Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
कोपर्डी बलात्कार व हत्याप्रकरणातील तिघाही नराधमांना फाशीची शिक्षा

व्हीएस न्यूज - संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना नगरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२३) या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीशांनी अवघ्या काही मिनिटांतच शिक्षेची सुनावणी केली. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच पीडित मुलीच्या आई-वडिलांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. शिक्षेची अंमलबजावणी त्वरीत व्हावी अशी इच्छा पीडितेच्या आईने केली. निकालाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील उपस्थित नव्हते.

न्यायाधीशांनी शिक्षा सुनावल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. निकम म्हणाले की, मुख्य आरोपीसह बलात्काराचा कट रचणाऱ्या दोघांना न्यायालयाने मृत्यूदंडांची शिक्षा सुनावली. या दोषींना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. मुख्य आरोपी पप्पू बाबूलाल शिंदे याला बलात्कार आणि खून प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर या प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना बलात्काराचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. आरोपी संतोष भवाळ याने न्यायालयीन कामकाजात अडथळे निर्माण केल्यामुळे त्याला १८ हजार रुपये दंड सुनावण्यात आला होता. त्याने अद्यापही ही रक्कम भरलेली नाही. ही रक्कम महसुलीची थकबाकी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी वसूल करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आरोपी क्रमांक १ जितेंद्र शिंदे, आरोपी क्र. २ संतोष भवाळ आणि आरोपी क्र. ३ नितीन भैलुमे यांना खून आणि बलात्कार प्रकरणी शिक्षा ठोठावली. आरोपी एकला पीडितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा, बलात्कार केल्यामुळे जन्मठेप आणि २० हजार रूपये दंड. आरोपी २ व ३ यांनी बलात्काराचा कट रचल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा. आरोपी एकला खून आणि बलात्कारप्रकरणी फाशी, बलात्काराचा कट रचल्याप्रकरणी फाशी, आरोपीने दोनने खर्च भरला नाही त्यामुळे १८ हजार रूपये नगर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलची थकबाकी म्हणून वसूल करावा, असे आदेश दिलेत. कोपर्डीत राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीची १३ जुलै २०१६ रोजी जितेंद्र शिंदे, संतोष आणि नितीन या तिघांनी बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. शनिवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. सुवर्णा केवले यांनी तिघाही आरोपींना दोषी ठरवले होते. दरम्यान तिन्ही आरोपींना शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेता येईल. तिथे त्यांना वकीलही मिळेल.

दरम्यान, न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकालाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डीत शुकशुकाट पसरला होता. गावकरी निकाल ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात दाखल झाले होते पण कोणालाही आत प्रवेश देण्यात आला नव्हता. पोलीस प्रमुखांनीही सकाळी सुरक्षेचा आढावा घेतला होता.

गेल्या आठवड्यात भैलुमेचे वकील तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद केला. सुमारे सव्वातास युक्तिवाद सुरु होता. दोषींना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी यासाठी निकम यांनी १३ कारणे दिली. जितेंद्रने पीडितेवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. बलात्कारानंतर जितेंद्रने त्याच्या साथीदारांना मिस कॉल दिला होता. घटना घडली तेव्हा हे दोघेही जवळच दबा धरुन बसले होते. संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे हे पडद्यामागचे सूत्रधार आहेत. त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असे निकम यांनी न्यायालयात सांगितले. इंदिरा गांधींची हत्या आणि संसदेवरील हल्ला या प्रकरणांमध्ये सूत्रधारांना फाशीची शिक्षा झाली होती, याकडेही निकम यांनी लक्ष वेधले होते.

