Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तिघांनी केला अत्याचार

व्हीएस न्युज - सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून घर सोडून गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मदत करण्याच्या बहाण्याने ३ जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ११ ते १४ सप्टेंबर २०१८ या दरम्यान भोसरी व चंदननगर येथे घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने आळंदी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल अहमद शेख (वय ३३ वर्ष रा. काटे वस्ती दिघी) विजय हनुमंत ननवरे (वय ३० वर्षे रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०१८ रोजी सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलगी घर सोडून गेली होती. मुलीच्या आईने मुलगी हरविल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेतला, असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे, निगडी पोलीस एका हरवलेल्या एका महिलेचा शोध घेत असताना निगडी पोलीसांना एक अल्पवयीन सापडली.

त्या मुलीकडे विचारपूस करून तिला आळंदी पोलीस स्टेशन पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी पोलिसांनी त्या मुलीकडे चौकशी केली असता मुलगी महिला पोलिस कर्मचारी समोर जबाब देण्याच्या मनस्थिती नसल्याने तिच्या आईला बोलावुन विश्वासात घेवुन ती कोठे गेली व कोणाकडे राहीली याबाबत चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला.

ती राहत्या घरातून दि ११ सप्टेंबर रोजी पायी चालत विश्रांतवाडी येथे गेली असता तेथे भेटलेल्या रामचंद नावाचे कार चालकाने कार गाडी मध्ये बसून चंदन नगर येथे चंद्र लॉज नेले व तेथे जबरदस्ती करून अतिप्रसंग केला. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी विमाननगर येथे सोडले. तेथे ओला उबेर कार चालक अब्दुल शेख हा भेटला त्याने चौकशी केली असता तिने सावत्र आई त्रास देत असल्याने घर सोडून आल्याचे सांगितले.

त्यामुळे अब्दुल शेख याने त्याचा मित्र विजय ननवरे राहणार चक्रपाणी वसाहत भोसरी याची बायको मयत झाली आहे. त्याच्याकडे जाऊन रहा असे सांगून तिला घेऊन मित्र विजय ननवरे त्याचे घरी सोडले. तेथे विजय नन्नवरे याने देखील तिच्यावर जबरदस्तीनेेेे कोंडून तिच्यावर अत्याचार केला. दि १४ सप्टेंबर रोजी अब्दुल शेख हा भेटण्यास आला असता त्यास अल्पवयीन मुलीने विजय ननवरे याने केलेल्या अतिप्रसंग याबाबत माहिती दिली.

त्यावेळी विजय ननवरे व अब्दुल शेख यांनी चर्चा केली विजय ननवरे हा घराबाहेर गेला असता अब्दुल शेख याने खोलीचा दरवाजा बंद करून त्यानेसुद्धा त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितली.

या घडलेल्या प्रकाराबद्दल तिच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल अहमद शेख (वय ३३ वर्ष रा. काटे वस्ती दिघी) व विजय हनुमंत ननवरे (वय ३० वर्षे रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) यांना अटक केली आहे.आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
बायकोचा राग ८ महिन्याच्या बाळावर काढणाऱ्या बापावर खूनाचा गुन्हा दाखल

व्हीएस न्युज - चाकणच्या नाणेकरवाडी मध्ये बायको घर सोडून गेल्याने पोटच्या आठ महिन्याच्या मुलाला वडिलांनी पाण्याच्या टाकीत टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल सुनार असे ८ महिन्याच्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी वडील चक्र उर्फ राजू सुरत सुनार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी चक्र उर्फ राजुचे पत्नी निर्मला सोबत जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पत्नी निर्मला घर सोडून निघून गेली.त्यानंतर ही धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी प्रवीण बब्रुवान झुंजार यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे.

