व्हीएसन्यूज - अखेर भाजपला माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी सोडचिट्ठी दिली असून सिन्हा यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधात आघाडी उघडली होती. सिन्हा यांनी यावेळी सर्व प्रकारच्या पक्षीय राजकारणापासून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. ‘राष्ट्र मंच’ची बैठक पाटण्यात आयोजित करण्यात आली होती. भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, तेजस्वी यादव, शरद यादव यांच्यासह जेडीयूमधील अल्पसंतुष्ट नेते या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत भाजपविरोधी रणनीती आखण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर व्यापक आघाडी उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.