व्हिएस न्युज - वडील व बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत महिला पोलिस कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे.
शुभम गजानन मोहिते असे अटक झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी शुभम हा पुण्यातील मोटार वाहन परिवहन विभागात कार्यरत आहेत. शुभम याने फिर्यादी महिलेला लग्नाची मागणी घातली. त्यास महिलेने नकार दिला असता त्याने महिलेच्या वडीलांना व बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत महिलेशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर महिलेने आरोपीकडे लग्नाची मागणी केली असता आरोपीने त्यास नकार दिला. तसेच याबाबत तक्रार केल्यास महिलेचे वडील व बहिणीची सरकारी नोकरी घालविण्याचीही धमकी दिली. द
याबाबत महिलेने आरोपीची आई व बहिणीस सांगितले असता त्यांनी महिलेस वाईट वागणूक दिली. यासह आरोपीने फिर्यादी महिलेशी जातीवाचक संभाषण केल्याने आरोपीवर अॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिएस न्युज - औद्योगिक क्षेत्रात लागू झालेल्या नीम (नॅशनल एम्प्लॉएबिलिटी एन्हेन्समेंट मिशन) या योजनेत कामगारांच्या मुलभूत हक्कांवर गदा येत असून त्यांचे शोषण होत आहे. या योजनेविरोधात देशातील कामगार संघटनांनी विरोध केला असून श्रमिक एकता महासंघाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. संघटनेच्या या लढयास माझा पाठिंबा आहे. कामगारांना त्यांचे मुलभूत हक्क मिळाले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी मंगळवारी (दि. 12) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत केले. औ
क्षेत्रात काम करणा-या कामगारांना भविष्य निर्वाह निधी आणि अन्य सुविधा मिळाव्यात यासाठी खा. साबळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि कामगारांना भविष्य निर्वाह निधी लागू करावा याचे आदेश दिले. त्याबद्दलची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार, कार्याध्यक्ष संतोष कणसे, सचिव मनोज पाटील, मार्गदर्शक मारूती जगदाळे, नगरसेवक केशव घोळवे, माऊली थोरात, अरविंद श्रौती, ॲड. नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते. खा
साबळे म्हणाले, श्रमिक एकता महासंघाने नीम योजनेमुळे कामगारांचे हाल, शोषण याची व्यथा आपल्या पुढे मांडली. तसेच मी स्वतः कामगार मंत्रालयाच्या समितीवर असल्यामुळे देशातील अनेक कामगार संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांची प्रत्यक्ष भेट घेतली. नीम योजनेमुळे कामगारांचे शोषण होत आहे. त्यांना सामाजिक सुरक्षा, मुलभूत हक्क मिळत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवाल तसेच संबंधित अधिका-यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यामुळे भविष्य निर्वाहनिधी विभाग आणिा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांना या प्रश्नी कारवाई करणे भाग पडले. तर दि. 12/2/2019 ला भविष्य निर्वाह निधीचे अतिरिक्त आयुक्त जगमोहन यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नीम अंतर्गत नेमणूक केलेल्या प्रशिक्षणार्थींना कर्मचारी म्हणून संबोधण्यात यावे, त्यांना पीफ कायद्यानुसार सर्व फायदे देण्यात यावे असे आदेश दिले. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असे ही बजावण्यात आले, असल्याचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी सांगितले.
अरविंद श्रौती म्हणाले, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वतीने कौशल्य विकास विभागाचे निर्देशक कैलाश बन्सल यांनी सर्व नीम ठेकेदारांना पत्र पाठविण्यात आले असून नीम योजना केवळ प्रशिक्षण देण्यासाठी असल्याचे नमुद केले आहे. तसेच याव्दारे कामगारांचे शोषण होत अल्यास ठेकेदारांची नोंदणी रद्द केली जाईल असे निर्देश दिले आहेत, असे श्रौती यांनी सांगितले. श्रमिक एकता महासंघाने केलेल्या सर्वेक्षणात एकट्या पुणे जिल्हयात नीम योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी कामगारांची संख्या सुमारे 2 लाख आहे. देशाचा विचार केल्यास हीच संख्या कोटींच्या घरात आहे. कामगारांच्या अन्य प्रश्नांवर खा. साबळे यांच्या सहकार्याने योग्य तो तोडगा निघेल, असा विश्वास महासंघाचे सल्लागार नगरसेवक केशव घोळवे यांनी व्यक्त केला.
