व्हीएस न्युज - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. दिपक शहा यांची निवड करण्यात आली आहे. चिंचवड, बिजलीनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये समितीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी निवडण्यात आली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पिंपरी-चिंचवड शाखा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – राधाबाई वाघमारे (उपाध्यक्ष), संजय बारी (कार्याध्यक्ष), एकनाथ पाठक, अंजली इंगळे (प्रधान सचिव), भूषण महाजन (कायदा सल्लागार), विजय सुर्वे (विविध उपक्रम कार्यवाह), चारुदत्त बुद्धीसागर (वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यवाह), संजय बनसोडे (बुवाबाजी संघर्ष कार्यवाह), रविंद्र बोर्लिकर (वार्तापत्र विभाग कार्यवाह), निलकंठ शिरसाठ व राहुल उजगरे (सांस्कृतिक अभिव्यक्ति कार्यवाह), ऋषिमुनी लोखंडे व मंजुषा गायकवाड (युवा सहभाग कार्यवाह), शुभांगी घनवट (महिला सहभाग कार्यवाह), विवेक सांबरे (प्रशिक्षण विभाग कार्यवाह), आनंद बनसोडे (निधी संकलन), विजय आरक (जातीअंत संकल्प विभाग), देविदास इंगळे (सोशल मीडिया व्यवस्थापन), विश्वनाथ अहिरे (मानसिक आरोग्य विभाग).
व्हीएस न्युज - औषधांच्या व्यावसायातील भागीदारीचे बनावट कागदपत्रे तयार करुन चौघाजणांनी मिळून एका महिलेला ४३ लाख ३९ हजार रुपयांना गंडा घातला. ही घटना २२ डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान घडली. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, सवाराम देवासी (वय ३२), चैनी देवासी (वय ३०), स्मिता देशमुख (वय ३९, तिघे रा. ओम चौक, चिंचवड) आणि योगेश देशमुख (वय ४३) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची ग्लोबल फार्मा या कंपनीत आरोपींसोबत भागीदारी आहे. २२ डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत चौघा आरोपींनी अपसात संगनमत करुन बनावट कागदपत्रे बनवली आणि महिलेची भागीदारी रद्द केली. त्यानंतर आरोपींनी कंपनीच्या बँक खात्यातील ४० लाखांचा चेक फिर्यादी यांना न सांगता एका व्यक्तीला दिला. तसेच महिलेने कंपनीत गुंतवलेले ४३ लाखांची रक्कम परत न करता फसवणुक केली.
याप्रकरणी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्युज - मेरीट लँडमार्क या फसव्या कंपनीद्वारे दामदुप्पट, बक्षीस व प्लॉट देण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याला तब्बल १८ लाखांचा गंडा घालणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये कंपनीने इतर नागरिकांनाही कोट्यावधीचा गंडा घातल्याचा प्रकार यातून उघड झाला आहे.
याप्रकरणी सोना आण्णा साठे (वय-४३, रा. जवळके, अहमदनगर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी आरोपी महादेव विश्वनाथ साळुंके (वय-४८, रा. सांगवी), महेश प्रकाश मुंगसे (वय-३७, रा. चिखली), सुरेश भानुदास जाधव (वय-४४, रा. देहुरोड) व किरण प्रकाश अटपाळकर (वय-२४, रा. हिंगणे, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. यातील महादेव व सुरेश जाधव यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाचही जणांनी पिंपरी येथील कमला क्रॉस रोड येथे मेरीट लँडमार्क ही कंपनीचे ऑफीस सुरु केले होते. या कंपनीद्वारे त्यांनी साठे यांना विश्वासात घेतले व त्यांना दाम दुप्पटीचे, बक्षिसाचे व प्लॉट देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख १८ लाख रुपये घेतले. यावेळी साठे यांना कंपनीच्या नावाच्या पावत्या व सर्टिफिकेट दिले. यातील कंपनीने आत्तापर्यंत १ लाख ४० हजार रुपये साठे यांना कंपनीने दिले आहेत. मात्र त्यानंतर एकही परतावा कंपनीने दिलेला नाही. हा घोटाळा केवळ साठे यांच्यापुरताच नाही तर समृद्ध जीवन प्रमाणे अनेकांचे पैसे या कंपनीने बुडवल्याचा प्रकार सोमार आला आहे. यामध्ये मेरीट लँडमार्क ही कंपनी उघडून एजंटनी त्यांच्या जनसंपर्काचा वापर करत बीड, कोल्हापूर, पुणे, जळगाव व मुंबई येथील नागरिकांचे कोट्यावधी रुपये गोळा केले होते. त्या पैशांचा वापर त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे आरोपीने कबुल केले आहे. याप्रकरणी आरोपींना पोलीस कस्टडी सुनावण्यात आली असून याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख करीत आहेत.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस हवालदार राजेंद्र भोसले, पोलीस नाईक जावेद बागसिराज, महिला पोलीस नाईक प्रतिभा मुळे यांनी ही कारवाई केली.
