व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाणार प्रकल्पाला जर असाच विरोध होत राहिला तर अखेर नाणारचा प्रकल्प गुजरातला जाईल असा सुचक इशारा दिला आहे. नाणारच्या प्रकल्पाला कोकणातील राजकीय नेते विरोध करत आहेत. सिंधुदुर्गमधील नाणार येथे तेल काढण्याचा मोठा प्रकल्प आणण्याचा सरकारचा मनसुबा आहे. सरकारमधील मित्रपक्ष शिवसेना आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे या प्रकल्पाला विरोध करत आहेत. १ लाख रोजगारांची या प्रकल्पामुळे निर्मिती होणार आहे. पण त्यामुळेच कोकणाच्या निसर्गाचे, मासेमारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्र्यांनी हा सूचक इशारा याविरोधाच्या पार्श्वभूमीवरच दिला आहे. भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या हद्दीतच ऑईल रिफायनरीचा प्रकल्प अराम्को कंपनी टाकू इच्छिते. राज्य सरकारने म्हणूनच त्यांना नाणारचा प्रस्तावही दिला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पण या प्रकल्पाला असाच विरोध वाढत कायम राहिला तर ३ लाख कोटींचा हा प्रकल्प कदाचित गुजरातलाही जाऊ शकतो, तसेही गुजरात सरकारने यापूर्वीच संबंधीत कंपनीला आमंत्रित केले आहे. असा थेट संदेशच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. देशातील विविध राज्यातील प्रकल्प याआधीही गुजरातने असेच ओढले आहे. कोकणाचा औद्योगिक विकास या प्रकल्पामुळे शक्य असल्याचे सरकारचे मत असल्यामुळे कोकणाच्या निसर्गाची हानी होईल अशी विरोधकांची भूमिका आहे. नाणार प्रकल्पातील बऱ्याच जमिनी नापीक आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002