व्हिएस न्यूज- शहरातील 2015 अखेरच्या अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला, त्याच धर्तीवर 2015 अखेरील झोपडपट्यांना संरक्षण द्यावे, झोपडपट्यांचे सर्वेक्षण करावे, झोपडी धारकांना स्मार्टकार्ड, फोटो पास द्यावे, 6500 नागरिकांना घरकुलच्या दुसऱ्या टप्पा लवकरात-लवकर सुरू करावा, अनधिकृत बांधकामे नियमीत करण्यासाठी जाचक अटी रद्द कराव्यात, बांधकाम कामगारांचे सर्वेक्षण करून ओळखपत्र द्यावे आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 15 मार्च रोजी महापालिकेवर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शहराध्यक्ष बबन साके यांनी दिली.