व्हीएस न्यूज - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याची धुरा सांभाळल्यापासून पोलीस दलाची कार्यशैलीही बदलली आहे. योगी सरकारच्या पहिल्या १० महिन्यांच्या कार्यकाळात पोलिसांच्या भीतीने ५५०० आरोपींनी आपला जामीन रद्द केला आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक ओमप्रकाश सिंह यांनी दिली.
ते म्हणाले, मार्च २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी १३३१ एन्काऊंटर केले आहेत. ३०९१ वाँटेड गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. काही गुन्हेगार अनेक वर्षांपासून फरार होते. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने मागील १० महिन्यात ५४०९ गुन्हेगारांनी न्यायालयामार्फत आपला जामीन रद्द केला आहे. यावेळी होळीदरम्यान दोन गटातील वादाचे १४ प्रकरणे समोर आले. यामध्ये काही सांप्रदायिक वादांचाही समावेश आहे. हे वर्ष २०१३ पासून प्रत्येकवर्षी सरासरी ६० प्रकरणांहून कमी आहे. संपूर्ण तयारी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे यावेळी होळीचा सण शांततेत साजरा करण्यात आल्याचे सिंह यांनी म्हटले. पोलीस अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर मुस्लीम नेत्यांनी नमाजाची वेळ बदलली होती. त्यामुळेही कायदा व सुव्यवस्थेवर ताण आला नाही. सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून सर्व सण आणि सार्वजनिक कार्यक्रम पार पाडणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002