व्हिएस न्यूज – यवतमाळच्या एका शेतकऱ्याने ३ लाखांचे कर्ज डोंगर वाटल्याने आणि नापिकी त्यातून येणारी निराशा या सगळ्याला कंटाळून आत्महत्या केली. या शेतकऱ्याने आपल्या सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव लिहिले आहे. या शेतकऱ्याचे नाव शंकर भाऊराव चायरे असे असून ते घाटंजी तालुक्यातील राजूरवाडीचे रहिवासी होते. शेतकऱ्याने सहा पानी सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव लिहून आपले आयुष्य संपवले आहे. शंकर चायरे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून ते वाचले. त्यानंतर विष प्राशन करून त्यांनी आपले आयुष्य संपवले यातच त्यांचा मृत्यू झाला. शंकर भाऊराव चायरे यांची सहा एकर शेती होती. यावर्षी त्यांनी कापूस आणि तूर याची लागवड केली होती. पण त्यांचे सगळे पिक बोंड अळीने उद्धवस्त केले. त्याआधी २०१६-१७ या वर्षातही त्यांच्यावर ८० हजारांचे कर्ज होते. या सगळ्यातून आलेल्या निराशेतून आणि हतबलतेतून शंकर चायरे यांनी त्यांचे आयुष्य संपवले. शंकर चायरे यांनी लिहिलेल्या पत्रात, मी आत्महत्या कर्जबाजारी झालो असल्यामुळे करत आहे, नरेंद्र मोदी सरकार या आत्महत्येला जबाबदार आहे. माझ्या मुलांकडे आणि घरातल्यांकडे लक्ष ठेवा, असे चायरे यांनी म्हटले आहे. चायरे यांच्यामागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असे कुटुंब आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002