व्हिएस न्युज - पिंपरी गाव येथील नव महाराष्ट्र शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोमवारी (दि. 21) सव्वाबाराच्या सुमारास विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असताना पिंपरीतील मतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून थांबल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी 21 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेशकुमार मुन्नीलाल चौरसिया (वय 28), जितेंद्र कुमार रामकेस चौरसिया (वय 30), अजित सारदा शर्मा (वय 28), दीनानाथ रामकेस निसाद (वय 19), राहूल जितेंद्र यादव (वय 20), रोहीत रामबच्चन यादव (वय 20), सुमन मोहनराम कुमार (वय 19), विनोद सीताराम पाल (वय 21), वीरेंद्र रामविलास पाल (वय 24), यशवंत गुलजारी पासवान (वय 35), कुलदीप चंद्रभोकनसिंग कुमार (वय 19), अखिलेश कुमार सुरजबाबू (वय 24), अनिल कुमार शंकर यादव (वय 23), पवनकुमार लालबाबू गौतम (वय 23), दिलीप गंगाधर भोर (वय 20), अनिल धन्नू जाधव (वय 25, सर्व रा. कस्पटे वस्ती, वाकड). अरबाज जुबेर सय्यद (वय 20), संतोष राम जाधव (वय 22), वैभव श्रीमंत नरवडे (वय 20), गजानन सुभाष जाधव (वय 20), गणेश अनिल अवसरे (वय 20, रा. काळेवाडी फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूक काळात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करून आरोपींनी पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गर्दी केली होती. याठिकाणी मतदान केंद्र होते. पोलिसांनी त्यांना त्याठिकाणावरून जाण्याची विनंती केली होती. तरीही, त्यांनी त्याठिकाणी गर्दी जमवली. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहित कलम 188 आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002