व्हीएस न्यूज – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ईशान्येकडील विजयानंतर नागपुरातील संघ मुख्यालयात पक्षाची मातृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. तब्बल साडेतीन तास भागवत-शहा यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान त्रिपुरा, नागालँडच्या निवडणुकीसोबतच आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.
शहा यांची सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह भैय्याजी जोशी, सहसरकार्यवाह सुरेश सोनी, दत्तात्रय होसबळे आदी नेत्यांसोबत चर्चा झाली. नागपुरात ९ मार्चपासून अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आयोजित करण्यात आली आहे. संघ आणि संघाशी संबंधित विविध संघटनांची यात महत्त्वपूर्ण बैठक मानली जाते. संघाची राजकीय शाखा म्हणून भाजपचे प्रतिनिधीही यात सहभागी होतात.
वर्षभर झालेल्या कामाचा आणि पुढील वर्षी करावयाच्या कामांचे नियोजन या बैठकीत केले जाते. अमित शहा यांनी त्यानुसार सरसंघचालकांकडे भाजपचे रिपोर्ट कार्ड सादर केले तसेच पुढील तीन वर्षांच्या नियोजनावरही चर्चा केली. यावेळी संघातर्फे अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वाद निर्माण होत आहे त्या नेत्यांवर अंकुश ठेवावा, अशी भूमिका मांडण्यात आली तर, भारतीय मजदूर संघातर्फे सरकारविरोधात वक्तव्य केली जात आहे विहिपनेही एल्गार केला आहे संघाने त्यांची समजूत काढावी, अशी भाजपची मागणी आहे. ईशान्येकडील राज्यात घवघवीत यश संपादन केल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002