व्हीएस न्यूज - आधुनिक विचाराचे जनक, भारताचे महान समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांच्या २४६ व्या जयंतीनिमित्त गुगलकडून डूडल बनवून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय प्रबोधनाचे जनक राजा राम मोहन रॉय यांनी १९ व्या शतकामध्ये सामाजिक चळवळींना सुरूवात केली. त्यामध्ये त्यांनी सतिप्रथा, बालविवाह अशा जाचक प्रथेतून त्यांनी भारतीय महिलांना त्यांनी मुक्त केले.
सतिप्रथा बंद व्हावी यासाठी त्यांनी मोठी चळवळ उभा केली. या समाज कार्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झली. स्त्रियांवर अन्याय करणारी सतिप्रथा असल्याने त्यांनी सतिप्रथेविरूध्द कायदा करण्यात यावा यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर ४ डिसेंबर १८२९ रोजी त्यांनी सतिप्रथा बंद करण्याचा कायदा केला. ही प्रथा बंद ठेवण्याचे धोरण कायम ठेवावे यासाठी ते ब्रिटीश सरकारला अर्ज करण्यासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. या प्रथेविरूध्द राजा राम मोहन रॉय यांनी आवाज उठवल्यानंतर दिल्लीच्या बादशहाने त्यांना राजा किताब बहाल केला.
राजा राम मोहन रॉय यांचा जन्म बंगालमधील हुगळी येथे ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला होता. राजा ही पदवी त्यांना मुगल सम्राट अकबर यांनी बहाल केली होती. भारतातून इंग्लडला जाणारे ते पहिले भारतीय होते. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लडला गेले होते. त्यांनी १८३० साली ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कैमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात उल अखबार हे पर्शियन व्रतपत्र त्यांनी सुरु केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002