Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
महापालिकेचे बनावट ओळखपत्र बाळगुन सरासपणे वावरणाऱ्या तरुणास अटक

व्हिएस न्युज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कर्मचारी असलेले बनावट ओळखपत्र तयार करुन महापालिका भवनात सरासपणे वावरणाऱ्या एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.२०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारा जवळ करण्यात आली. संदेश रामचंद्र जाधव असे अटक करण्यात आलेल्या या तरूणाचे नाव आहे.

याप्रकरणी सुरक्षा विभागप्रमुख उदय जरांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश हा महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मजूर म्हणून असलेले ओळखपत्र घालून सरासपणे महापालिका भवनात वावरत होता. बुधवारी तो महापालिका भवनात प्रवेश करणार होता. इतक्या तेथील सुरक्षारक्षकांना त्याचा सशंय आला. त्यांनी त्याची चौकशी करुन ओळखपत्र पाहिले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. तसेच तो पालिकेत कोणत्याही विभागात कामास नसल्याचे आढळून आले. यावर महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेऊन पिंपरी पोलिसाच्या हवाली केले.

दरम्यान सहा महिन्यांपूर्वी देखील संदेश याने पालिकेत सुरक्षारक्षक म्हणून प्रवेश केला होता. त्यावेळी त्याला समज देऊन सोडून देण्यात आले होते. त्याने चिंचवड येथील एका व्यक्तीकडून पालिकेचे बनावट ओळखपत्र बनवून घेतल्याचे कबूल केले आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
तब्बल १५ तासानंतर २०० फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची सुटका

व्हिएस न्युज - पुण्यातील मंचर येथे २०० फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची अखेर सुटका करण्यात आली आहे. तब्बल १५ तासांनी मुलाला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. मुलाला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. सकाळी एनडीआरएफचं पथक मुलापर्यंत पोहोचलं होतं. पण कमरेचा भाग अडकला असल्या कारणाने त्याला बाहेर काढण्यात अडचण येत होती. पण अखेर मुलगा सुखरुप बाहेर पडला आहे.

रवी पंडित असं या मुलाचं नाव आहे. खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला होता. या परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरु असून अनेक कामगार या कामात सहभागी आहेत. रवीचे आई-वडिलही बांधकाम मजूर असल्याने तोही आई-वडिलांसोबत याठिकाणी होता. बोअरवेलवर कोणतेही झाकण नसल्याने खेळता-खेळता ६ वर्षांचा रवी थेट बोअरवेलमध्ये पडला होता. बुधवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती.

सुरुवातीला तो केवळ १० फुटांवर अडकला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. नंतर एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. यानंतर त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले होते. अंधार पडल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. पण अखेर १५ तासांनी रवीला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात आलं आहे. संबंधित घटनेत जे कोणी दोषी असतील किंवा आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक खराडे यांनी दिली आहे.

...Read More

V. S. News
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ७५ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

व्हीएस न्युज - अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस निरीक्षक आणि ५० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या कऱण्यात आल्या आहेत. या बाबतचा आदेश सोमवारी (दि.१९) काढण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या निवडणुकां दरम्यान पोलिसांच्या बदल्या होणे हे रुटींग आहे. निवडुकी दरम्यान विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे नियोजन करुन पोलिसांच्या बदल्या योग्य ठिकाणी करण्यात येतात.

यादरम्यान बऱ्याचदा राजकीय नेते हस्ताक्षेप करुन आपल्या सोईनुसार पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन घेतात. तर काही पोलीस एकाच ठिकाणी बसतान मांडून असतात. यामुळे कोणत्याही निवडुकी पूर्वी पोलिसांच्या बदल्या केल्या जातात. दरम्यान काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालयात या आगोदरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याने काही पोलीस कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. तर काहींनी खाजगीमध्ये निराशा व्यक्त केली आहे.

