व्हीएस न्यूज - जीवनात सकारत्मकतेची ताकद येण्यासाठी अध्यात्मिक योग, ध्यानधारणा गरजेची आहे. चांगले विचार आचरण, संवाद संस्कार यातूनच प्रेम आपुलकी वाढते. चांगले कर्म चांगली दिशा देऊ शकतात. डॉक्टर ताण तणाव, क्रोध, अहंकार, स्वार्थ दूर करूनच रुग्णांच्या वेदना दूर करू शकतात यासाठी मनशक्ती जागरूक ठेवण्याची गरज आहे त्यासाठी स्वतःला वेळ द्यावा, असे मत बी के शिवानी दीदी यांनी व्यक्त केले. डॉ. डी. वाय पाटील मेडिकल महाविद्यालय व संशोधन केंद्रात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयच्या बी के शिवानी दीदी यांनी 'आत्मविश्वास व सकारत्मकता' या विषयी व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्ष भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ पी. एन राजदान तसेच विद्यार्थी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्यानी उपस्थित होते.