व्हीएस न्यूज – सफाई कामगारांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत दहावी पास अशी शिक्षणाची अट असलेल्या उमेदवारांना विचारलेले अत्यंत कठीण प्रश्न उच्च शिक्षितांनाही सोडवता येणार नाहीत असे होते. भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. यासंबंधी गिरकरांनी विधानपरिषदेत प्रश्न विचारला होता. अनेकांच्या भुवया मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार भरती परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांमुळे उंचावल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापतींनी विधानपरिषदेत निर्देश दिले आहेत.
१३८८ सफाई कामगारांच्या जागांसाठी मुंबई महापालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी सफाई कामगार पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी आपली अक्कल गहाण ठेवली होती की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
सफाई कामगार भरती या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेत १) भारताचे ४४ वे सरन्यायाधीश कोण? २) ८८ नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते? ३) फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुसऱ्या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील परागकणांच्या होणाऱ्या परागसिंचनास काय म्हणतात? ४) गायनेशियम म्हणजे काय? ५) लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या विनेगर मध्ये काय असते? ६) सिरिकल्चर कशाशी संबंधित आहे ? ७) निशा आणि मिशा यांनी अनुक्रमे २००० आणि २७५० गुंतवणूक करुन एक व्यवसाय चालू केला. तथापि, मिशा हिला काही महिन्यानंतर आपला पैसा काढावा लागला. त्यांच्या परिणामी १२ महिन्यांच्या शेवटचा नफा निशा आणि मिशा यांमध्ये १२:११ या गुणोत्तरांने वाटला गेला. निशा हिने आपला पैसा गुंतवून ठेवलेल्या महिन्यांची संख्या किती. ८) ७२ कि.मी. ताशी या गतीने प्रवास करणारी एक आगगाडी ६ सेकंदात १ पोल ओलांडते. ही आगगाडी ४८० मीटर फलाट पार करायला किती वेळ लावेल? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002