व्हीएस न्यूज –अचानक आलेला जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे येथील व्होंटिमिट्टा गावात चार जणांचा मृत्यू झाला तर जवळपास ३० जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यात थोडक्यात बचावले आहेत.
व्होंटिमिट्टा येथे प्रसिद्ध कोदंदरामा मंदीर असून रामनवमी उत्सवानिमित्त या मंदिरात ‘श्रीराम कल्यानम’ (भगवान राम यांचा लग्न समारंभ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्राबाबू नायडू आणि असंख्य भक्त यासाठी उपस्थित होते. पण याठिकाणी अचानक जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने कार्यक्रमात बाधा आली. कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेला मंडप सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे आणि गारपिटीमुळे कोसळला. या दुर्घटनेत काही भक्त जखमी झाले तर चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. तथापी, मुख्यमंत्री नायडू हे दुर्घटना घडली तेव्हा मंदीर परिसरात नव्हते, असे कडपा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.