व्हीएस न्युज - बहिनीची छेड काढल्याच्या रागातून भावाने एका युवकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हि घटना दिघी मधील मॅगजीन चौकात घडली असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार युवक विक्रम वाघमारे (वय,२५ वर्ष) याने संतोष चौधरी याच्या बहिनीला छेडले असल्याचा आरोप करत संतोष आणि युवकामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर संतोषने बाजूला पडलेला लोखंडी रॉडने युवकच्या डोक्यावर हल्ला करीत त्याला जीवे मारले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचून पंचनामा सुरु केला. दरम्यान संतोष चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
व्हीएस न्युज - खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या व शिवसैनिकांविरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी खरपूस समाचार घेतला होता. राणे यांच्या विरोधात दाखले यांनी वाकड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यांनी दाखवलेले कार्य धाडसाचे असल्याचे सांगत शाबासकीची थाप उध्दव ठाकरे यांनी युवराज दाखले यांच्या पाठीवर दिली आहे.
मुंबईत मातोश्री येथे दाखले यांच्यासह सर्व शिवसैनिकांची उध्दव ठाकरे यांनी भेट घेऊन पुढेही असेच धाडसी कार्य करत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना सचिव खासदार आनिल भाऊ देसाई यांनी युवराज दाखले यांचा पुष्पगुच्छ देऊन मातोश्रीवर सत्कार केला. याप्रसंगी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, अमोल कोल्हे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटी, बाळासाहेब गायकवाड, मारूती मस्के, शिवसेना विभागप्रमुख प्रदिप दळवी, मनोज शिंदे, आशिष वाळके, रविकिरण घटकार, सौरभ शेंडगे, नवनाथ जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले हे त्यांच्या समर्थकांसोबत आपले स्वतंत्र आस्तित्व निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे. दिवंगत माजी शिवसेना शहरप्रमुख नेताची चव्हाण, बाबासाहेब धुमाळ, तसेच भगवान आप्पा वाल्हेकर, बाजीराव लांडे व भारतीय विद्यार्थीं सेनेचे माजी शहरप्रमुख रामभाऊ उबाळे, माजी उपशहरप्रमुख दिलीप आंब्रे यांच्या नंतर पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेमध्ये शिवसेना स्टाईल आक्रमक नेतृत्व युवराज दाखले यांच्या रूपाने उदयास येत आहे.
व्हिएस न्युज - किरकोळ वादातून मित्रानंच मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरण काटकर (वय 28 वर्ष) याची मंगळवारी (5 फेब्रुवारी) पहाटे डोक्यात दगड घालून हत्या केली.
नऱ्हे येथील अभिनव कॉलेज मार्गावरील सर्व्हे क्रमांक 8मध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेतील पत्राच्या शेडमध्ये किरणची हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री किरण आणि त्याचा मित्र पप्पू पाटील हे दोघेही दारूच्या नशेत होते. यावेळेस दोघांमध्ये भाजी आणण्यावरून वाद झाला. या वादातून पहाटेच्या सुमारास आरोपीने किरणच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले पण आरोपी फरार झाला आहे. पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहेत.
