व्हीएस न्यूज -यंदा राज्यातून १५लाख ५ हजार २७ विध्यार्थी परीक्षेला बसणार असून त्यात ८ लाख ४३ हजार ५५२ इतके विध्यार्थी व ६ लाख ६१ हजार ३२५
विदयार्थिनी यांचा समावेश असणार आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून (१८फेब्रुवारी)सुरुवात होत आहे. यंदा १८फेब्रुवारी ते १८मार्च २०२० या कालावधीत परीक्षा होणार असल्याची माहिती अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.यंदा बारावीला १ फेब्रुवारी प्रॅक्टिकल परीक्षा सुरु झाली. ती आज म्हणजे १७फेब्रुवारीला संपणार आहे. यंदा राज्यातून एकूण १५ लाख ५ हजार २७ विध्यार्थी परीक्षेला बसणार असून त्यात ८ लाख ४३ हजार ५५२ इतके विद्यार्थी व ६ लाख ६१ हजार ३२५विद्यर्थिनी यांचा समावेश असणार आहे. राज्यभरात मिळून ९ हजार ९२३ केंद्रावर या परीक्षा पार पाडणार आहे.
यंदा ऑनलाईन हॉल तिकिट उपलब्ध करून दिल्याचेही मंडळाने स्पष्ट केले. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्यभरात मिळून २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक विभागीय मंडळात हेल्पलाइन तयार करण्यात आल्या असून विध्यार्थ्यांना पालकांना येणाऱ्या अडचणीवर त्यावर २४ तास मार्गदर्शन करण्यात येईल. याही वर्षी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मोबाइल आणण्यास बंदी आहेच तसेच शिक्षकांचे ही मोबाइल, केंद्रावर एका ठिकाणी ठेवले जाणार आहेत . यामुळे पेपर फुटी प्रकरणावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होऊ नये म्हणून प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त असेल.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002