व्हीएस न्यूज - द्वारकापीठ शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी अयोध्येत कधी मशीद अस्तित्वातच नव्हती. १९९२ मध्ये उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून मंदीर पाडण्यात आले असा दावा केला आहे. त्यांनी हा दावा अयोध्येच्या वादावरुन माध्यमांशी बोलताना केला आहे.
न्यायालयाने सध्याच्या जमिनीवरची स्थगिती उठवल्यानंतर त्याजागी भव्य राम मंदीर उभारण्यात येईल, असे ते म्हणाले. सध्या सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमीची सुनावणी सुरु आहे. तसेच भ्रष्टाचार हा देशातला सर्वांत मोठा प्रश्न असल्याचे शंकराचार्यांनी म्हटले आहे. मोठ्या प्रमाणावर गावातल्या पंचायत निवडणुकांसाठीसुद्धा खर्च केला जातो. एफआयआर दाखल करुन घेण्यासाठीसुद्धा पोलिसांना लाच दिली जात असल्याचे ते म्हणाले. मी नरेंद्र मोदी किंवा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात जेव्हा बोलतो तेव्हा लोक मला काँग्रेसचे समर्थक म्हणतात. मी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी काँग्रेस ब्रिटीशांविरोधात लढा देत होते. मी आज एक धर्मगुरु आहे. शंकराचार्य आहे. सनातन धर्माचे रक्षण करणे हे माझे काम असल्याचे शंकराचार्यांनी म्हटले आहे.