व्हिएस न्युज - विधवांना संपत्तीमध्ये पुरुषांप्रमाणेच समान हक्क मिळावा यासाठी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी काम केले. स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाल्यामुळे ब्रिटीशांनी त्यांना अहमदनगर येथील तुरुंगात ठेवले. तेथे त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात नेहरूंनी सिंधु सभ्यतेपासुन, भारताचे स्वातंत्र्य, भारतीय संस्कृती, धर्म आणि संघर्षाचे वर्णन केले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. 14 नोव्हेंबर) आकुर्डी प्राधिकरणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे यांच्या हस्ते पंडीत नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नेत्या बिंदू तिवारी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, ज्येष्ठ नेते हरिदास नायर, सुदाम ढोरे, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, ज्येष्ठ नागरीक सेलचे उपाध्यक्ष लक्ष्मण रुपनर, दिलीप पांढरकर, हुरबानो शेख, मिना गायकवाड, संदेश बोर्डे, दिपक जाधव, निर्मल तिवारी, हिरामण खवळे, सचिन नेटके, सुनिल राऊत, गौरव चौधरी, भाऊसाहेब मुगूटमल, भास्कर नारकडे आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, भारत देशाला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी ‘भारतीय स्वातंत्र्य लीग’ ची स्थापना केली. परदेशात शिक्षण घेत असताना आर्यलंड मध्ये झालेले सिन फेन आंदोलन त्यांनी जवळून पाहिले होते. त्यातूनच त्यांनी प्रेरणा घेऊन ब्रिटिश साम्राज्यापासून भारत मुक्त करण्याचे ध्येय घेऊन स्वातंत्र्य संग्रामात स्वत:ला झोकून दिले. 1920 साली शेतक-यांसाठी त्यांनी प्रथम उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात किसान मोर्चाचे आयोजन केले, त्यानंतर असहकार चळवळ आणि मिठाचा सत्याग्रह आंदोलनात त्यांना दोन वेळा तुरुंगात जावे लागले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा प्रतिनिधी म्हणून परदेशात अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनात उपस्थित राहण्याची संधी मिळाली. सायमन कमिशनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी केले. 29 ऑगस्ट 1928 रोजी त्यांनी सर्वपक्षीय परिषदेत भाग घेतला आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या भारतीय घटनात्मक सुधारणेवरील नेहरू अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी ते एक होते. असे साठे यांनी सांगितले.
स्वागत मयूर जयस्वाल, सुत्रसंचालन गौरव चौधरी आणि आभार मकरध्वज यादव यांनी मानले.
व्हिएस न्युज - पुणे-पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघातून नवनिर्वाचित आघाडीचे आमदार संजय जगताप यांची सांगता सभा श्री काळभैरवनाथ मंदीर प्रांगणात झाली.मतदारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी देशाचे लोकनेते शरदचंद्र पवार , माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ,बारामतीच्या लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचे विशेष म्हणजे आभार मानले. तसेच मतदरसंघातील कार्यकर्ते ,सहकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, व उपपस्थितांचे आभार मानले.
या दरम्यान ते म्हणाले की "हवेली- पुरंदर भागातून मला खूप उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. माझेकडे बोलायला शब्द नाहीत. यवेळी बोलताना ते भावुक झाले ते म्हणाले,ज्यावेळेस माझ्या आई मतदान केंद्रात आल्या, तेव्हा काकांची कमतरता मला जाणवली असे सांगताना ते भावूक झाले. आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. परंतु मोठ्या प्रेमाणे आपण सर्वांनीच आदरणीय काकांची जागा,तेथे माझ्या पाठीवर थाप देऊन भरून काढलीत . मी सर्वाना शब्द देऊन सांगतो की , हे क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. मी जरी आमदार झालो तरी तुम्ही आमदार झाले आहात. तन ,मन ,व धनाने मी तुमचे सोबत असेन प्रत्येक घरातील मी कुटुंब सदस्य राहील. अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिलीे."
