व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने पाणी दरवाढ मोठ्या प्रमाणात करून फक्त सहा हजार लिटर पाणी मोफत देण्याचे शहरवासियांना अमिष दाखविले आहे. परंतू, मोफत पाणी फक्त पाच दिवसात संपणार असून सत्ताधारी भाजपाने त्याआडून मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक अरूण बकाल यांनी केला आहे.
बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चार जणांच्या कुटूंबाला यापुर्वी सरासरी महिन्याला 75 रूपये मासिक बिल येत होते. परंतू, सत्ताधारी भाजपाने पाण्याची मोठ्या प्रमाणात दरवाढ प्रस्तावित केली आहे. दरवाढ केल्यानंतर जनतेमध्ये रोष निर्माण होऊ नये यासाठी सहा हजार लीटर पाणी मोफत देण्याचे आमिष दाखविले आहे. परंतू, हे सहा हजार लीटर पाणी अवघ्या चार ते पाच दिवसात संपणार आहे. त्यामुळे ही योजना फसवी असून पाणी दरवाढ मागे घेण्याची मागणी बकाल यांनी केली आहे. यापुर्वीही तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने पाण्याची मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्याचे नियोजन केले. परंतू, जनतेने पाणी दरवाढ मागे घेण्यास भाग पाडले होते. त्याचप्रमाणे भाजपलाही दरवाढ मागे घेण्यास भाग पाडणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002