बचावपक्षाने केलेला युक्तिवाद

शिंदे याच्यावतीने वकील योहान मकासरे व भैलुमेच्यावतीने वकील प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद करताना कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली होती. आरोपी निर्दोष आहेत, खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, १२० ब (कट कारस्थान रचणे) व १०९ (गुन्ह्य़ाला प्रोत्साहन देणे) हे कलम लागूच होत नाही. भैलुमे हा सराईत गुन्हेगार नाही, पूर्वी त्याच्यावर गुन्हेही दाखल नाहीत. तो बीएससीचे शिक्षण घेत आहे. तो दलित आहे. कुटुंबाचा आधार आहे. त्याची आई आजारी असते. तिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. वडील मजुरी करतात. त्यामुळे कमीत कमी शिक्षा करावी, असा युक्तीवाद आरोपीचे वकील आहेर यांनी केला. शिंदे याच्या वतीने युक्तिवाद करताना वकील मकासरे यांनी,ही घटना दुर्मिळात दुर्मीळ नाही, आरोपी तरुण आहे, गुन्हेगार नाही. त्याला पत्नी आहे, असे सांगत फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याची विनंती केली होती.

या कलमांखाली ठरवले होते दोषी

न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड विधानातील कलम ३०२ (हत्या), ३७६- २ ब (बलात्कार करुन जखमी करणे), १२० ब (फौजदारी स्वरुपाचा कट रचणे), १०९ (गुन्ह्याला प्रोत्साहन देणे), ३५४ (छेड काढणे), बालंकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ६, ८, १६ अन्वये दोषी ठरवण्यात आले.

...Read More

V. S. News
श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

विराटला विश्रांती; रोहित शर्मा भारताचा नवीन कर्णधार

व्हीएस न्यूज - नागपूर कसोटीत श्रीलंकेवर मात केल्यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. गेले काही महिने सलग क्रिकेट खेळणाऱ्या भारताचा कर्णधार विराट कोहलीला वन-डे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेली आहे. वन-डे मालिकेसाठी रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करणार आहे. याचसोबत वन-डे मालिकेसाठी सिद्धार्थ कौलचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. विराट कोहलीला तिसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जाईल अशी चर्चा होती, मात्र तिसऱ्या कसोटीसाठी विराट कोहलीच्या हाती संघाचे नेतृत्व देण्यात आलेलं आहे.

असा असेल श्रीलंकेविरुद्ध भारताचा वन-डे संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल.

तिसऱ्या कसोटीसाठी असा असेल भारताचा संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा आणि विजय शंकर

...Read More

V. S. News
भाजप खासदार वरुण गांधी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसवासी होणार?

व्हीएस न्यूज - भाजपचे खासदार वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधून भाजपचे खासदार असलेल्या वरुण गांधींनी याबद्दल अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र गांधी घराण्यातील सर्व सदस्य लवकरच एकत्र येतील आणि हे २०१९ च्या निवडणुकीआधी घडेल, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

गांधी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाले आहे आणि लवकरच हे प्रत्यक्षात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते हाजी मन्झूर अहमद यांनी ‘इंडिया टुडे’ला दिली. ‘वरुण गांधी लवकरच काँग्रेसमध्ये दाखल होतील. ३५ वर्षांनी गांधी कुटुंब एकत्र येणार असून यामध्ये प्रियांका गांधी यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल,’ असेही अहमद यांनी सांगितले. भाजप खासदार वरुण गांधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे चुलत बंधू आहेत. संजय गांधी यांचे सुपुत्र असलेल्या वरुण गांधी यांना भाजपमध्ये फारसे महत्त्व दिले जात नाही.

वरुण गांधी यांनी अनेकदा पक्षाच्या आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. मात्र वरुण गांधी यांची आई मनेका गांधी या मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. वरुण गांधी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कधीही उघडपणे टीका केलेली नाही. त्यामुळे वरुण गांधी काँग्रेसवासी होऊ शकतात, असे मत उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य राम टंडन यांनी व्यक्त केले. वरुण यांनी अनेकदा पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षातून त्यांच्यावर टीकेची झोडही उठवण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावरुन त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. रोहिंग्यांच्या सुरक्षेची खातरजमा करुन त्यांना देशात आश्रय द्यावा, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या भूमिकेवर भाजपमधून जोरदार टीका झाली होती. ‘राष्ट्रीय हिताची काळजी असणारे लोक अशी विधाने करत नाही,’ अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी वरुण गांधींच्या विधानाला उत्तर दिले होते. अहिर यांच्या टीकेला वरुण गांधींनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिले होते. ‘रोहिंग्यांना आश्रय दिल्यास शरणार्थींबद्दलची भारताची भूमिका स्पष्ट होईल,’ असे वरुण यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