नुकतेच निधन पावलेले कै.विलासभाऊ कामथे यांनी १००० मतांची आघाडी मिळवून दिली असेही त्यांनी आवर्जून सांगितले. मी आज तुमचेेसाठी केवळ सरच आहे व तुम्ही माझेसाठी सर्व आमदार आहात. पुरंदर हवेली, सासवड,जेजुरी सर्वाना एकी दाखवली. याबद्दल त्यांनी सर्वांचेच आभार मानले व सभेची सांगता झाली. प्रचंड जनसमुदाय , महिला, युवक सगळीकडे आनंद अगदी ओसंडून वाहत होता.
एकाच ठेक्यावर ताल धरून विशेष म्हणजे महिला, अबाल वृध्द, युवक जोश पूर्ण ताल धरत बेभान नाचत असलेचे चित्र दिसत होते. सर्व वातावरण संजयमय झाले होते. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमुळे हे शक्य झाल्याची चर्चा व नवनिर्वाचित आमदार संजय सर यांचे उल्लेखनीय कार्य तसेच शेकाप,जनतादल ,मनसे आदी सर्वांनीच एकदिलाने काम केलेमुळे सरांना यश प्राप्त झाले, असे विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, डॉ . दिगंबर दुर्गाडे , अँँड.कलाताई फडतरे, संजय चव्हाण, नंदकुमार सागर, संजय हरपळे, सुदाम आणा इंगळे, शेकापचे दिलीप गिरमे, सुहास लांडगे, अॅड. सुरेश फडतरे , दत्ताशेठ झुरंगे, आदी मान्यवर उपस्थीत होते.
व्हिएस न्युज - पिंपरी गाव येथील नव महाराष्ट्र शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोमवारी (दि. 21) सव्वाबाराच्या सुमारास विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असताना पिंपरीतील मतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून थांबल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी 21 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेशकुमार मुन्नीलाल चौरसिया (वय 28), जितेंद्र कुमार रामकेस चौरसिया (वय 30), अजित सारदा शर्मा (वय 28), दीनानाथ रामकेस निसाद (वय 19), राहूल जितेंद्र यादव (वय 20), रोहीत रामबच्चन यादव (वय 20), सुमन मोहनराम कुमार (वय 19), विनोद सीताराम पाल (वय 21), वीरेंद्र रामविलास पाल (वय 24), यशवंत गुलजारी पासवान (वय 35), कुलदीप चंद्रभोकनसिंग कुमार (वय 19), अखिलेश कुमार सुरजबाबू (वय 24), अनिल कुमार शंकर यादव (वय 23), पवनकुमार लालबाबू गौतम (वय 23), दिलीप गंगाधर भोर (वय 20), अनिल धन्नू जाधव (वय 25, सर्व रा. कस्पटे वस्ती, वाकड). अरबाज जुबेर सय्यद (वय 20), संतोष राम जाधव (वय 22), वैभव श्रीमंत नरवडे (वय 20), गजानन सुभाष जाधव (वय 20), गणेश अनिल अवसरे (वय 20, रा. काळेवाडी फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूक काळात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करून आरोपींनी पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गर्दी केली होती. याठिकाणी मतदान केंद्र होते. पोलिसांनी त्यांना त्याठिकाणावरून जाण्याची विनंती केली होती. तरीही, त्यांनी त्याठिकाणी गर्दी जमवली. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहित कलम 188 आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
व्हिएस न्युज - अमेरिकेतील स्वाहिली विद्यापीठाच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई पाटील यांना ‘व्यवसाय व्यवस्थापन’ विषयात मानद डॉक्टरेट ऑफ आर्ट्स ही पदवी देऊन गौरवण्यात आले. विद्यापीठाच्या वतीने गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात पदवीप्रदान समारंभ झाला.
