व्हिएस न्यूज - भारतात अल्पवयीन मुलींचे विवाह करण्याचे प्रमाण एका दशकामध्ये आल्याने खाली आले आहे त्यामुळे जगातही बालविवाहांची संख्या घटली आहे, असे बालकांसाठी काम करणारी राष्ट्रसंघाची संस्था युनिसेफने म्हटले आहे.
गेल्या दशकभरात जगभरात दोन कोटी 50 लाख बाल विवाह रोखण्यात आले. त्यातील सर्वाधिक विवाह दक्षिण आशिया भागात रोखण्यात आले आणि त्यातही भारतात ही संख्या सर्वांत जास्त होती, असे युनिसेफने म्हटले आहे. “जगातील किशोरवयीन मुलांपैकी 20 टक्के मुले भारतात राहतात आणि सर्वाधिक बालविवाह होतात. भारताचा आकार आणि लोकसंख्या विचारात घेता ते साहजिक आहे, असे युनिसेफचे बाल संरक्षण विभाग प्रमुख जेवियर अॅग्विलर म्हणाले. सध्याच्या स्थितीत भारतात 27 टक्के किंवा एक हजार मुलींचा वयाची अठरा वर्षे पूर्ण करण्याआधीच विवाह करण्यात येतो. एका दशकापूर्वीच्या संख्येपेक्षा ही संख्या 47 टक्क्यांनी कमी आहे. जगभरात एकूण बालविवाहांचे प्रमाण 15 टक्क्यांनी कमी झाले आहे, असे जेवियर यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले. मुलींमध्ये वाढलेले शिक्षणाचे प्रमाण तसेच समाजात झालेली जनजागृती यामुळे ही घट झाली असल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे.