व्हिएस न्युज - मोहसीन शेख या तरुणाच्या हत्याला पाच वर्ष पूर्ण होत असून मोहसीन शेख ला त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी “जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट” तर्फे काही प्रमुख मुद्दे घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभारउ असून विविध मागण्या साठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून तरुणांनी एकत्र येत जवळपास १७३ ठिकाणाहून राज्यपाल व मुख्यमंत्री यांना तहसिलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यात २ जून २०१४ मोहसीन शेख या तरुणाची हत्या करण्यात आली होती. सोशल मीडिया वर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या गेल्या होत्या कुठून टाकल्या होत्या,कोणी टाकल्या होत्या पत्ता लागायच्या आत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मोहसीन शेख चा त्यात बळी घेतला गेला. मोहसीन च्या हत्येला आक्षेपार्ह पोस्टचा आधार घेतला गेला मात्र त्या पोस्ट चा आणि त्याचा काडीचा सुद्धा संबंध नव्हता. हत्या करायला कारण मात्र फक्त चेहऱ्यावरील दाढी आणि डोक्यावरील टोपी होती.
कट्टरवाद्यांनी नाहक एका निरपराधाचा जीव घेतला होता. न्यायाच्या प्रतीक्षेत मोहसीन चे वडील सादिक शेख यांचा मृत्यू झाला. आई शबाना परवीन ह्या आजारपणामुळे अंथुरनाला खिळून आहेत. मोहसीन चा छोटा भाऊ मुबीन वर सगळी जबादारी येऊन पडली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत मोहसीन शेख ला त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी “जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट” तर्फे काही प्रमुख मुद्दे घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभा केला गेला असून त्यांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे
मोहसीन शेख यांच्या हत्येला येत्या २ जून २०१९ ला मोहसीन च्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होतील. मोहसीन शेख हत्या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई सह १७३ ठिकाणाहून निवेदन सादर केले गेले. अशी माहिती जस्टिस फॉर मोहसीन मुव्हमेंटचे आयोजक सदस्य इम्रान शेख, इरफान शेख सुफियान मणियार, जुनेद आत्तार, अख्तर शेख यांनी दिली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002