सौ. भाग्यश्रीताई पाटील यांचे शिक्षण, आरोग्य सेवा, बायोटेक्नॉलॉजी, फलोत्पादन आणि फ्लोरीकल्चर तसेच महिला सबलीकरण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. या क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान आणि भावी पिढीला प्रेरणा देण्यात त्यांनी बजावलेली भूमिकेची विशेष दखल स्वाहिली विद्यापीठाने घेतली.
पिंपरी येथे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व संशोधन केंद्र स्थापन करण्यात त्यांचा पती डॉ. पी.डी पाटील यांच्यासह मोठा वाटा आहे. या रुग्णालयास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत खाजगी क्षेत्रातील रूग्णालयामध्ये "कायाकल्प पुरस्कार 2019" देऊन देशातील सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून घोषित केले. उच्च प्रतीची रुग्णसेवा या जनहितार्थ विनामूल्य व काही सेवा या रुग्णालयात माफक शुल्कात दिल्या जातात.
शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी सौ. भाग्यश्रीताई पाटील यांनी 2004 मध्ये ‘राईझ एन शाइन बायोटेक’ कंपनीची स्थापना केली गेली. या कंपनीच्या त्या व्यवस्थापकीय संचालिकाही आहेत.
आयएसओ 9001-2015 मानांकीत ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वनस्पतींची जगभरातील 30 हून अधिक देशांना निर्यात करते. यामध्ये मोठ्या आणि सुसज्ज टिशू कल्चर प्रयोगशाळेतही गुंतवणूक केली गेली आहे जी वर्षाला 40 दशलक्षाहून अधिक रोपे तयार करते. सौ. पाटील यांचा महिला सक्षमीकरणावर विश्वास आहे. थेऊर येथे ग्रामीण भागातील 95 टक्के महिला नोकरी उपलब्ध करून दिली आहे आणि त्यांना उत्पादन प्रक्रियेत तांत्रिक प्रशिक्षण दिले. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी. “बचतगट” सारख्या विशेष योजना सुरू केल्या आहेत.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील पदाधिकारी कर्मचारी वर्ग यांनी सौ भाग्यश्री ताई पाटील यांचे अभिनंदन केले आहे
व्हिएस न्युज - सासवड-पुरंदर-हवेली या विधानसभा मतदार संघाचे महाआघाडीचे लोकप्रिय उमेदवार संजय चंदुकाका जगताप यांना त्यांच्या मतदारसंघातील युवक, महिला भगिनींचा आणि वयोवृद्दांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे.
आघाडी झाल्यापासून पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढलाय,संजय जगताप यांना राष्ट्रवादीचे भक्कम पाठबळ आहे आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला कौटुंबिक वारसा लाभलेले आहे.
संजय जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून लोकसेवा करीत आहेत.त्यांच्या गेल्या १५ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेत मतदारसंघातील तरुणपिढी आणि महिला भगिनींनी संजय जगताप यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. सासवड पुरंदर हवेली येथून आमदार महाआगाडीचाच होणार असा विश्वास अनेक महिलांनी व्हिएस न्युज प्रतिनिधी सुजाता गुरव यांच्याकडे व्यक्त केला.
संजय जगताप यांनी सत्ता नसताना देखील अनेक तरुणांना नोकरीसाठी सहाय्य केले आहे. अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची त्यांची धडपड पाहून तरुण पिढी त्यांच्या पाठीशी आहे. महिलांसाठी बचत गट, स्वयंरोजगारासाठी कर्जसहाय्य अनेक दिवसांपासून ते करताहेत,योगा, व्यायाम शाळा, भजनी मंडळींसाठी साहित्य वाटप अशी अनेक कामे त्यांनी विकासाच्या दिशेने साकारलेली आहेत. दुष्काळात पाण्याच्या टँकर सोडून तर जनावरांसाठी छावणी उभारून लोकसेवा केली. त्यांना प्रचंड प्रमाणात महिला भगिनींची आणि वयोवृद्धांची साथ लाभली आहे.
