भारत, अमेरिका आणि इस्रायलने इसिसच्या खात्म्यासाठी एकत्र यायला हवे – स्वामी
नवी दिल्ली
2018-03-21
व्हीएस न्यूज –भारताने अमेरिका आणि इस्त्रायलसोबत आपल्या दहशतीने जगभरात थैमान घातलेल्या ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटेशी मुकाबला करण्यासाठी एकत्र यावे. याचा चांगला उपयोग होईल, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी व्यक्त केले आहे.
जगाला इसिसने आव्हान दिले असून इसिसचे जगात ज्या ठिकाणी अस्तित्व असेल त्यांचे ते मनसुबे उधळून लावण्यासाठी अमेरिका आणि इस्त्रायलसोबत भारताने एकत्र यायला हवे. संख्याबळ आपल्याकडे आहे, अमेरिका आधुनिक शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण असून इस्त्रायलकडे सक्षम गुप्तचर यंत्रणा आहे. या तीनही गोष्टी एकत्र आल्यास एक ताकदवान दल तयार होईल. इसिसचा त्यामुळे ज्या कुठल्या देशात तळ असेल तेथे आपले सैन्य पाठवण्यात संकोच करता कामा नये, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.