बदली झालेल्यांमध्ये पोलीस निरीक्षक भानुदास जाधव (वपोनि तळेगाव दाभाडे ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२), सुधाकर काटे (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे), अमरनाथ रामचंद्र वाघमोडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी ते पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा), राजेंद्र पांडूरंग कुंटे (वपोनि भोसरी एमआयडीसी ते नियंत्रण कक्ष संलग्न), भीमराव एन. शिंगाडे (पोलीस निरीक्षक विशेष शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी अतिरिक्त कार्यभार), विवेक व्ही. मुगळीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली ते पोलीस निरीक्षक सायबर सेल), श्रीराम बळीराम पोळ (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली अतिरिक्त पदभार), शंकर वामनराव अवताडे (पोलीस निरीक्षक गुन्हे चिखली ते पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड), सतिश पवार (पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी), आर.पी. चौधर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी ते पोलीस नियंत्रण कक्ष संलग्न), उमेश औदुंबर तावसकर (पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा ते वाहतुक नियंत्रण कक्ष), सतिश विठ्ठलराव नादुरकर (पोलीस निरीक्षक गुन्हे भोसरी एमआयडीसी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार) यांचा समावेश असून १३ सहायक पोलीस निरीक्षक तर ५० पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड : पूर्ववैमनस्यातून चिखलीत पाच जणांना मारहाण

व्हिएस न्युज - महाविद्यालयात झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तीन जणांच्या टोळक्यांनी चिखली येथे जावून पाच जणांना लोखंडी रॉड आणि काठीने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. या घटनेमध्ये एक महिला देखील जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री जाधववाडी, चिखली येथे घडली. या प्रकरणी योगेश संतोष इंगळे (वय १९ रा. जाधववाडी चिखली) या तरुणाने चिखली पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश संतोष इंगळे व इतर चौघे आशा पाच जणाना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शुभम ईश्‍वर तायडे (वय १९), शुभम देवानंद प्रधान (वय २२), महेश बाळू लगाडे (वय २२), जाधववाडी, चिखली) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. फिर्यादी आणि आरोपी यांचे पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी चिखली येथे जाऊन पाच जणांना लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केली. तसेच धमकी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे करीत आहेत.

...Read More

V. S. News
मोहसीन शेखच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी “जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट.

व्हिएस न्युज - मोहसीन शेख या तरुणाच्या हत्याला पाच वर्ष पूर्ण होत असून मोहसीन शेख ला त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी “जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट” तर्फे काही प्रमुख मुद्दे घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभारउ असून विविध मागण्या साठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून तरुणांनी एकत्र येत जवळपास १७३ ठिकाणाहून राज्यपाल व मुख्यमंत्री यांना तहसिलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यात २ जून २०१४ मोहसीन शेख या तरुणाची हत्या करण्यात आली होती. सोशल मीडिया वर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या गेल्या होत्या कुठून टाकल्या होत्या,कोणी टाकल्या होत्या पत्ता लागायच्या आत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मोहसीन शेख चा त्यात बळी घेतला गेला. मोहसीन च्या हत्येला आक्षेपार्ह पोस्टचा आधार घेतला गेला मात्र त्या पोस्ट चा आणि त्याचा काडीचा सुद्धा संबंध नव्हता. हत्या करायला कारण मात्र फक्त चेहऱ्यावरील दाढी आणि डोक्यावरील टोपी होती.

कट्टरवाद्यांनी नाहक एका निरपराधाचा जीव घेतला होता. न्यायाच्या प्रतीक्षेत मोहसीन चे वडील सादिक शेख यांचा मृत्यू झाला. आई शबाना परवीन ह्या आजारपणामुळे अंथुरनाला खिळून आहेत. मोहसीन चा छोटा भाऊ मुबीन वर सगळी जबादारी येऊन पडली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत मोहसीन शेख ला त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी “जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट” तर्फे काही प्रमुख मुद्दे घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभा केला गेला असून त्यांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे

  • १) मोहसीन च्या भावाला मुबीन ला सरकारी नोकरीत सामावून घेण्यात यावे.
  • २) मोहसीन च्या कुटूंबाला उर्वरीत आर्थिक मदत त्वरीत देण्यात यावी.
  • ३) मोहसीन शेख हत्या प्रकरणाचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवला जावा आणि खटल्याची सुनावणी डे-टू-डे घेतली जावी.
  • ४) त्वरीत विशेष विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जावी.
  • ५) वर्षभराच्या आत आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.

मोहसीन शेख यांच्या हत्येला येत्या २ जून २०१९ ला मोहसीन च्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होतील. मोहसीन शेख हत्या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई सह १७३ ठिकाणाहून निवेदन सादर केले गेले. अशी माहिती जस्टिस फॉर मोहसीन मुव्हमेंटचे आयोजक सदस्य इम्रान शेख, इरफान शेख सुफियान मणियार, जुनेद आत्तार, अख्तर शेख यांनी दिली.

