व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेत गाव घेण्यास विरोधासाठी मारुंजी ग्रामस्थांनी गुरुवारी कृती समिती स्थापन केली आहे. गावाच्या भल्यासाठी महापालिकेच्या या निर्णयाविरुद्ध प्रखर लढा देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामपंचायतने यापूर्वीच महापालिकेत गाव घेण्यास विरोध असल्याचे ठराव ग्रामसभेत मंजूर केले आहे. आजच्या ग्रामसभेतही असाच निर्णय घेऊन कृती समिती स्थापन केली आहे. यात अंकुश जगताप यांनी प्रास्ताविक मांडल्यावर समितीत जगताप यांच्यासह बाळासाहेब बुचडे (पाटील), गणपत जगताप, हिरामण बुचडे, आकाश बुचडे यांनी समितीत प्राथमिक सदस्य म्हणून भाग घेतला आहे. यानंतर समिती विस्तारणार आहे.
अंकुश जगताप म्हणाले, "महानगपालिकेत गाव जाऊ नये. यासाठी कृतिशील विरोध दर्शविण्याचं काम होण्यास कृती समिती गरजेची ठरेल. रचनात्मक पद्धतीने विरोध करून ग्रामस्थांचा हा लढा यशस्वी करता येईल."
बाळासाहेब बुचडे म्हणाले, "पालिकेचा पसारा आधीच वाढलाय. त्यावरच त्यांचं नियंत्रण राहिलं नाही. विकास आराखडा रखडलाय. त्याआधी गाव घेण्याची घाई कशाला." हिरामण बुचडे म्हणाले, " प्रशासकीय निर्णयांमुळे मारुंजीला यापूर्वी अनेकदा झळ बसली आहे. आता तरी बिल्डरांच्या हिताचे निर्णय होऊ नये. महानगपालिकेत गाव घेवू नये म्हणून विरोधी कृती समिती स्थापन करण्यास मारुंजीने पुढाकार घेतला आहे. इतर गावांमध्येही अशी कृती समिती स्थापण झाल्यास सर्वांचे संघटन करण्याची तयारी आहे. मारुंजीत ज्या ग्रामस्थांचा विरोध आहे ते दर्शविण्यासाठी घरोघरी सह्यांची मोहोम लवकरच राबविणार आहे. पालिकेचा ठराव नाकारावा यासाठी विरोधाच्या सह्यांची ही प्रत राज्य सरकारला पाठविणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. गाव समवेशाचा हा निर्णय प्रशासनाने रद्द करावा यासाठी मोठा लढा उभा राहील असं चित्र पंचक्रोशीत आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002