व्हीएसन्युज - गुरूवार दि.२२ रोजी लालटोपी नगर मधील अनेक समस्या (पाणी,चेंबर्स,शौचालयांचा निधी,राजाराम जोशी चौकात स्पिड ब्रेकर्स फोटोपास,नळ कनेक्शन) साठी संमती या अशा महत्वाच्या समस्येकडे पालीका आयुक्तांचे लक्ष वेधून तत्पर कारवाई व्हावी म्हणून मोर्चा काढण्यात आला होता.पोलीसांनी परवानगी नाकारली होती,परंतु त्यांना महत्वाचे प्रश्ना बाबत माहीती देवून फक्त महिलांचाच मोर्चा असेल आणि जास्त गर्दी न करता शिस्त व शांततेत मोर्चा असेल हे सांगितल्या नंतर परवानगी दिली व मोर्चा यशस्वी पार पडला. मा.आयुक्तांना निवेदन देण्यात आले. पुढील काळांत जर समस्या सुटल्या नाहित,तर रास्ता रोको सारखे तीव्र आंदोलन केले जाइल. मा. आयुक्तांना निवेदन देतांना,मा.नसिमा सैय्यद,शाम जोशी,शंकरराव तायडे,लक्ष्मी जोशी, कविता खराडे,ललीता जोशी,मेहबूब शेख,तिमय्या जेकलेट,प्रविण भोसले उपस्थित होते.