व्हीएस न्यूज – भाजप आगामी लोकसभा निवडणुका होण्याआधी बाबासाहेब आंबेडकर हे रामभक्त होते असेही जाहीर करू शकते, असे म्हणत उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारने बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात रामजी हे त्यांच्या वडिलांचे नाव समाविष्ट केले. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर अशी सही करत त्याचाच दाखला देत भीमराव रामजी आंबेडकर असे नाव उत्तर प्रदेशात यापुढे लिहिले जाईल असे एक विधेयक पास करण्यात आले. पण प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी याच निर्णयावर सरकारवर टीका केली.
भाजप सरकारने दलितांची मते मिळवण्यासाठी केलेली ही खेळी आहे अशी टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली. आत्ताच बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव लिहिण्याचा आदेश का दिला? राम मंदिर प्रश्नावर अपयश आल्यानेच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. तर बाबासाहेब आंबेडकर हे मराठीत सही करतानाच भीमराव रामची आंबेडकर अशी सही करत एरवी ते बी आर आंबेडकर अशीच सही करत असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याला उत्तर प्रदेश सरकारचा हा निर्णय पटला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वतःची विचारधारा भाजपला पसरवायची असल्यामुळे हे असे राजकारण केले जात आहे असा आरोप कांचा इलैय्या यांनी केला.
दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर बसपानेही नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर भारतातील अनेक दलित आपल्या नावात राम हा शब्द वापरतात. पण प्रभू रामचंद्रांशी त्याचा काही संबंध आहे की नाही यावरून वाद आहे. पण उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील दलितांची निराशा केली असल्याचेही बसपाने म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002