व्हीएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील एक महान योध्दा व चारित्र्यसंपन्न राजा होते, असे प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक प्रमोद लाड यांनी केले.
भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाव्दारे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारीया, प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रा. डॉ. एच. पी. शिंदे, विद्यापीठ प्रतिनिधी पुजा ठाकर, प्रा. पांडूरंग भास्कर, प्रा. रेणू आग्रवाल, प्रा. डॉ. स्वाती वाघ, प्रा. प्रविण म्हस्के, प्रा. एस. पी. बैसाणे, प्रा. विभा ब्राम्हणकर, प्रा. महालक्ष्मी ठुबे आदी उपस्थित होते.
प्रा. पगारीया म्हणाले की, देशातील निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही या दक्षिणेतील राजसत्तांबरोबरच उत्तरेतील मोगल साम्राज्याशी एकाच वेळी शिवरायांनी टक्कर दिली. त्यामुळेच छत्रपतींच्या कार्यकाळात इंग्रजांची डाळ शिजू शकली नाही. दाढी वाढवून व कपाळावर अर्धचंद्र कोरून शिवाजी होता येणार नाही. त्यासाठी छत्रपतींच्या विचारांचे आचरण करणे आवश्यक असल्याचे प्राचार्य सदाशिव कांबळे म्हणाले.
प्रा. डॉ. हनुमंत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सुधा चौधरी हिने सुत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. स्वाती वाघ यांनी आभार मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002