...Read More

V. S. News
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या;ओळखीच्या मित्रांनीच केले होते अपहरण.

व्हीएस न्युज - शिवणे येथे राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक सुधाकर शिरसाट यांचे त्यांच्या ओळखीच्या मित्रांनीच अपहरण केले असल्याचे पोलीसांच्या तपासात पुढे आले आहे. विनायक शिरसाट व त्याचे वडिल सुधाकर हे शिवणे, उत्तमनगर या परिसरातील बेकायदा बांधकामांविषयी पीएमआरडीकडे तक्रार करीत होते. त्यातून काही ठिकाणी पीएमआरडीने कारवाई केली होती. त्यामुळे विनायक शिरसाट यांचे याच कारणावरुन अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, त्यांच्या हत्येमागे माहिती अधिकारच्या कारणापेक्षा वेगळेच कारण पुढे येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अशी माहिती पुढे आली आहे.

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

विनायक शिरसाट हे ३० जानेवारीला घरातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या ओळखीचे ३ मित्र होते. ते घरी परत न आल्याने त्यांची पजेरो गाडी नऱ्हे येथे सोडून दिल्याचे आढळून आले. त्यामुळे अगोदर बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा शोध घेऊन ते परत न आल्याने ५ फेब्रुवारी रोजी अपहरणाची फिर्याद नोंदविण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विनायक शिरसाट हे घरातून निघाल्यानंतर ते मित्रांबरोबर नऱ्हे येथे आले व तेथे त्यांच्या गाडीतून त्याचे अपहरण करुन दुसऱ्या गाडीने त्यांना पिरंगुट लवासा रोडला नेण्यात आले. त्यानंतर मुठा गावाजवळ त्यांचा खुन करुन त्यांचा मृतदेह दरीत टाकून देण्यात आला असे पोलीसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी विनायक शिरसाट यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तपास करीत असताना त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मुठा गावाच्या हद्दीत मिळून आले.

गेल्या काही दिवसांपासून भारती विद्यापीठ पोलीस त्यांचा शोध घेत होते. पिरंगुट ते लवासा या रोडवरील मुठा गावापासून काही अंतरावर असलेल्या घाटात खोल दरीत सोमवारी दुपारी एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. त्यांच्या अंगावरील कपडे आणि खिशातील मोबाईल यावरुन त्यांचे भाऊ किशोर यांनी हा मृतदेह विनायक शिरसाट यांचा असल्याचे ओळखले.

...Read More

V. S. News
पार्थ पवारांकडून पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीने केलेल्या कामांची पाहणी.. विद्यार्थ्यांशी संवादही साधला

व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्ष सत्ता होती. त्या सत्तेच्या कार्यकाळात शहरात झालेली विकास कामे पाहण्यासाठी आज (दि.११) दिवसभर मावळ लोकसभेचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांनी फेरफटका मारला. शहराला पाणी पुरवठा करणारे निगडीतील जलशुध्दीकरण केंद्र, दुर्गादेवी टेकडी यासह विविध ठिकाणी भेटी देवून शहराची पाहणी केली. त्याच शिवाय संत तुकाराम नगरमधील एका टपरीवर थांबून चहा आस्वाद घेत त्यांनी तेथील गावाहून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शहराची माहिती जाणून घेत संवादही साधला. त्याच्यासमेवत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय कारर्किदीची मुहूर्तमेढ पिंपरी चिंचवडमध्ये रोवली गेली होती. त्यांना पिंपरी चिंचवडकरांनी १९९१ मध्ये खासदार म्हणून निवडून दिले. त्यानंतर त्यांनी मागे फिरुन पाहिलेच नाही. त्यांची लोकप्रियता आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला दांडगा जनसंर्पकामुळे पिंपरी चिंचवड शहराचे कारभारी म्हणून ते काम पाहू लागले. सलग पंधरा वर्ष महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता त्यांनी अबाधित ठेवली. त्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट झाला. शहरातील सुसज्ज रस्ते, उड्डाणपुल, पाणी पुरवठा योजना, उद्याने, क्रीडागंणाची आदी विकास कामे त्यांनी केली. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यात शहराचे पुर्वाश्रमीचे कारभारी अजित पवारांचा मोलाचा हात आहे.

दरम्यान, सध्या मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटा-तटात विभागला आहे. मावळात राष्ट्रवादीची ताकद असूनही शिवसेनेचाच खासदार निवडून येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतील गट-तट एकत्रित करण्यासाठी राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार म्हणून पार्थ पवारांचे नाव जोरदार चर्चेले जात आहे. त्यातच पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदार संघातून विविध कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेवून मतदार संघात जनसंपर्क वाढवू लागले आहेत.