आरोपी वडील चक्र उर्फ राजू सुरत सुनार (वय २४, रा. ज्योतिबा नगर, नाणेकर वाडी, मूळ रा. नेपाळ) आणि पत्नी निर्मला दोन मुलांसह गुरुवारी भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते.दोन वर्षांची मुलगी आणि आठ महिन्याचा साहिल अस त्यांच कुटुंब,गुरुवारी रात्री उशिरा पत्नी निर्मला आणि आरोपी चक्र उर्फ राजू यांच्यात जोरात भांडण झाले.दोन्ही मुलांना घरी सोडून पत्नी निर्मला घराबाहेर निघून गेली.याचाच राग मनात धरून पती चक्र उर्फ राजू सुरत सुनार याने आपल्या आठ महिन्याच्या चिमुकल्याला बाथरूम जवळील पाण्याच्या टाकीत टाकून दिले यात त्याचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलीस उपयुक्त स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार आदी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी भेटी देऊन पाहणी केली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

पत्नी निर्मला ही या अगोदर अनेक वेळा घर सोडून निघून गेलेली आहे.परंतु या दोघांच्या भांडणात आठ महिन्याच्या चिमुकलीचा जीव गमवावा लागला तर दोन वर्षीय मुलीला पोलिसांना सांभाळण्याची वेळ आहे.दरम्यान निर्मलाचा शोध पोलीस घेत आहेत.

...Read More

V. S. News
‘चोर तर चोर पोलिसांवर शिरजोर!’, पोलीस अधिकाऱ्यासाठी मनसेचा पुण्यात मोर्चा

व्हिएस न्युज - पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मगितल्याप्रकरणी मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांची पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे बदली झाली असल्याचा आरोप करीत आज पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ मनसेचा कोंढवा पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढण्यात आला.या मूक मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या मूक मोर्चाचे नेतृत्व मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केले. ते यावेळी म्हणाले, भाजपचे आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या भावावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्याऐवजी कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या मिलिंद गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. हा भारतीय जनता पक्षाचा कुठला पारदर्शी कारभार आहे. आमदार योगेश टिळेकर यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो पूर्ण चौकशीअंती झाला आहे. त्याचे सर्व पुरावे पोलिसांकडे आहेत. असे असताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. ही निषेधार्थ बाब असून शासनाचा सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, मिलिंद गायकवाड यांना न्याय मिळाला नाही. तर भविष्यात जे काही होईल त्याला सर्वस्वी पोलीस यंत्रणा जबाबदार राहतील असा इशारा देखील त्यांनी यावेळी त्यांनी दिला.

काय आहे हे प्रकरण

भाजपचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी अचानक बदली करण्यात आली. ही बदली राजकीय दबावामुळे झाली असावी अशी चर्चा पोलीस दलात आणि पुणे शहरात सुरू झाली आहे. या बदली विषयी मिलिंद गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले, माझी कोणत्याही राजकीय कारणास्तव बदली झाली नसून मी बदलीचा अर्ज दिला होता. त्यानुसार बदली झाली आहे.

योगेश टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्यास ५० लाखांची खंडणी मागितली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यामध्ये टिळेकरांबरोबर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे, रविंद्र बराटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी रवींद्र बराटे यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिकारी गायकवाड कोंढवा पोलीस स्थानकात आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेत असताना त्यांच्या सहकाऱ्यांना आणि त्यांनाही अश्रू अनावर झाले. याचा व्हिडियो कॅमेरात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिलिंद गायकवाड कोंढवा पोलीस स्टेशन येथे १४ महिन्यांपूर्वी रुजू झाले होते. याठिकाणी सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण होत नाही तोवर दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांची बदली करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला. त्यानंतर आज त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमधील कर्मचारी वर्गाला आपण पदभार सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थित असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांना डोळ्यातील अश्रू पाहून गायकवाड यांनाही अश्रू अनावर झाले.

...Read More

V. S. News
स्वारगेट पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ?

व्हिएस न्युज - सांगली जिल्ह्यातील अनिकेत कोथळे याचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूच्या घटनेची राज्यभरात चर्चा सुरू असताना पुण्यातील स्वारगेट पोलिसांनी मोबाइल चोरी प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले होते. त्या तरुणाचा स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकानी केला आहे.