संपूर्ण मतदारसंघातील मतदारांना प्रत्यक्ष भेटणे, गावभेट कोपरासभा अनेक रॅली मतदारसंघात काढण्यात आल्या. शनिवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पालखीतळ सासवड येथील प्रचार सभा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी काही महिलांनी आपले मनोगत व्हिएस न्युज कडे व्यक्त केले.
व्हिएस न्युज - डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे दि. १९ ऑक्टोबर २०१९ रोजी "आयुर्वेदातील संशोधन" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन श्री डॉ. के. एस. धीमान (डायरेक्टर जनरल, सी सी आर ए एस, नवी दिल्ली ) यांच्या हस्ते झाले . डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद व आय एम ए व्ही एफ नेदरलँड यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले . वेगवेगळ्या देशातील आरोग्यतज्ञ् , संशोधक, विद्यार्थी असे एकूण ४०० पेक्षा अधिक सहभागार्थी उपस्थित होते.
"आयुर्वेदातील संशोधनाचा प्रचार व प्रसार व्हावा, आयुर्वेदातील नवनवीन संशोधन करण्यास गती प्राप्त व्हावी तसेच या क्षेत्रात नवपिढीचे योगदान वाढावे आणि गुणवत्तापूर्ण संशोधन कार्य घडावे" या प्रमुख उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी मान्यवरांनी आपली मते मांडली श्री डॉ. के. एस. धीमान डायरेक्टर जनरल, सी सी आर ए एस, नवी दिल्ली) यांनी "भारत सरकारच्या आयुष विभागामार्फत आयुर्वेदाच्या संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत मार्गदर्शन केले व आयुर्वेद संशोधनातील संधींवर भाष्य केले"
मा.डॉ . जोस रुगे (शुद्ध धर्म मंडळ, ब्राझील) यांनी "ब्राझील मध्ये आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार कश्या पद्धतीने झाला व ब्राझील मध्ये कोण कोणत्या आयुर्वेदिक वनस्पती उपलब्ध आहेत! याबद्दल मार्गदर्शन केले तसेच भारतातील आयुर्वेद तज्ञांकडून मदतीची अपेक्षा केली"
मा. डॉ. सुभाष रानडे (अध्यक्ष - इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) याप्रसंगी "इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद मार्फत डॉ डी वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालयात विदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळतात व आयुर्वेदाचे यथार्थ ज्ञान मिळते"
मा. डॉ एन जे पवार (कुलगुरू,डॉ डी वाय पाटील विद्यापीठ) यांनी "आयुर्वेदातील संशोधनासाठी अन्य वैद्यकीय शाखांनी मदत करणे, त्यासाठीच्या सर्व मूलभत गोष्टी विद्यापीठात उपलब्ध असल्याची माहिती दिली"
मा डॉ गुणवंत येवला (प्राचार्य, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय ) यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्वांचे स्वागत केले कार्यक्रमाची रूपरेषा सांगून डॉ. जोस रुगे यांच्या मानपत्राचे वाचन केले.
मा. डॉ पी. डी. पाटील (कुलपती,डॉ डी वाय पाटील विद्यापीठ) व मा. सौ. भाग्यश्रीताई पाटील उपाध्यक्षा डॉ डी वाय पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटी) यांच्या मार्गदर्शनाखाली ही आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली.
या परिषदेच्या कार्यक्रमास मा. सौ. डॉ. स्मिता जाधव (विश्वस्त व कार्यकारी संचालक, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ )मा. डॉ एन जे पवार (कुलगुरू,डॉ डी वाय पाटील विद्यापीठ) मा. डॉ ए.एन. सूर्यकार (कुलसचिव, डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ) मा.डॉ . जोस रुगे (शुद्ध धर्म मंडळ, ब्राझील) मा. डॉ. सुभाष रानडे (अध्यक्ष - इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) मा. डॉ सुनंदा रानडे(उपाध्यक्ष, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) मा डॉ गुणवंत येवला (प्राचार्य, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय ) मा. डॉ बी.पी पांडे (सल्लागार, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) मा.डॉ. दिगंबर दिपंकर (आयोजन सचिव, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) मा. डॉ मंदार बेडेकर यांच्या उपस्थितीत परिषद संपन्न झाला. या
दोन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर देश विदेशातील तज्ञ् डॉक्टर्स परिषदेला संबोधित करतील. या मध्ये डॉ श्रीराम सावरीकर नवीदिल्ली, डॉ एम एस बघेल व डॉ अनुप ठकार , जामनगर, डॉ रमेश भोंडे , पुणे, डॉ. एन. श्रीकांत, नवीदिल्ल्ली, डॉ. सुप्रिया भालेराव, रणजित पुराणिक (धूतपापेश्वर) हे प्रमुख वक्त्यांनी संशोधनावर आधारित मते मांडली .