पार्थ पवारांच्या राजकीय कारर्किदीची मुहूतमेढ मावळातून रोवली जात आहे. त्यासाठी जोरदार मोर्चबांधणी सुरु आहे. त्यामुळे वडील अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात केलेली विकास कामे आणि शहराची अंर्तगत ओळख व्हावी म्हणून पार्थ पवार हे शहरात फेरफटका मारु लागले आहेत. त्यांनी सोमवारी (दि.११) शहरातील विविध ठिकाणी पाहणी केली. पिंपरीतील डी.वाय.पाटील अंभियांत्रिकी महाविद्यालयाशेजारी चहाचा अस्वाद घेवून तेथील विद्यार्थ्यांची संवाद साधला. शहराची माहिती त्यांच्याकडून जाणून घेत विकास कामांबाबत माहिती त्यांनी विचारली. त्यावर विद्यार्थ्यांनी त्यांची मनमोकळे पणाने संवाद साधला. त्यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे मावळमधून पार्थ पवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

...Read More

V. S. News
जातीचे नाव काढणाऱ्याला ठोकून काढेन – नितीन गडकरी

व्हीएस न्युज - जातीचे नाव काढणाऱ्याला मी ठोकून काढेन, आमच्या पाच जिल्ह्यात जात काढली जात नाही. जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक, सामाजिक समता-एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन झाले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले.

चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलमच्या वतीने पारधी समाजातील तरूणांना गायींचे वाटप गडकरींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अनिल शिरोळे, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, गिरीश प्रभुणे, माजी खासदार प्रदीप रावत, माधव भंडारी आदी उपस्थित होते.

यावेळी गडकरी पुढे म्हणाले की, सोशितांची, पीडितांची निरंतर सेवा करून ज्या दिवशी त्यांना रोटी, कपडा, मकान मिळेल, त्या दिवशी आपले कार्य पूर्ण होईल, असा संदेश पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सामाजिक, आर्थिक आत्मचिंतनात दिलेला आहे. त्यामुळे मी जात पात मानत नाही,येथे किती पाळतात हे मला माहीत नाही. मात्र, आमच्या येथे बंद केली आहे. जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त, आर्थिक, सामाजिक, समता, एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन होणे गरजेचे आहे. या समाजात गरीब श्रीमंत असा भेद असता कामा नये. कोणालाही छोट्या आणि मोठ्या जातीचा न म्हणता एकात्म आणि अखंड असा समाज तयार व्हावा, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.

...Read More

V. S. News
पावनेसहा लाखांच्या ६७ मोबाईलसह दोघांना गुन्हे शाखेने केले अटक

व्हीएस न्युज - विक्रि करण्यासाठी आलेल्या ५ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ६७ मोबाईलसह दोघांना अटक तर एका अल्पवयीन आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई नाशिकफाटा येथे करण्यात आली.

अमिन सज्जाद इनामदार (व २५, रा. आदर्शनगर, मोशी) आणि शेखर संभाजी जाधव (वय १९, रा. दिघीरोड, स्वययंभु गणेश मंदिराजवळ, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून एक अल्पवयीन आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट १ चे सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील हे भोसरी पोलीस ठाणे परिसरात गस्तीवर होते. यावेळी त्यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती कि, नाशिकफाटा परिसरात एकजण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अमिन याला तर शेखर आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला भोसरी ओव्हर ब्रीज खालून ताब्यात घेतले.

या तिघांची कसून चौकशी केली असता अमिन याने १३ मोबाईल हे भोसरी परिसरातून चालत बोलत जाणाऱ्याचे चोरले, शेखर याने ४१ मोबाईल उघड्या दरवाजा आणि खिडकी वाटे चोरल्याचे सांगितले. तर अल्पवयीन आरोपीकडून १३ मोबाईल हस्त करण्यात आले. गुन्हे शाखेने असे एकूण ५ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ६७ मोबाईल या तिघांकडून जप्त केले. यातील अमिन आणि शेखर हे सराईत मोबाईल चोर असून त्यांना यापूर्वी देखील अटक करण्यात आली होती.

