व्हीएस न्यूज - राहत्या घरात वायरने गळफास घेऊन एका दांम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या हत्या केली. ही घटना गुरूवारी दुपारी सव्वा तीन वाजता चऱ्होली येथे उघडकीस आली. विशेष म्हणजे हे दांम्पत्य पंधरा दिवसापुर्वीच चऱ्होली येथे राहण्यास आले होते.
उत्तम तुकाराम सुर्यवंशी (वय-37) व मुक्त सुर्यवंशी (वय-31, रा. भोसले वस्ती, चऱ्होली, मुळ. परभणी) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. सुर्यवंशी दांम्पत्याला 1 सात वर्षांची मुलगी व 6 वर्षांचा एक मुलगा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्यवंशी दांम्पत्य मुळचे परभणीचे असून 15 दिवसापुर्वीच चऱ्होली येथे राहण्यास आले होते. उत्तम सुर्यवंशी हे इलेक्ट्रेशियनची काम करत होते. गुरूवारी घरात कोणी नसताना सुर्यवंशी दांम्पत्याने वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना शेजाऱ्यांनी त्वरीत पालिकेच्या वायसीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002