या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विविध विषयांवर शिक्षणतज्ञ् व्यावसायिक डॉक्टर्स, पद्युत्तर पदवी चे विद्यार्थी यांनी आयुर्वेदात केलेल्या संशोधनावर एकूण १३५ पेपर सादरीकर व २५ भिंतीपत्रक सादरीकरण केले . परदेशातून आलेल्या सहभागार्थीसाठी भारतीय संस्कृती दर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम व दीपोत्सवाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते . डॉ स्मृतिका तावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन डॉ. दिगंबर दिपंकर यांनी केले.
व्हिएस न्युज - भोसरी परिसरातील, वाढलेली गुन्हेगारी , हफ्तेवसुली , रेड झोन , झपडपट्टीचे प्रश्न ,आरोग्य ,शिक्षण , मूलभूत सुविधा , भ्रष्टाचार , जनतेच्या पैशाची अवास्तव उधळपट्टी , मतदार संघातीलविकास कामांमध्ये नातेवाईकांची भागीदारी , वाहतूक समस्या ,कामगारांचे प्रश्न अशा असंख्य प्रश्नांमुळे भोसरीचा विकास खुंटलेला आहे.या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सक्षम पर्याय म्हणून अपना वतन संघटनेच्या वतीने भोसरीचे अपक्ष उमेदवार विलास लांडे याना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष हरिशचंद्र तोडकर , संचालक सिद्दीकभाई शेख ,शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर , प्रवक्ते सॅन्ड्रा डिसोझा , तौफिक शेख यांसह मोठ्या प्रमाणवर कार्यकर्ते उपस्थित होते. रा
एकात्मतेसाठी व आपल्या सर्वांगीण विकासासाठी जातीयवादी प्रवृत्तीच्या पक्षांना अद्दल घडवण्यासाठी भोसरी मतदार संघातील सर्व मतदाराना संघटनेच्या वतीने भोसरी मतदार संघातून अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
व्हिएस न्युज - डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे दि. १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी "आयुर्वेदातील संशोधन" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद व आय एम ए व्ही एफ नेदरलँड यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या देशातील आरोग्यातज्ञ् , संशोधक, विद्यार्थी असे एकूण ४०० पैक्षा अधिक सहभागार्थी असतील.
"आयुर्वेदातील संशोधनाचा प्रचार व प्रसार व्हावा, आयुर्वेदातील नवनवीन संशोधन करण्यास गती प्राप्त व्हावी तसेच या क्षेत्रात नवपिढीचे योगदान वाढावे आणि गुणवत्तापूर्ण संशोधन कार्य घडावे" या प्रमुख उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचा उदघाटन कार्यक्रम दि १९ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११:३० वा मा श्री डॉ. के. एस. धीमान (डायरेक्टर जनरल, सी सी आर ए एस, नवी दिल्ली ) यांच्या हस्ते होणार आहे.
