Breaking News

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळा २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळा | कंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी | संघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल | पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरी | राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल! | 'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश | आषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवास | औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी | मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा |

शिवाजी महाराजांचे नौदल धोरण आजही देशाला दिशादर्शक : एयर मार्शल अजित भोसले

http://www.vsnews.co.in/upload/2021-06-07/159086341delhi-709x375.jpg

नवी दिल्ली 2021-06-07

व्हीएस न्युज - छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदल धोरण आजही देशाला दिशादर्शक असल्याचे, प्रतिपादन एयर मार्शल अजित भोसले यांनी केले. मध्ययुगीन काळातील घडामोंडीचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांना कळून चुकले होते की, ज्यांचे समुद्रात अधिपत्य स्थापित राहील तेच जमीनवरदेखील राज्य करू शकतात. त्यामुळे महाराजांनी तत्त्कालीन परिस्थितीमध्ये नौदलाकडे विशेष लक्ष देऊन सामुद्रिक धोरण सशक्त केले. त्याचा खूप मोठा सकारात्मक प्रभाव त्याकाळात पाहायला मिळाला. तसेच स्वतंत्र भारताचा नौदलाचा पाया हा शिवाजी महाराजांमुळेच अधिक सशक्तपणे रचला गेला असल्याचे एयर मार्शल भोसले यांनी यावेळी सांगितले.

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने ६ जून रोजी आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत एयर मार्शल अजित भोसले यांनी ‘शिवाजी महाराजांचे नौदल धोरण’ या विषयावर 44 वे पुष्प गुंफताना बोलत होते.

महाराष्ट्र शासन शिव राज्याभिषेक दिन हा दिवस ‘शिव स्वराज्य दिन’ म्हणून साजरा करीत आहे, या दिनाचे औचित्य साधून हे व्याख्यान आयोजित केलेले आहे.‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता…… राजते’ या शिवमुद्रेचे वाचन करून व्याख्यानाची सुरूवात एयर मार्शल भोसले यांनी केली. 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला होता. या घटनेला यावर्षी 347 वर्ष पूर्ण झाली आहेत. नौदलाच्या पंरपरा जुन्या असल्याचा उल्लेख करत एयर मार्शल भोसले म्हणाले, मौर्य, गुप्त, चालुक्य, चोल, पल्लव काळात सशक्त नौदल होते. या राज्यकर्त्यांनी समुद्रमार्गे सांस्कृतिक आणि राजकीय मोहिमा राबविल्या. याचे पुरावे जावा, सुमात्रा, ब्रम्हदेश, इंडोनशिया, मलाया, थांडलँड आदी देशात दिसतात. प्राचीन काळातील भक्कम असलेली नौदल पंरपरा मध्ययुगीन काळात रसातळाला पोहोचली होती. त्याला अनेक कारणे होती. याचा फायदा युरोपीयन वसाहतवादांनी घेतला.

वास्को- द-गामा यांच्या समुद्रमार्ग शोधानंतर इंग्रज, पोर्तुगीज, अन्यांनी ईस्ट इंडिया कंपन्या भारतात शक्तीच्या जोरावर स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. मध्ययुगीन काळातील सुजाण राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतूनच नौदल उभे राहिले. असे सांगून एयर मार्शल भोसले म्हणाले, मराठा साम्राज्याला त्यामुळे वेगळी बळकटी मिळाली. 17 व्या शतकाच्या मध्यापर्यंत नौदलाविषयक मराठ्यांची ताकत कमी होती. पश्चिम घाट, कोकण किनारपट्टीवर सिद्दीची पकड होती. त्यांच्याकडे मजबूत बोटी होत्या. यासह इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांचेही सामारिक पकड मजबुत होती, असे एयर मार्शल भोसले यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांना जाणीव होती की, जोपर्यंत समुद्रावर नियंत्रण होत नाही तोपर्यंत स्वराज्याचे स्वप्न साकार होऊ शकत नाही. यासाठी त्यांनी 4 सामुद्रीक उद्देश ठेवले. यातील पहिला उद्देश कोकण किनारपट्टीची सिद्द व युरोपीयन लोकांपासून सुरक्षा, स्वराज्य स्थापनेत उपद्रव निर्माण करणा-या परकियांना थांबविणे, कोकण किनारपट्टीवरून होणाऱ्‍या व्यापार मार्गावरील आवक-जावकावर नियंत्रण करणे, मित्र राज्यांची समुद्रमार्गे होणारी लूट थांबविणे. हे चार उद्देश ठरवून नौदलाकडे लक्ष वळविले. याचा सकारात्मक परिणाम झाला. श्री.भोसले यांनी यावेळी त्या काळात मल्हाराराव चिटणीस यांनी शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या चरित्रामध्ये शिवाजीच्या महाराजांच्या नौदलाविषयक माहिती देतांना स्थानिक लोकांनी शिवाजी महाराजाच्या या नौदल धोरणाला स्वत:हून पाठींबा देऊन ते नौदलात सामील झाले. असल्याचे लिहिलेले आहे, असे सांगितले. यासह यामध्ये शिवाजी महाराजांनी जहाज बांधणीचे उचललेले पाऊल आणि समुद्र किनाऱ्‍यावरील किल्ल्यांचा उल्लेख केला आहे.

