चिंचवड
व्हीएस न्युज - नगरसेवकपदाचा पदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोषारोपपत्र शुक्रवारी दाखल केले. यावेळी पोलिसांनी जगताप दांपत्याला अटक केली. शुक्रवारी दुपारी (ता. 16)त्यांची जामीनावर सुटका झाली. त्यांनी एक कोटी 33 लाख 39 हजार 592 रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमविली, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
नगरसेवक पदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप, त्यांची पत्नी व तत्कालीन नगरसेविका उषा यांच्याविरुद्ध 4 मार्च 2015 रोजी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे दोषारोपत्र उपअधीक्षक कांचन जाधव यांनी शुक्रवारी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दाखल केले. यावेळी सुभाष आणि उषा यांना अटक करण्यात न्यायालयात हजर करण्यात आले. जगताप हे 1995 पासून 2016 पर्यंत नगरसेवक होते. सध्या ते स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा त्यांच्याकडे एक कोटी 33 लाख 39 हजार 592 रुपयांची अधिक मालमत्ता आढळून आली आहे. तिचा हिशेब त्यांना सादर करता आलेला नाही, असे पोलिसांनी न्यायालयात म्हटले आहे.
जगताप दांपत्याने जामीनासाठी ऍड. एन. डी. पवार यांच्यामार्फत अर्ज दाखल केल्यावर न्यायालयाने तो मंजूर केला. याबाबत सुभाष जगताप म्हणाले, ""माझ्या सर्व संपत्तीची माहिती प्राप्तीकर विभागाला सादर केलेली आहे. त्याचा करही भरलेला आहे. जुन्या मिळकतींची बाजारमूल्याने वाढ गृहित धरून पोलिसांनी तपासात अपसंपदेचा ठपका माझ्यावर ठेवला आहे. तो चुकीचा आहे. त्याबाबत न्यायालयात मी माझे म्हणणे सादर करणार आहे. पोलिस तपासात झालेल्या चुका झाकण्यासाठी माझ्यावर हे कुंभाड रचण्यात आले आहे.''
व्हीएस न्युज - बेघर गरीबांना महाराष्ट्र सरकार जमिनीचा पट्टा देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फक्त जमिनीचा पट्टाच नाही तर त्यावर घर बांधण्यासाठी पैसेही देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यातील एक कोटी व्यक्तींपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील 90 टक्के लोकांना आरोग्यावर कोणताही खर्च करण्याची गरज नाही. केंद्र आणि राज्य सरकार तो भार उचलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या आरोग्य योजनेत देशातील पन्नास कोटी लोक कव्हर होत आहेत. त्याला राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजनेची जोड दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. गरीबी हटावचा नारा देत अनेक निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. मात्र गरीब व्यक्ती गरीबच राहिला. निवडणुका आल्या की काँग्रेसला गरीबांची आठवण येते अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात केली. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
काँग्रेसने देशावर घराणेशाही लादल्याचाही आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन केला. महापालिका ते केंद्रापर्यंत तुम्ही सत्ता भोगली तरी देखील प्रश्न राहीले आहेत. आता आमची सत्ता आली तर काही जण आम्हाला विचारतात की योजनांचे किंवा प्रकल्पाचे काय झाले? हा प्रश्न विरोधकांनी आम्हाला विचारू नये तो लोकांना विचारावा लोकच त्याचे योग्य उत्तर तुम्हाला देतील असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्य अहवालाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,समाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा खासदार संजय काकडे, आमदार आणि नगरसेवक उपस्थित होते.
व्हीएस न्युज - पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्तांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील वाढत्या अपघातांमुळे पोलीस आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे याआधीही अनेकदा पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र पोलीस आयुक्तांनी नव्याने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.
याआधीही पुण्यात हेल्मेटसक्ती कऱण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र प्रशासनाला नागरिकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं होतं. ठिकठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यांवर उतरुन निर्णयाचा निषेध केला होता. विशेष म्हणजे काही राजकीय पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. हेल्मेटमुळे मानदुखी जडते, आजूबाजूचे दिसण्यात अचडण येते असा आक्षेप घेत आधी सार्वजनिक वाहतूक सुधारा, वाहतूक नियोजन तसंच रस्त्यांची स्थिती सुधारा अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.
व्हीएस न्युज - अमली पदार्थविरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना संशयितरीत्या आढळलेल्या टेम्पोचा पाठलाग केला. या वेळी तब्बल १३ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पथकाने ही कारवाई गुरुवारी दुपारी केली. याप्रकरणी विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी (वय २९, रा. वैभवनगर, पिंपरी) या चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडील गुटखा व एमएच १२, एमव्ही १४६३ या क्रमांकाचा टेम्पो हस्तगत केला आहे.
याबाबतची माहिती अशी, अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा पथकाकडून वाकड हद्दीत गुटखा विक्री व अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांना जरब बसावी. यासाठी पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक वाकड हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी एक टेम्पो संशयितरित्या आढळून आला. त्याचा शिताफीने पाठलाग करून झडती घेतली असता त्यात गुटखा आढळला. टेम्पोत गुटखा आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व निरीक्षकांना बोलावून घेत गुन्हा दाखल करण्यात आला. टेम्पोत तब्बल १३ लाख ४८ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.
उपनिरीक्षक वसंत मुळे, हवालदार प्रदीप शेलार, राजन महाडिक, रमेश भिसे, प्रसाद जंगीलवाड, बि. के. दौंडकर, बाळासाहेब सूर्यवंशी, टी. डी. घुगे, आर. डी़ बांबळे, ए. डी. गारगोटे, प्रदीप गुट्टे यांनी कारवाई केली.
व्हीएस न्युज - वेगवेगळ्या पद्धतीने दुबईहून लपवून आणलेले सोन सीमा शुक्ल विभागाच्या पथकाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पकडले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ११ लाख ७ हजार रुपये किंमतीचे ३४९.९३ ग्रॅम सोने जप्त केले आहे. शेख तारीक महमुद असे प्रवाशाचे नाव आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास दुबईहून स्पाईसजेटचे एसजी 52 विमान उतरले. त्यावेळी या विमानातून आलेला प्रवाशी शेख तारीक महमुद याची तपासणी केल्यावर सीमा शुल्क विभागाच्या पथकाला त्याच्याजवळ सोने असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याची झडती घेतल्यावर दोन सोन्याचे बिस्कीट चार भागात तुकडे करून जीन्स पॅन्टला कमरेला लावून आणलेले तर दोन सोन्याचे सिक्के हुबेहुब चलनी सिक्क्यांप्रमाणे बनवलेले त्याच्या पाकीटात आढळून आले. तर र्होडीयम प्लेटींग केलेली एक सोन्याचीच किचेन रिंग असे एकूण 11 लाख 07 हजार 878 रुपये किंमतीचे 349.93 ग्रॅम सोने त्याच्याजवळ आढळून आले. सीमा शुल्क विभागाने त्याच्याकडून सोने जप्त केले असून पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त हर्षल मेटे यांनी दिली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002