वरुण गांधी यांनी शेतकरी कर्जमाफी आणि त्यावरील राजकारणावरही टीका केली होती. कर्जमाफी दिल्यास आर्थिक शिस्त बिघडेल आणि कर्जाची परतफेड न करण्याची वृत्ती वाढेल. त्याचे विपरित परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतील, असा धोक्याचा इशारा वरुण यांनी दिला होता. १९९० पासून घेण्यात आलेल्या कर्जमाफीच्या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील पतपुरठ्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे वरुण गांधी यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात म्हटले होते. त्यांची ही भूमिकादेखील पक्षविरोधी होती.

...Read More

V. S. News
चित्रपट न पाहताच विरोध कसा करू शकतात

पद्मावतीवरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

व्हीएस न्यूज - सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींनी एखाद्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून मंजूरी मिळण्यापूर्वीच त्याविषयी वक्तव्य करणे अयोग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारला फटकारले. यावेळी न्यायालयाने पद्मावती चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासंबंधीची याचिका फेटाळून लावत सेन्सॉर बोर्डाच्या कामात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. यावेळी न्यायालयाने ‘पद्मावती’संदर्भात जाहीर मतप्रदर्शन करणाऱ्या सरकारमधील राजकीय नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मंत्र्यांनी अशाप्रकारे वक्तव्य करणे हे सेन्सॉर बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन ठरते. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या निर्णय प्रक्रियेवर दबाव येऊ शकतो, असे कोर्टाने सांगितले.

चित्रपटावर चर्चा होणे योग्य, पण चित्रपट न पाहताच नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे. चित्रपट प्रदर्शनासंदर्भातील निर्णय हे पूर्णपणे सेन्सॉर बोर्डाकडे असताना मंत्री त्याबाबत प्रतिक्रिया कशी देऊ शकतो, असा सवालही कोर्टाने केला. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाला राजपूत संघटनांचा तीव्र विरोध होत आहे. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट निर्मिती केल्याचा त्यांचा आरोप आहे. प्रदर्शनाविरोधात वकील मनोहरलाल शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यापूर्वीही ‘पद्मावती’विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता.

करणी सेनेने अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि भन्साळी यांना धमक्याही दिल्या होत्या. तर दुसरीकडे राजपूत संघटनांबरोबरच काही राजकीय नेत्यांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला. सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्यानंतरही चित्रपटावर बंदीचा निर्णय राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी तणाव निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या राज्यात ‘पद्मावती’वर बंदी घातल्याची प्रतिक्रिया सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली होती.

...Read More

V. S. News
सक्षम असतानाही आरक्षण मागणे ही लाचारी

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

व्हीएस न्यूज आर्थिकदृष्टय़ा सक्षम असतानाही आरक्षण मागणे ही माझ्या मते लाचारी आहे. मी स्वत: प्रतिकूल परिस्थितीत असताना आरक्षणाचा लाभ घेतला. परंतु सक्षम झाल्यावर मात्र स्वत:हून आरक्षण नाकारले. आता प्रत्येक जातीला आरक्षण हवे आहे. त्यामुळे ज्यांनी आधी आरक्षणाचा लाभ घेतला ते आता उच्चवर्णीय झाले की काय, असे वाटायला लागले आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांना शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.

शंकर नगरातील साई सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, काँग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी उपस्थित होते. शिंदे पुढे म्हणाले, दत्ता भगत हे केवळ एका व्यक्तीचे नाही तर विचाराचे नाव आहे. त्यांनी आपल्या नाटकांच्या माध्यमातून वैचारिक समाजजागृती केली. परंतु समाज आजही बदललेला दिसत नाही. बाबासाहेबांनी काळानुसार बदलायला सांगितले होते.

