व्हीएस न्यूज - भाजपच्या उमेदवार आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्यसभा निवडणुकीतून आपला अर्ज मागे घेतला असल्यामुळे राज्यसभेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. आता ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा मार्ग आता मोकळा झाला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राज्यसभा निवडणुकीनिमित्त होणाऱ्या आकड्यांच्या खेळात कोंडी करण्यासाठी भाजपने नवी खेळी खेळली होती. पण ऐनवेळी राज्यसभेसाठी भाजपने चौथा उमेदवार म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना संधी दिली होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची डोकेदुखी विजया रहाटकर आखाड्यात उतरल्यामुळे वाढली होती. राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला ४८ मते मिळवणे आवश्यक आहे. पण पक्षाच्या संख्याबळानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे अपुरी मते होती. त्यामुळे विजया रहाटकर यांच्या उमेदवारीचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला असता.
अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आज होती आणि विजया रहाटकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. रहाटकरांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जीव भांड्यात पडला आहे. आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. एकाप्रकारे कुमार केतकर यांच्या राज्यसभेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
भाजपाकडून प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, नारायण राणे तर शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. तर काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि राष्ट्रवादीकडून वंदना देसाई यांनी अर्ज भरला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002