व्हीएस न्यूज - संपूर्ण देशात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लाट असताना त्यांना हरवण्यासाठी १९७७मध्ये कोणताच चेहरा नव्हता. त्यांना लोकांनीच पराभूत केले असल्यामुळे कोणत्याही चेहऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हरवण्यासाठी गरज नसल्याचे म्हणत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण शौरी यांनी असा पक्षाला घरचा आहेर दिला.
पण विरोधकांनी एकत्र येऊन त्याचवेळी तिसरी आघाडी तयार करण्याची ही योग्य वेळ नसल्याचेही त्यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या विरोधात महाआघाडी तयार करताना कोणत्याही चेहऱ्याची गरज नाही. इंदिरा गांधी यांच्या विरोधातही कोणताही चेहरा त्या काळात नव्हता. शौरी यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना गलिवर आणि लिलीपुट यांचे उदाहरणही दिले.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत राजकारण मोठे असते, असेही त्यांनी सांगितले. १५ वर्षांनी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्याने उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्याबद्दल विचारले असताना शौरी म्हणाले, विरोधी पक्षांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. पंतप्रधान मोदीच विरोधकांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत. कारण प्रत्येक पक्षाला नष्ट करण्याची भाषा त्यांनी केली असल्यामुळे एकत्र न आल्यास सगळे विरोधी पक्ष संपून जातील. भाजपच्या सहकारी पक्षांनाही स्वतःचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका जाणवतो आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002