परंतु आजही काही लोक आधीच्या पिढीवर झालेल्या अन्याय-अत्याचाराचेच भांडवल करीत असतात. हे थांबले पाहिजे. ज्या व्यवसायामुळे आपली जात कळत असेल तो व्यवसायच सोडून दिला पाहिजे. दत्ता भगत हे नाटय़संमेलनाचे अध्यक्ष झाले. परंतु त्यांनी कधी त्यासाठी वशिला लावला नाही. साहित्य संमेलनात मात्र यासाठी भांडणे होत असतात.

नाटक हा माझ्याही आवडीचा विषय आहे. विद्यार्थीदशेत असताना मी नाटकात स्त्रीपात्र करायचो. राजकारणात तर नाटक ही कला जणू अनिवार्यच आहे, याकडेही त्यांनी मिश्कीलपणे लक्ष वेधले. संविधानदिनी दत्ता भगत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने विशेष आनंद झाला, अशी प्रतिक्रिया डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केली. विकास सिरपूरकर म्हणाले, दत्ता भगत यांनी आपल्या नाटकातून आंबेडकरी विचारांची मांडणी केली. मारवाडी फाऊंडेशनने या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
राणे आमदारच नाही, तर मंत्रीही होतील!

व्हीएस न्यूज - एनडीएमध्ये सामील झालेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे केवळ आमदारच नाही तर लवकरच ते मंत्री होतील, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश असेल असेही ते म्हणाले.

विधान परिषदेसाठी भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, विधान परिषदेची ही जागा भाजपाच्या उमेदवारांनी लढवावी, असा कोअर कमिटीत निर्णय झाला. त्याबाबत नारायण राणे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. त्यावर त्यांचे समाधान झाले आहे.

नारायण राणे हे एनडीएत सामील झाले आहेत. आगामी काळात पक्ष नक्कीच त्यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेईल. ते आमदारच नव्हे, तर लवकरच मंत्री होतील. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा नक्कीच समावेश असेल,असेही दानवे म्हणाले.

भाजपाच्या वतीने प्रसाद लाड यांना देण्यात आलेल्या उमेदवारी बाबत बोलताना ते म्हणाले की, प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत काही नावांची विधान परिषदेच्या उमेदवारी बाबत चर्चा झाली. त्यानंतर सर्व बाजूंनी विचार करून प्रसाद लाड यांचे नाव निश्चित करण्यात आले. ते केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला कळविण्यात आले. तिथून मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. लाड इतर पक्षातून आले असले तरी ते आता भाजपाचे आहेत. त्यामुळे त्यांना पाठबळ देणे हे पक्षाचे काम आहे, असेही दानवे म्हणाले.

...Read More

V. S. News
शिवसेनेतच फूट पडली असती - नारायण राणे

व्हीएस न्यूज - विधान परिषदेच्या निवडणुकीत माझी उमेदवारी असती आणि शिवसेनेचा कितीही विरोध असता तरी १०० टक्के मीच निवडून आलो असतो. शिवसेनेतच फूट पडली असती आणि त्यांच्या आमदारांनी मला मते दिली असती. माझ्या विरोधात तीन-तीन पक्ष एकत्र येतात हाच माझा विजय आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी सोमवारी व्यक्त केली. भाजपाची भूमिका पटल्यामुळेच आपण निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.

विधान परिषद पोट निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या वतीने प्रसाद लाड यांची उमेदवारी जाहीर झाली. याबाबत प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता राणे म्हणाले की, विधान परिषद पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपची रणनीती मला पटल्यानेच मी निवडणूक लढवत नाही. माझ्या उमेदवारीला शिवसेनेच्या विरोधाचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही, असेही राणे म्हणाले.

