व्हीएस न्यूज - आसाममधील एका भाजप आमदाराला आणि त्याच्या कुटुंबाला न्यायालयात भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करा, अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. संशयित नागरिक असल्याच्या कारणावरुन नोटीस पाठवल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बरखोला मतदारसंघाचे आमदार किशोर नाथ, त्यांची पत्नी आणि चार भाऊ यांच्यासह एका नातेवाईकाला नोटीस पाठवली आहे.
न्यायालयाने पाठवलेल्या नोटीसीनुसार, किशोर नाथ आणि त्यांचे कुटुंबातील सदस्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच न्यायालयात भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करा असेही म्हटले आहे. यावर आमदार किशोर नाथ यांनी आपण भारतीय असून नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती आमदार नाथ यांनी आसामच्या विधानसभा अध्यक्षांना दिली आहे.
माझ्या कुटुंबातीत सर्व भारतीय नागरिक आहेत हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे न्यायालयात सादर करु असे आमदार नाथ यांनी म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या सांगण्यावरुन त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोपही नाथ यांनी केला आहे.
नागरिकत्व संशोधन अधिनियम २०१६ नुसार आसाममधील संशयित नागरिकांची चौकशी केली जाते. या अधिनियमाला आसामच्या नागरिकांचा विरोध आहे. १९७१ ला बांगलादेशातून भारतात आलेल्या नागरिकांना परत पाठवण्याचा नियम यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे हा नियम आसामच्या सामंजस्य कराराच्या विरोधात असल्याची भावना लोकांमध्ये आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002