1659-65 या दरम्यान शिवाजी महाराजांनी एकूण 85 जहाजे निर्माण केली. यामध्ये तीन मोठे जहाज होते. हे आरमार वाढत गेले. पुढे या आरमारीचे दोन प्रमुख सुभे (केंद्र) झालेत आणि त्यांचे प्रमुख सुभेदार म्हणुन ओळखले जाऊ लागले, अशी माहितीही एयर मार्शल अजित भोसले यांनी दिली. पुढे भोसले म्हणाले, यासह खाडी भागातील परिसरात शिवाजी महाराजांनी तटबंदी करायला सुरूवात केली. पुढच्या काळात समुद्रावरील वर्चस्वासाठी अनेक छोट्या-मोठ्या लढाया महाराजांच्या नौदलाने लढल्या असल्याचे माहिती एयर मार्शल भोसले यांनी दिली. भारतीय इतिहासात चोल साम्राज्यानंतर शिवाजी महाराजांनीच राजकीय हेतूने आरमार उभे केले. जेणेकरून स्वराज्याची स्थापना तसेच समुद्रावर अधिपत्य होऊ शकेल. स्वराज्य निर्मितीत शिवाजी महाराजांची महत्त्वाकांक्षा ही एक सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्ती बनविण्यासाठी होती. आरामारा हे त्यासाठी अत्यावश्यक असुन त्याची जाण बाळगूण माणसे संघटीत केली. तंत्रज्ञान आत्मसात केले. तसेच शत्रुला सडेतोड झुंज दिली. एका नवीन सामुद्रीक लष्करी पंरपरेला जन्म दिला. याच पायावर एक शक्तीशाली आरमार सरखेल कान्होजी आंग्रेच्या नेतृत्वात उभे राहिले होते.

पुढे अनेक वर्ष या आरमाराने सिद्दीवर आणि इतर परकीयांवर कायम अंकुश ठेवला होता. पुढील काळातही सामुद्रिक लढाया होत राहील्या, अशी माहिती श्री भोसले यांनी दिली. शिवाजी महाराजांचे कारभारी असलेले रामचंद्र अमात्य यांनी आरमाराविषयी लिहून ठेवलेले शब्द आजही महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून, त्‍यांनी असे लिहिले होते ‘आरमार हे नितांत आवश्यक विभाग आहे. ज्याकडे सशक्त नौदल आरमार असते, त्यांच्याकडे समुद्र असतो. आणि ज्याचा समुद्र आहे त्याचे जमिनीवर अधिपत्य असते.’

भारतीय नौदल हे शिवाजी महाराजांनी रचलेल्या आरमारीच्या पायावर उभे असल्याचे एयर मार्शल अजित भोसले यांनी सांगितले. यावेळी भोसले यांनी रणजीत देसाई लिखित ‘श्रीमान योगी’ मधील शिवाजी महाराजांचे चरित्र कसे होते याचे वाचन केले. सोबत संत रामदास यांनी शिवाजी महाराजाबद्दल केलेले गौरवास्पद काढलेले वाक्यही उदबोधीत केले.

271
Download Android Application

Recommended

.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!