व्हीएस न्यूज - येथील भक्ती शक्ती उद्यानात भारताचा सर्वोच्च राष्ट्रध्वज दुरस्तीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
देशातील सर्वोच्च राष्ट्रध्वज 26 जानेवारी रोजी निगडीत उभारण्यात आला आहे. या ध्वजाची देखरेख मनपाच्या सुरक्षा विभागामार्फत करण्यात येते. बुधवारी राष्ट्रध्वजाची देखरेखीच्या दृष्टीने खाली उतरवुन तपासणी केली. त्याचे धागे ओडले गेल्याचे व शिलाई उसवल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ध्वज बदलण्यात येणार आहे, व सध्या वापरात असलेला ध्वज दुरुस्तीसाठी पाठविण्यात येणार आहे. या दरम्यान राष्ट्रध्वज स्तंभातील तारा (वायर रोपची) व इतर यंत्रणेची तपासणी करण्यात येणार असल्याने पुढील 2 दिवसामध्ये ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अशा प्रकारच्या ध्वजांच्या बाबतीत वेळोवेळी करावी लागत असते. देशातील सर्व दिवस-रात्र फडकणाऱ्या ध्वजाबाबतीत अशाप्रकारे कार्यवाही करण्यात येत असते.