अजित कल्लप्पा पुजारी (वय 22) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोथरुडमधून अजित पुजारी याला चोरी प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. मोबाइल चोरी प्रकरणी त्याच्याकडे चौकशी करताना त्याच्या पोटामध्ये अचानक दुखू लागले. त्यामुळे त्याला तात्काळ ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले असून हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अजित पुजारीच्या मृत्यूची माहिती कुटूंबियांना समजताच ससून रुग्णालयात एकच गर्दी केली असून पोलिसांच्या मारहाणीतच अजितचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नेमका कशामुळे मृत्यू झाला आहे हे आता शवविच्छदेन अहवालानंतरच समजू शकणार आहे.

...Read More

V. S. News
भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्याकडून एका कुटुंबास मारहाण

व्हीएस न्युज - सोसायटीमध्ये कमी पाणी आले, याची तक्रार एका नागरिकाने नगरसेवकाच्या कार्यालयात जाऊन केली. याचा राग मनात धरून नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारदार नागरिकाच्या घरी जाऊन संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. १८) रात्री साडेआठच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडला.

संतोष दोडके (वय ४३, रा. धीरज गोल्ड अपार्टमेंट, पिंपळे निलख, सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल कामटे, विशाल कामटे, प्रतीक दळवी, गणेश (पूर्ण नाव माहिती नाही) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोडके यांच्या सोसायटीमध्ये गुरुवारी पाणी कमी आले. याची तक्रार घेऊन ते नगरसेवक तुषार कामठे यांच्या विनायकनगर पिंपळे निलख येथील जनसंपर्क कार्यालयात गेले. त्यांनी आपली तक्रार अमोल कामठे याच्याकडे तोंडी केली. रात्री साडेआठच्या सुमारास दोडके घरी जेवण करत होते, त्यावेळी तुषार कामठे यांचा ड्रायवर गणेश याने दोडके यांना सोसायटीच्या पार्किंग परिसरात बोलावले.

पार्किंग परिसरात अमोल, विशाल, प्रतीक आणि त्यांचे काही साथीदार होते. ‘तुम्ही दरवेळेस पाण्यासाठी ऑफिसमध्ये येऊन तक्रारी का करता’ असे म्हणत सर्वांनी मिळून संतोष दोडके, त्यांचा मुलगा प्राणिकेत (वय १९) याला देखील मारहाण केली. तसेच दोडके यांच्या पत्नीला धक्काबुक्की केली. सर्वांनी प्राणिकेत याला तीन ते चार दिवसात ठार मारण्याची धमकी दिली. यावरून दोडके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, वैयक्तिक कारणावरून ही भांडणे झाली असून त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. ही भांडणे माझ्या कार्यालयात झालेली नसून बाहेरच्या इमारतीमध्ये झाली आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही चेक करावेत. भांडण केलेले आपल्या कार्यालयातील कर्मचारी नाहीत. विरोधकांकडून माझी बदनामी करण्यासाठी करण्यात आलेले हे षढयंत्र आहे असे स्पष्टीकरण तुषार कामठे यांनी दिले आहे.

...Read More

V. S. News
मोदी भेटीचा हट्ट धरणा-या तृप्ती देसाईना पुण्यात अटक

व्हीएस न्युज - सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार आहेत. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची होती. मात्र त्याआधीच पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

तृप्ती देसाईंनी गुरुवारी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची मागणी केली होती. आपल्याला शबरीमाला मंदिर प्रकरणी मोदींना भेटायचे आहे असे त्यांनी पत्रात म्हटले होते. आपल्या भेटू दिले नाही तर मोदींचा ताफा रोखण्याची धमकी त्यांनी दिली होती.

आम्ही शिर्डीला निघणार होतो. त्याआधीच पोलीस इथे पोहोचले. हे चुकीचे आहे. आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. आम्हाला घरीच थांबवण्यात आले. मोदींकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी खुले केले आहेत. पण त्यानंतरही मंदिरात जाण्यापासून महिलांना रोखण्याचा प्रयत्न होतं आहे. अयप्पाच्या भक्तांकडून काही महिलांना मारहाण करण्यात आली आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी तृप्ती देसाईंना पंतप्रधान मोदींची भेट घ्यायची होती.