विधान परिषद निवडणूक न लढविण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल सांगताना ते म्हणाले की, रविवारी रात्री मुख्यमंत्री आणि माझी ‘वर्षा’वर बैठक झाली. त्यावेळी भाजपची भूमिका त्यांनी मला सांगितली आणि मला ती पटली. त्यामुळे मी ही निवडणूक लढवत नाही. शिवसेनेमुळे मला उमेदवारी मिळाली नाही हे मला मान्य नाही. मला उमेदवारी मिळाली असती आणि शिवसेनेचा कितीही विरोध असता तरी १०० टक्के मीच निवडून आलो असतो. नारायण राणेंना विरोध करण्यासाठी तीन पक्ष एकत्र येतात हाच माझा विजय आहे, असेही राणे म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीत राणे उमेदवार असतील तर तिन्ही पक्ष एकत्र येतील, असे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, त्यावर प्रतिक्रिया विचारली असता राणे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी कधी आपल्या पक्षातल्या तरी एखाद्या आमदाराला प्रेमाने हाक मारली आहे का? असा प्रतिसवाल राणे यांनी केला.

शिवसेनेचा समाचार घेताना ते म्हणाले की, नारायण राणेंसारखे शिवसेनेत कार्यकर्ते होते म्हणून आज शिवसेना टिकली आहे. उध्दव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. जूनच्या आधी काहीही होऊ शकते. मी लवकरच आमदार होईन. मी मुख्यमंत्री राहिलोय, मला आमदारकीचे काय कौतुक आहे? असा सवाल करत माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, असेही राणे यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
लिंगबदल सुट्टी : ‘मॅट’कडे दाद मागा, हायकोर्टाचे आदेश

व्हीएस न्यूज लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणा-या महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडित असल्याने याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी ‘मॅट’ मध्ये दाद मागणे अपेक्षित असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करणा-या ललिता साळवेंनी लिंगबदल शस्त्रक्रियेकरता सुट्टी द्यावी, असा अर्ज केला. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीसदलच नाही तर राज्याचे गृह विभागदेखील यासंदर्भात पुढे काय करायचे याचा विचार करत आहेत. कारण ललिताने मागणी लावून धरलीय की, ऑपरेशननंतरही पोलीस दलातील आपली नोकरी कायम राहावी. ललिता २३ जूनला मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये हार्मोन्स आणि शारीरिक चाचणी करता भरती झाली. २-३ तास चाचणी झाल्यानंतर जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या महिला पोलिसाला लिंग बदलण्यास हिरवा कंदील दाखवला.

त्यानंतर १७ सप्टेंबर २०१७ ला या महिला कॉन्स्टेबलने पोलीस अधीक्षक बीड यांना पत्र लिहून लिंग बदलाकरता सुट्टी पाहिजे, असा अर्ज केला. त्याची प्रत पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनाही मेलद्वारे पाठवण्यात आली. पण, या महिला पोलिसाची महिला गटातून पोलीस दलात भरती झाली आहे, त्यामुळे लिंग बदलानंतर या महिलेला नोकरीला मुकावे लागेल असे पोलीस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले आहे. त्यानंतर तिने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.

...Read More

V. S. News
नवमतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाला फेसबुकची साथ

२८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान मोहीम

व्हीएस न्यूज भारतातले सुमारे २१७ अब्ज लोक फेसबुकवर आहेत. त्यामुळेच, १८ वर्षे वयाच्या नागरिकांना मतदार नोंदणी करायची आहे, हे आता निवडणूक आयोगातर्फे फेसबुकच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे. या मोहिमेचा भाग म्हणून, २८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या काळात १८ वर्षे पूर्ण करणा-यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच न्यूज फीड रिमांइडर पाठवले जाईल आणि निवडणूक आयोगाकडे आपली नोंदणी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. इतकेच नाही, याआधीच वयाची १८ वर्षे पूर्ण सर्व केलेल्या तरुण-तरुणींना ३० नोव्हेंबर रोजी नोंदणीची आठवण करून देण्यासाठी रिमांइडर पाठवले जाईल.