दरम्यान भोसरी, भोसरी एमआयडीसी आणि परिसरातून ज्या कुणाचे मोबाईल चोरीला गेली असतील त्यांनी गुन्हे शाखा युनिट १, मोहननगर, चिंचवड येथील सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील (मो. क्र. ९७०२९९९४६७) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड;अल्पवयीन चोरट्यांना अटक,पाच दुचाक्या आणि तीन लॅपटॉप जप्त.

व्हीएस न्युज - पाच दुचाक्या आणि तीन लॅपटॉप असा एकूण २ लाख ४० हजारांच्या ऐवजासह पिंपरी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई चिंचवड मोहननगर परिसरातील मिल्कमेड कंपनीसमोर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिसांचे एक पथक रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारांचा तपास घेण्यासाठी चिंचवड मोहननगर परिसरातील मिल्कमेड कंपनीसमोर गस्त घालत होते. यावेळी त्यांना एका दुचाकीवर दोन अल्पवयीन तरुण संशयितरित्या फिरत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पाच दुचाक्या आणि तीन लॅपटॉप असा एकूण २ लाख ४० हजारांच्या ऐवज चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी तो ऐवज जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस कर्मचारी राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, महादेव जावळे, श्रीकांत जाधव, अजिनाथ सरक, जावेद बागसिराज, प्रतिभा मुळे, अविनाश देशमुख, उमेश वानखडे, रोहित पिंजरकर यांच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
पुण्यात अतिरिक्त आयुक्तांना महापौरांसमोर बेदम मारहाण

व्हिएस न्युज - पुण्यात अतिरिक्त आयुक्त असलेल्या राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांसमोरच बेदम मारहाण करण्यात आली. नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून महापौर दालनात हे कृत्य करण्यात आले. जलपर्णी हटवण्याच्या गैरव्यवहाराबाबत विचारणा करत असताना ही घटना घडली. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या.

महापालिकेमध्ये दुपारच्या सुमारास अशाप्रकारची घटना घडल्याने त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जलपर्णी गैरव्यवहारात भाजपाचे पदाधिकारी आणि अधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महापौर दालनात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान ‘दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकानी महापौरकडे केली. ज्यांनी निविदा काढल्या त्यांच्याकडून खुलासा नको, अधिकारी चोर आहेत अशा घोषणाही कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त निंबाळकर त्याठिकाणी उपस्थित होते.

नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर यांनी निंबाळकर यांना जलपर्णीच्या विषयाबाबत काही प्रश्न विचारले. त्यांनी दिलेल्या उत्तराने संबंधितांचे समाधान न झाल्याने त्यावर वाद निर्माण झाला. यावेळी नगरसेवकांसोबत उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘अधिकारी चोर आहेत’ असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला. त्यावर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर म्हणाले, ”हे ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नसून तुमची काय लायकी आहे”. याबाबत महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, अतिरिक्त आयुक्तांचे विधान योग्य नसून संबधित निविदेची २४ तासात चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...Read More

V. S. News
पुणे ; गार्डन वडापाव, ‘बागबान’वर कारवाई

व्हिएस न्युज - स्वच्छता न ठेवून आणि विना परवाना अन्नपदार्थाची विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील कॅम्प भागातील गार्डन वडापाव सेंटर, अख्तर केटरर्स आणि बागबान हॉटेलला अन्नपदार्थ विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरात विनापरवाना, नोंदणीशिवाय हॉटेल केटरर्स व वडापाव विक्री करणाऱ्यांवर एफडीएकडून कारवाईची मोहिम उघडण्यात आली आहे. कॅम्प येथील गार्डन वडापाव सेंटरची पाहणी केल्यानंतर तेथे अस्वच्छता आढळून आली. तसेच, कामगारांची अस्वच्छता, पाण्याची अयोग्य साठवणूक, विना परवाना व्यवसाय, खराब प्रतीच्या बटाट्यांचा वापर आढळून आला.

यासोबतच पावाचा तपासणी अहवाल नसल्याचेही समोर आले आहे. बागबान रेस्टरँटची प्रशासनाने पाहणी केल्यावर तिथेही अस्वच्छता आढळून आली. एमजी रस्त्यावरील मे. अख्तर केटरर्समध्ये मोठ्या प्रमाणावर समोसा उत्पादन केले जाते. तेथे अस्वच्छतेसोबतच झुरळांचा मोठ्या प्रमाणात वावर आढळून आला. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करून विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती 'एफडीए'ने दिली आहे. ही कारवाई सहआयुक्त सुरेश देशमुख, सहायक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी व इम्रान हवालदार यांच्या पथकाने कली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!