व्हीएस न्युज - वाकड-पिंपळे निलख परिसरातील कावेरी चौक, सबवे ते पिंक सिटी कॉर्नर आणि काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक येथील सिमेंट काँक्रिट रोडच्या विकासकामास आज स्थायी समिती सभेत स्थायी समिती सभापती ममताताई विनायक गायकवाड यांनी मंजुरी देत हा विषय मंजूर केला.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक दिवस वाकड-पिंपळे निलख परिसरातील रोड सिमेंट काँक्रिटचे होण्याकरिता स्थायी समिती अध्यक्षा ममता विनायक गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड पाठपुरावा करीत होते. यावेळी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड म्हणाल्या की “वाकड-पिंपळे निलख मधील हे सिमेंट काँक्रिटचे रस्ते हे मॉडेल रोडच्या धर्तीवर तयार करण्यात येणार आहेत. या रस्त्यांमध्ये नागरिकांना चालण्यासाठी प्रशस्त फुटपाथ, वाहनांना पार्किंगसाठी पार्किंग व्यवस्था, विविध ठिकाणी सोलर चार्जिंग युनिट, नागरिकांना व ज्येष्ठांना बसण्यासाठी आरामदायी व आकर्षक बेंचेस, विविध ठिकाणी सोलर चार्जिंग युनिट्स, डस्टबीन, बोलार्ड बसविणे, विविध ठिकाणी फुटपाथ लागत हरितपट्टा तयार करणेत येणार आहेत, विविध सेवावाहिन्यांनसाठी डक्टची व्यवस्था असणार आहे. असे हे स्मार्ट काँक्रीट रस्ते वाकड-पिंपळे निलखमधील नागरिकांना लवकरच पाहायला व अनुभवायला मिळतील.”
आजच्या स्थायी समितीच्या सभेत या रस्त्यांच्या विषयास स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी तात्काळ मंजुरी देत ही कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासंदर्भात संबंधित विभागास निर्देश दिले.
व्हीएस न्युज - पिंपरी- चिंचवड येथे मानसिक आजाराने ग्रासलेल्या तन्मय दास गुप्ताने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या अकाली निधनाने त्याच्या आईलाही धक्का बसला… मुलाच्या विरहाने खचलेल्या आईचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एकाच दिवशी मुलगा आणि आईचा मृत्यू झाल्याने गुप्ता कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या तन्मय दास गुप्ता (वय ३६) याच्यावर दहा वर्षापासून मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार सुरू होते. त्याने गेल्या दोन महिन्यापासून गोळ्या घेतलेल्या नव्हत्या. सोमवारी रात्री आई शुक्ला दास गुप्ता या तन्मयला घेऊन डॉक्टरकडे गेल्या होत्या. त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास तो घरी आला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वतः च्या पोटच्या मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून शुक्ला यांना हृदय विकाराचा झटका आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शुक्ला यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांचा दुसरा मुलगा बेंगळुरू येथे राहतो. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तन्मयने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
व्हीएस न्युज - पुण्याच्या प्रसिद्ध जहांगिर रुग्णालयात एमआरआय काढण्यासाठी आलेल्या एका महिलेचा कपडे बदलताना व्हीडिओ चित्रित केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लाकेश लहु उत्तेकर (वय २५)(रा. धानोरी) याला बेड्या ठोकल्या आहेत.
शनिवार रात्रीच्या सुमारास पोट दुखत असल्याने संबंधित महिला एमआरआय काढण्यासाठी रुग्णालयात आली होती. त्यावेळी तिथल्या वॉर्डबॉयने महिलेला एका रुममध्ये कपडे बदलायला पाठवले. तेव्हा वॉर्डबॉयने तिचा व्हीडिओ चित्रित केला.
रुममध्ये कपडे बदलत असताना आपला कोणीतरी व्हीडिओ काढत असल्याचा प्रकार संबंधित महिलेच्या लक्षात आला. तिने लगेचच ही बाब आपल्या पतीला सांगितली. पतीने या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. तसेच पतीने रुग्णालय प्रशासनाकडेही या घटनेची तक्रार केली. पण रुग्णालय प्रशासनाकडून याबद्दल कोणतीही दखल घेतली गेली नाही. अखेर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संबंधीत आरोपीला अटक केली आहे. तसेच कोरेगाव पार्क पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
जहांगीर रुग्णालयाचे स्पष्टीकरण