नव्याने मतदानासाठी पात्र ठरणा-या सर्व तरुण भारतीयांना हे मतदारनोंदणी रिमाइंडर पाठवले जाईल. हे रिमाइंडर इंग्रजीसह, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलगु, मल्याळम, कन्नड, पंजाबी, बंगाली, उर्दू, आसामी, मराठी आणि उडिया आदी १३ भारतीय भाषांमध्ये असेल. ‘रजिस्टर नाऊ’वर क्लिक केल्यानंतर तुम्ही थेट National V’ters’ Services Portal इथे पोहोचाल आणि तिथे तुम्हाला नोंदणीसाठीच्या प्रकियेची माहिती दिली जाईल. भारतात पहिल्यांदाच नव्या मतदारांना ध्यानात घेऊन फेसबुकवर मतदार नोंदणी रिमाइंडरचा उपकम राबवण्यात येत आहे. भारतीय निवडणूक आयोगातर्फे १५ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच मतदान करणा-या मतदारांच्या नोंदणीसाठी मोहीम जाहीर करण्यात आली आहे. आयोगाच्या या मोहिमेला हातभार लावण्यासाठीच फेसबुकवरील हा उपकम आखण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त आचल कुमार ज्योती म्हणाले, १ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षाचे होणा-या किंवा त्याआधीच १८ चे झालेल्या भारतातील सर्व तरुण पात्र आणि संभाव्य मतदारांची नोंदणी करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने खास मोहीम सुरू केली आहे, ही घोषणा करताना मला फार आनंद होत आहे. निवडणूक आयोगाने माहितीचा प्रसार करण्यासाठी फेसबुकसोबत केलेल्या या भागीदारीमुळे भारतातील तरुण डिजिटल समुदायापर्यंत आमच्या ‘नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड’ (कोणीही मतदार सुटता कामा नये) आणि ‘एव्हरी वोट काऊंट्स’ (प्रत्येक मत महत्त्वाचे आहे) या मोहिमा नेणे शक्य होणार आहेत.

भारत, दक्षिण आणि मध्य आशियाचे पॉलिटिक्स अ‍ॅण्ड गव्‍‌र्हर्न्मेंट आऊटरिच मॅनेजर नितीन सलुजा म्हणाले, स्वत:शी निगडित, जे जे काही आपल्याला ‘मॅटर करतंय’, त्या सर्व बाबतीतील माहिती मिळवणे, त्याबद्दल बोलणे, त्यात सहभागी होणे यासाठी लोक फेसबुक वापरतात. या पद्धतीच्या सामाजिक उपकमाला, निवडणुकीच्या दिवशीच नव्हे तर नेहमीच जोडून घेता येईल, अशी उत्पादने आम्ही तयार करू शकतो. या वर्षीच्या सुरुवातीपासून, भारतातील लाखो लोकांनी निवडणुकांच्या संदर्भात फेसबुकचा वापर केला आहे.

...Read More

V. S. News
राष्ट्रवादी-शिवसेनेचा राजकीय शिमगा

व्हीएस न्यूज - विधान परिषदेच्या होवू घातलेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात एकत्रितपणे लढण्याची घोषणा करणा-या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी एकमेकांची उणीदुणी काढत अख्ख्या महाराष्ट्राला हिडीस राजकारणाचे दर्शन घडविले.

काँग्रेस सोडताना नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ७ डिसेंबर रोजी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर आहे. या निवडणुकीत नारायण राणे उमेदवार असतील तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची रणनीती आखली आहे. नारायण राणे यांनी उमेदवारी दाखल केली तर भाजपचे त्यांना समर्थन मिळण्याची शक्यता असल्याने शिवसेनेची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे केवळ राणेंना विरोध करण्यासाठी म्हणून भिन्न विचारधारेच्या या पक्षांची अभद्र युती होवू घातली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी एकिकडे एकत्र येणारी ही मंडळी शनिवारी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढत एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. एकीकडे हे विधान परिषद निवडणुकीसाठी एकत्र येण्याची भाषा करतात आणि दुसरीकडे एकमेकांवर चौफेर हल्ला करतात हे पाहिल्यावर महाराष्ट्रातील राजकीय पातळी कमालीची घसरल्याचे पहायला मिळते. त्यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवरही टीकास्त्र सोडले. तर उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्तेतील मोठा भाऊ भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका करून आपल्या संस्कृतीचे पुन्हा एकदा दर्शन घडविले आहे.