मोदी शिर्डीत येऊन सुरक्षितपणे साईबाबांचे दर्शन घेणार. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महिला शबरीमाला मंदिरात का जाऊ शकत नाहीत? असा सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विचारला. आम्हाला शबरीमाला मंदिरात जायचे आहे पण तुमचे तुकडे करुन महाराष्ट्रात पाठवू अशा धमक्या दिल्या जात आहेत. जे हिंसाचार पसरवणारे आहेत त्यांना भाजपा पाठिंबा देत असताना मोदी गप्प का आहेत ? असा सवाल त्यांनी विचारला.

...Read More

V. S. News
लग्न ठरत नसल्याने भाऊ-बहिणीची आत्महत्या

व्हिएस न्युज - खेड तालुक्यातील डेनेगावमध्ये राहणाऱ्या भाऊ बहिणीचेलग्न ठरत नसल्याने दोघांनी नैराश्यातून आत्महत्या केली. रंजन गणपत भोपळे (40) तर शैला गणपत भोपळे(38) अशी आत्महत्या केलेल्या भाऊ बहिणीची नावं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊ बहिणीचे लग्न ठरत नसल्याने दोघांनी नैराश्यातून विषारी औषध पिऊन जीवनयात्रा संपवली. बुधवारच्या सायंकाळी सातच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना विषारी औषधाचा वास आल्याने, हा प्रकार समोर आला. भाऊ-बहीण दोघेच इथे राहत होते. दोघांचे वय वाढत चालले होते, मात्र लग्न ठरत नव्हते. त्यामुळे दोघे नैराश्यात होते, बऱ्याचदा यावर नातेवाईकांसोबत त्यांच बोलणं ही होत असे. आज मात्र या नैराश्यातून त्यांनी आयुष्य संपवले. खेड पोलीस पुढील तपास करत आहेत....Read More

V. S. News
रविवारी चिंचवड मध्ये डॉग शो ; देश, विदेशातील नामांकित जातीचे श्वान पाहण्याची शहरवासियांना पर्वणी 

व्हीएस न्युज - पुना केनल कॉन्फेडरेशन या संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 21 ऑक्टोबर) ‘ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव एन. एस. पटवर्धन यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत देश, विदेशातील वेगवेगळ्या जातीचे श्वान शहरवासियांना पाहण्याची पर्वणी ठरणार आहे. यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमन, ग्रेट डेन, बीगल, पग, क्रॉकर्स स्पॅनिएल, बुल मास्टिफ, लासा, रॉटविलर, डालमिशन तसेच विशेष आकर्षण म्हणुन अफगाण हाउंड, जायंट श्नाउजर, फॉक्स टेरियर, साइबेरियन हस्की या जातीचे श्वान स्पर्धेत सहभागी होणार आहेत. केनल क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने 112 व 113 वी चॅम्पियनशीप स्पर्धा होत आहे. यामध्ये मायनर पपी, पपी, ज्युनियर, इंटरमेडिएट, ब्रेड इन इंडिया, ओपन, चॅम्पियन या गटात स्पर्धा होतील. फिलिपाइन्स येथील साइमन सिम, स्विडन येथील नीना कार्ल्सडॉटर आणि भारतातून मुकुल वैद व संजय देसाई हे परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. देशभरातून तीनशेहून जास्त श्वानांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत होणा-या या स्पर्धेत सर्व प्रेक्षकांना मोफत प्रवेश आहे. देश, विदेशातील नामांकित जातीचे श्वान पाहण्याची संधी शहर वासियांना मिळणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक योगेश आकुलवार, सिद्धेश दर्शीले, तुकाराम सुर्वे, विकास बाराथे, संजय मुत्तुर, विक्रांत भोसले, राजेश जाधव यांनी केले आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत.

