टाटा मोटर्सच्या पाच कामगारांचा पंतप्रधान श्रम पुरस्काराने गौरव
पिंपरी चिंचवड
2018-03-05
व्हीएस न्यूज - कंपनीच्या माध्यमातून काम करताना गुणवत्तेमध्ये सुधारणा, सुरक्षितता, पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता, उत्पादक वाढीसाठी प्रयत्न करणे आदी गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारच्या वतीने दिला जाणारा पंतप्रधान श्रम पुरस्काराने टाटा मोटर्समधील पाच कामगारांचा नुकताच दिल्ली येथे गौरव करण्यात आला.
दिल्लीतील विज्ञान भवन येथे 26 जानेवारी रोजी भारताचे उपराष्ट्रपती वैकंय्या नायडु यांच्या हस्ते टाटा मोटर्समधील कर्मचारी राजेंद्र राजाराम निंबाळकर, राकेश भास्कर देशमुख, डॉ. वसंत गंगाधर भांदुर्गे, कैलास विठ्ठल माळी, मनोजकुमार विठ्ठल आणेकर यांना पंतप्रधान श्रम पुरस्कार व मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय श्रम रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार उपस्थित होते.