शिवसेनेचा पाय फेव्हीकॉलसारखा सत्तेला चिकटलेला- शरद पवार

शेतक-यांच्या हिताचा विचार होत नसेल तर आम्ही सत्तेवर लाथ मारु, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले होते. त्याचा संदर्भ देत पवारांनी उध्दव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. तीन वर्षात शेतक-यांच्या हिताचा काहीच विचार झाला नाही. तरीही शिवसेनेचा पाय ‘फेव्हीकॉल’सारखा सत्तेत चिकटलेला असून तो बाहेरच निघत नाही, अशी टीका पवारांनी केली. उद्धव ठाकरे सत्तेत असूनही सरकार विरोधात बोलतात. सत्तेच जायचे आणि सत्तेला लाथा घालायच्या, हे आपण यापूर्वी पाहिले नाही. सत्तेत जावून, सत्तेचा पूर्ण लाभ घेत सत्तेच्या नावाने शंख कसा करायचा, याची एक नवी दिशा शिवसेनेने दाखवली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला पाहिजे, असा टोलाही पवारांनी मारला. शेतक-यांचे हित होत नाही हे जगजाहीर असताना उध्दव ठाकरे कशासाठी सत्तेत आहेत? आमच्या मित्रांचे चिरंजीव आहेत त्यामुळे मी फार काय बोलत नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे मोठा विनोद

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेले उज्ज्वल महाराष्ट्राचे स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना पूर्ण करता आले नाही. ते स्वप्न आमचे सरकार पूर्ण करीत आहे, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थावर केल्याचे समजल्यानंतर पवार यांनी त्यांचाही समाचार घेतला. पवार म्हणाले, हा तर या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे. मुख्यमंत्री ज्या विचारधारेत वाढले आणि काम करीत आहेत, त्या विचारधारेचा यशवंतराव चव्हाणांना कधी स्पर्शही झाला नाही, ही त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे.

१५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर ६ हजार १५ कोटी कर्जमाफीची रक्कम जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितले आहे. त्याबद्दल विचारले असता, यापूर्वीही दोनदा मुख्यमंत्र्यांनी असेच विधान केले होते. मात्र,कर्जमाफीचा फायदा शेतक-यांना झालेला नाही. त्यांचे विधान म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचाच भात, असल्याची टीकाही पवार यांनी केली.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडताच राष्ट्रवादी भाजपसोबत नांदायला जाईल : उद्धव ठाकरे

शरद पवार म्हणतात सत्तेत नांदता येत नसेल तर वेगळे व्हा, आम्ही वेगळे होताच हे भाजपासोबत नांदायला जातील, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या टीकेचा समाचार घेतला. मला माझ्या हक्काचे मंत्रिमंडळ हवे आहे. आता रडायचे नाही लढायचे. तुमची तयारी असेल, मी तुमच्यासोबत आहे, असे उद्धव म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्ट्रातील व्यापारी हे का करू शकत नाहीत?, तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करत तुमची सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तयारी असेल तर मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही देतानाच भाजपविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी ठाकरे यांनी दर्शविली.

नवसाचे पोर उडाणटप्पू निघाल्यास काय बोलायचे?

सरकार म्हणजे नवसाचे पोर असून ते उडाणटप्पू निघाल्यास काय बोलायचे? असा भाजपला टोला लगावत, ते पोर बिघडले म्हणून त्याला बोलण्याचे धाडस दाखवायचे का नाही? का नुसत्याच पेकाटात लाथा खायच्या असा सवालही ठाकरे यांनी केला.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सरकारच्या जाहिरातबाजीवरही हल्लाबोल केला. मी खूप काही तरी करतोय असा आभास निर्माण करायचा आणि त्यावर जाहिराती करून भोळ्याभाबड्या जनतेला फसवायचे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्ला चढविला.

