व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरवासियांवर सत्ताधारी भाजपने अन्यायाकारक पध्दतीने पाणीपट्टीची दरवाढ केली आहे. ही दरवाढ त्वरीत रद्द करावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापलिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पाणीपट्टीची अन्यायकारक दरवाढ जनतेवर लादू नका. पवना बंदिस्त पाईप लाईनसाठी जागा ताब्यात नसताना करोडो रूपयांचा खर्च करण्यात आला. ते पैसे तत्कालीन अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणीही तायडे यांच्यासह गुलाब पानपाटील, राजेंद्र साळवे, विष्णु सरपदे, विनोद जाधव, गौतम जगभार आदींनी केली आहे.