जहांगीर रुग्णालयाने एक पत्र काढून यामध्ये आरोपी लंकेश ऊतेकर हा जहांगीर रुग्णालयाचा कर्मचारी नाही. तो साफसफाई करण्यासाठी नेमलेल्या एंजसीचा कर्मचारी असल्याचे पत्रात नमूद केले आहे. एमआरआय रुममध्ये मोबाईल बाळगण्याची परवानगी नसतानाही त्याने मोबाईल नेला होता. याप्रकरणी आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत. तसेच संबंधित एजन्सीसोबत असलेला करारही रद्द करणार आहोत. जहांगीर हॉस्पिटलची 73 वर्षाची विश्वासाची परंपरा आम्ही यापुढेही कायम ठेऊ. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सर्व रुग्णांची माफी मागण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांना आम्ही संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे जहांगीर रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
व्हीएस न्युज - समाजात राहताना सामाजिक भावना असणे गरजेचे आहे याचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ बडोदा च्या पिंपरी चिंचवड परिसरातील शाखांच्या कर्मचाऱ्यांनी आकुर्डी मध्ये असणाऱ्या संत बाबा मौनी साहेब वृद्ध आश्रमाला दिलेली भेट. या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांनी आश्रमाचे काम बघितले आणि आश्रमाच्या कार्य पद्धती जाणून घेतल्या, आश्रमात राहत असलेल्या वृद्ध स्त्रिया व पुरुषांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
आश्रमाचे मुख्य संचालक व प्रसिद्ध गायक अशोक खोसला यांनी आश्रमसंबंधी माहिती सांगितली व आश्रमाच्या गरजां संबंधित माहिती दिली. बँक ऑफ बडोदाच्या सामाजिक बांधिलकी कार्यक्रमांतर्गत बँक ऑफ बडोदाच्या पिंपरी चिंचवड, पीसीएमसी, चाफेकर चौक व आकुर्डी शाखांतर्फे संत बाबा मौनी साहेब वृद्ध आनंद आश्रमाला मदत म्हणून रुपये एक लाख रकमेचा धनादेश अशोक खोसला यांच्याकडे देण्यात आला.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड शाखेचे सहायक महाप्रबंधक श्री विनय कदम, पीसीएमसी शाखेचे मुख्य प्रबंधक श्री संजय बर्वे, चाफेकर चौक शाखेच्या प्रबंधक नम्रता व आकुर्डी शाखे प्रबंधक तसेच चारही शाखांचे कर्मचारी उपस्थित होते.
व्हीएस न्युज - बावधन येथील एका बंगल्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला घातक हत्यारांसह हिंजवडी पोलीसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.२१) रात्री दहाच्या सुमारास बावधन येथील रामनगर कॉलनीमध्ये करण्यात आली.
समीर उर्फ पप्पु बबन गुजर (वय २८, रा. मुळशी), किरण कुमार पिल्ले (वय २१), अजितेश राजाराम चव्हाण (वय १९), विनायक उर्फ सुनील राऊत (वय २६) आणि रितेश सुभाष शिंदे (वय २०, चौघे रा. पिरंगुट) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास बावधन परिसरात हिंजवडी पोलीस गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना बावधन येथील रामनगर कॉलनीमध्ये पाच तरुण संशयितरित्या उभे असलेले दिसले. यावेळी पोलीसांनी स्टाफसह सापळा रचून पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार, कोयता, स्प्रे हे साहित्य आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता ते रामनगर कॉलनीमधील एका बंगल्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी पप्पु गुजर याच्यावर पौड पोलीस ठाण्यातील मारहाण आणि कोल्हापूर येथील वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी गवारे, उपनिरीक्षक अशोक गवारी, वरुडे, वलटे, पोलीस कर्मचारी किरण पवार, प्रमोद पवार, अतिक शेख, कुणाल शिंदे, श्रीकांत चव्हाण, सुभाष गुरव, झनकसिंग गुमलाडु, अमर राणे यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्युज - पतीने पत्नीच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवल्याने ३५ वर्षीय पत्नीने पती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना पिंपरीतील कामगारनगर येथे घडली.
याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी ३८ वर्षीय पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पत्नीच्या मोबाइलवर ३८ वर्षीय पती गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अश्लील मेसेज पाठवत होता. अखेर याला कंटाळून पत्नीने पिंपरी पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
चार ते पाच वर्षांपासून पती पत्नीनेचे पटत नव्हते, दोघांमध्ये सतत वाद होत असत. अखेर दोघांनी वेगळ राहण्याचा निर्णय घेतला आणि पाच महिन्यांपासून ते वेगळे राहात होते. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. मुलांचा सांभाळ पती करत असून ते नाशिक येथे वाहनचालक म्हणून काम करतात. तर पत्नी भावाकडे राहते, गेल्या काही महिन्यांपासून पती सतत पत्नीला अश्लील मेसेज करत होता. पत्नीने अनेक मेसेज डिलीट करत दुर्लक्ष केले. परंतु, मेसेजचा अतिरेक होत असल्याने अखेर पत्नीने पिंपरी पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002