...Read More

V. S. News
लोकसभा स्वबळावर लढविण्याचे दानवेंचे संकेत

व्हीएस न्यूज - आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत देत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांनी संघटन अधिक मजबूत करा, कामाला लागा, असे निर्देश भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत. भाजपच्या मराठवाड्यातील पदाधिका-यांची आढावा बैठक दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी त्यांनी हे सूतोवाच केले.

प्रदेश सरचिटणीस, आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, गणेश हाके, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. व्यासपीठावर येताच प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पदाधिका-यांना मोबाईल बंद करा, आपसात बोलू नका, अशी दमवजा सूचना केली. यानंतर त्यांनी जिल्हानिहाय पदाधिका-यांशी संवाद साधत कामाचा आढावा घेत अडीअडचणी समजून घेतल्या.

कार्यकर्त्यांनी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होतील किंवा नाही, हे सांगता येत नाही, पण लोकसभा स्वबळावरच लढविल्या जातील, असे संकेत दानवे यांनी दिले आहेत. निवडणुका गांभीर्याने घेत त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, संघटन बांधणीवर भर देत बूथ यंत्रणा अधिक सक्षम करा, असे निर्देश कार्यकर्त्यांना त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. बुथनिहाय रचना कशी झाली आहे, दिलेल्या कार्यक्रमानुसार पदाधिका-यांनी कामे केली आहेत किंवा नाहीत यावर अधिक भर देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजप दबावाखाली येणारा पक्ष नाही

नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी उमेदवार ठरविण्याबाबत शिवसेनेचा दबाव विचारात घ्यावा लागेल का, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता दानवे यांनी भाजप हा कोणाच्या दबावाखाली येणारा पक्ष नाही. शिवसेनेला त्यांचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार आहे. आमच्या पक्षाचे निर्णय कोणाच्या दबावाखाली होत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

...Read More

V. S. News
शेतकऱ्यांच्या खात्यांवर साडेसहा हजार कोटी जमा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

व्हीएस न्यूज राज्यातील १५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर आजच साडेसहा हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने मुंबईत पहिले जिल्हा भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

वारणा विविध उद्योग समूह आणि शिक्षण संकुलातर्फे वारणानगर येथील इंजिनीअरिंग कॉलेजच्या मैदानावर रात्री वारणा परिवाराशी मुक्त संवाद ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ प्रश्नोत्तर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या वेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. सुमारे सव्वा तास संवाद चालला. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. या निमित्ताने वारणा परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज परत करत असतो. त्यामुळेच ग्रामीण भागातील सोसायटय़ा टिकून आहेत. प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांना आम्ही प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपये देतो. या रकमेत निश्चितपणे वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुळात कर्जमाफी ही योजना नाही तर अडचणीत सापडलेल्या शेतक-याला ती मदत आहे.

गेल्या वेळच्या कर्जमाफीत अनेक नेत्यांनी आपले हात धुऊन घेतले. तसा प्रकार होऊ नये आणि लोकांचा पैसा वाया जाऊ नये म्हणून अतिशय पारदर्शीपणे ही योजना राबविण्यासाठी आम्ही काही निकष लावले. त्यातून १५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर आजच साडेसहा हजार कोटी रुपये जमा केले आहेत, असेही ते म्हणाले.

शिक्षकांच्या बदल्या मेमध्येच करण्यात येतील. विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल, तेथे एसटी बस उपलब्ध करून दिल्या जातील. माथाडी कामगारांच्या घरांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही फडणवीस सांगितले.

कर्जमाफी योजनेतील महाराजांचे नाव बदलण्याची मागणी

शेतकरी कर्जमाफी योजनेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बदलावे आणि त्यांचा अपमान थांबवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांंनी कऱ्हाडच्या विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवापासून कोल्हापूर दौ-यावर आहेत. दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप करत शेतकरी कृती समितीने काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तत्पूर्वीच पोलिसानी त्यांना ताब्यात घेतले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!