व्हीएस न्यूज- खरोखर आपण ज्येष्ठ आहोत का ? जुनाट बुरसटलेले ज्येष्ठ आहोत हे या पिढीने तपासून पाहावं. जर मुलंबाळ आपल्या अन्न, वस्त्र, निवारा तसेच आजारपणाची काळजी घेत असतील तर संवादसारख्या आपल्या मानसिक गरजांची जबाबदारी त्यांच्यावर टाकणं कितपत योग्य आहे? निवृत्तीनंतर आपलं मनोरंजन करण्यासाठी वाचन, लिखान, टिव्ही, स्मार्ट फोन, फिरायला जाणं, संगीत आदी माध्यमांतून निवड करून पुढील पिढीवर संवादाच्या गरजेचा भार टाकता कामा नये, असे मत काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे.
नव्या पिढीला दोष न देता वृध्दांनी आपल्या स्वतःमध्येच बदल घडवून आणणे काळाची गरज आहे. नवीन पिढीचा व घरातील आनंदाचे वातावरण कसे राहील, यासाठी ज्येष्ठांनी प्रयत्न करावेत, असेही बकाल म्हणाल.