मा. डॉ.पी.डी पाटील (कुलपती, डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ) मा.सौ. भाग्यश्रीताई पाटील (उपाध्यक्षा डॉ. डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटी ) मा. सौ. डॉ. स्मिता जाधव (विश्वस्थ व कार्यकारी संचालक, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ ) मा. डॉ. एन. जे.पवार (कुलगुरू, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ) मा. डॉ ए.एन. सूर्यकार (कुलसचिव, डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ) मा.डॉ . जोस रुगे (शुद्ध धर्म मंडळ, ब्राझील) मा. डॉ. सुभाष रानडे (अध्यक्ष - इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) मा. डॉ सुनंदा रानडे(उपाध्यक्ष, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) मा डॉ गुणवंत येवला (प्राचार्य, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय ) मा. डॉ बी.पी पांडे (सल्लागार, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) मा.डॉ. दिगंबर दिपंकर (आयोजन सचिव, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) मा. डॉ मंदार बेडेकर यांच्या उपस्थितीत परिषद संपन्न होणार आहे या दोन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर देश विदेशातील तज्ञ् डॉक्टर्स परिषदेला संबोधित करतील यामध्ये डॉ. के. एस. धिमान (सी सी आर ए एस, नवी दिल्ली ) डॉ श्रीराम सावरीकर नवीदिल्ली, मा. डॉ .जोस रुगे, ब्राझील, डॉ एम एस बघेल व डॉ अनुप ठकार , जामनगर, डॉ रमेश भोंडे , पुणे, डॉ. एन. श्रीकांत, नवीदिल्ल्ली, डॉ. सुप्रिया भालेराव, रणजित पुराणिक (धूतपापेश्वर) हे प्रमुख वक्ते उपस्थित असतील. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विविध विषयांवर शिक्षणतज्ञ् व्यावसायिक डॉक्टर्स, पद्युत्तर पदवी चे विद्यार्थी यांनी आयुर्वेदात केलेल्या संशोधनावर पेपर सादरीकर व भिंतीपत्रक सादरीकरण करणार आहेत. पहिल्या दिवसाच्या सांगतेला परदेशातून आलेल्या सहभागार्थी साठी भारतीय संस्कृती दर्शन पर सांस्कृतिक कायक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही आंतरराष्ट्रीय परिषद डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
व्हिएस न्युज - उंड्री येथे श्री. भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून प्रचारसभा व पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक विविध सोसायटींचे पदाधिकारी व महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याची विश्वासार्हता दाखवली.
मा. संजयजी जगताप यांनी नागरीकांकडून उंड्रीतील समस्या जाणून घेतल्या. पाण्याचा प्रश्न व रस्ते समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असलेचे त्यांनी सांगितले. यावेळी सासवड, जेजुरी नगरपरिषद विकासाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
गावातील व विविध सोसायटीतील महिला भगिनींनी पुरंदर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मा. संजयजी जगताप यांना औक्षण केले. मतदारांनी चौका चौकात फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले.
उंड्री गावात पदयात्रेसाठी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद. पदयात्रेत पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मा. संजयजी जगताप यांचेसह मा. सचिन पुणेकर, उपसभापती सचिन घुले, निवृत्ती बांदल, संदीप बांदल, गौरीताई फुलावरे, दत्तात्रय बांदल, तानाजीराव कड, दत्तोबा होते, योगेश कामठे, विशाल कामठे, अविनाश पुणेकर, प्रतीक कड, मंगलाताई आंबेकर, दीपक कामठे, डॉक्टर बालगुडे, मा. प्रवीण पुणेकर, शरद देशमुख, गीतांजली पुणेकर आदी उपस्थित होते.
व्हिएस न्युज - पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिरूर येथे दिला. शिरूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपला पाठिंबा दिल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे.
आघाडीचे उमेदवार, माजी आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शिरूर येथील कापड बाजारात पाटील आणि अमोल मिटकरी यांची सभा झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, नगराध्यक्षा वैशाली वाखारे आदी त्या वेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, पक्षातून अनेकजण बाहेर पडत असल्याचे मला विचारले जाते. पण, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शरद पवार यांचे सच्चे कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने काम करून राज्यात सत्ता संपादन करणार आहेत.
मिटकरी म्हणाले की, शिरूर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होणार आहे. सत्ताधारी विचारतात शरद पवार यांनी काय केले. कांद्याला बाजारभाव का नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल काय, हा त्यांना आमचा सवाल आहे. राज्याच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री बोलत नाहीत. हे सरकार संवेदनशील नाही.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002