व्हिएस न्यूज – दिल्ली उच्च न्यायालयाने अनैतिक संबंधांचे पतीवर खोटे आरोप करणे हे त्याच्यासाठी मानसिक त्रास आणि वेदनादायक असून वारंवार आत्महत्येची धमकी देणाऱ्या पत्नीसोबत राहणे धोकादायकच असल्याचे मत नोंदवले आहे.
जुलै २००८ मध्ये दिल्लीत राहणाऱ्या तरुणाचे लग्न झाले होते. त्या दाम्पत्याला मार्च २०१० मध्ये मुलगा देखील झाला. पण पत्नीने यानंतर माझा व माझ्या कुटुंबीयांचा छळ केला व वारंवार आम्हाला आत्महत्येची धमकी दिल्याचा आरोप करत त्या तरुणाने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. त्याला कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटासाठी परवानगी दिली होती. त्याच्या पत्नीने याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच या याचिकेवर निकाल दिला.
पतीसाठी अनैतिक संबंधांचे खोटे आरोप करणे हे मानसिक त्रास आणि वेदनेचे कारण ठरतात असे नमूद करत उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. हा निर्णय न्या. सिद्धार्थ मृदूल व न्या. दीपा शर्मा यांच्या खंडपीठाने दिला. अशा स्वरुपाचे आरोप गंभीर असल्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. तसेच व्यक्तीवर हा एक मानसिक आघातच असतो. आत्महत्येची धमकी देणाऱ्या पत्नीसोबत राहणे धोकादायक असल्याची भावना मनात येते,असेही उच्च न्यायालयाने आदेश देताना सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002