...Read More

V. S. News
पेट्रोल, डिझेल भाववाढीला युपीए सरकार जबाबदार.....सोमाभाई मोदी

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान ही जनतेचीच मागणी.....सोमाभाई मोदी

व्हिएस न्युज - पेट्रोल, डिझेलच्या किंमतीबाबतचे धोरण युपीए सरकारच्या कार्यकाळात ठरविण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किंमतींच्या परिणामामुळे भाववाढ होत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही जनतेचीच मागणी आहे. त्या पदासाठी ते सक्षम आहेत. तसेच मेहनती आणि प्रयत्नवादी आहेत. आगामी निवडणूकीला विरोधकांपुढे काहीच मुद्दा नसल्यामुळे विरोधक भाववाढीचा मुद्दा काढत असल्याची टिका सोमाभाई मोदी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी मंगळवारी (दि. 16 ऑक्टोबर) पुणे, आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी च-होली येथील साई मंदीरात भेट दिली. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विकास रासकर श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे, विश्वस्त शिवकुमार नेलगे, सदन कमांडचे संचालक संजीवकुमार, शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त डी. एच. इनामदार, वसंतराव पिंपळे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सोमाभाई मोदी म्हणाले की, त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाबाबत आपण पुर्ण संतुष्ट आहोत. सर्व काही मोफत मिळाले तर अच्छे दिन येतील असे नाही तर त्यासाठी कष्ट केले पाहिजे. मोदींनी कष्ट करुनच देशात स्वच्छ भारत अभियान यशस्वी केले आहे. देशभर शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय उभारली आहेत. त्यामुळे आरोग्याचा व शिक्षणाचा आलेख उंचावला आहे. महिला, मुलींवरील अत्याचाराबाबत प्रश्न विचारला असता सोमाभाई मोदी म्हणाले की, आई, वडील ज्याप्रमाणे मुलींना बंधनात ठेवतात तसे त्यांनी उशीरा घरी येणा-या मुलांना देखील प्रश्न विचारले पाहिजेत. मुलगा, मुलगी भेदभाव न करता त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत. देशातील शेती पाऊसावर अवलंबून असल्यामुळे पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरला पाहिजे असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त सुभाष नेलगे यांच्या हस्ते सोमाभाई मोदी यांच्या शाल, श्रीफळ व साईंची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.

...Read More

V. S. News
कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्याला गरबा खेळण्यास मज्जाव

व्हीएस न्युज - कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट-तामचीकरला गरबा खेळण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.

तिचा पती विवेक तामचीकर यानेही पिंपरी येथे घडलेल्या या प्रकाराबाबत फेसबुक पोस्ट लिहून या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे.

पिंपरी चिंचवडच्या भटनगरमध्ये हा प्रकार घडला. खराडीत राहणारी ऐश्वर्या माहेरी आल्याने भटनगरमधील देवीच्या दर्शनाला गेली होती. तेव्हा ती इतर महिलांसोबत दांडिया खेळू लागली. मात्र मंडळाने हे पाहताच दांडिया खेळ बंद केला आणि डिजे सुरू केला. तिथे असलेले तरूण डिजेवर नाचू लागले. ऐश्वर्या तिथे काही वेळ थांबली होती. मग तिने एका मैत्रिणीला बोलावले, मैत्रिणीला तिथेच थांबवून ती पिंपरी पोलीस चौकीत गेली ऐश्वर्या तिथून गेल्याचं पाहताच दांडिया पुन्हा सुरु झाल्याचे तिच्या मैत्रिणीने तिला कळवलं. कौमार्य चाचणीला विरोध केल्यानेच मला गरबा खेळू दिला नाही असा आरोप ऐश्वर्याने केला आहे.

जानेवारी महिन्यापासून ऐश्वर्या आणि कंजारभाट समाजातील इतर तरूण-तरूणींना कौमार्य चाचणीला विरोध दर्शवला आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियावर Stop The V Ritual या नावाने ग्रुप तयार करून हे तरूण-तरूणी एकवटलेत. ”पिंपरीतील कंजारभाट समाजातील गुंडांनी पुन्हा एकदा पुरुषार्थ दाखवून दिला. निषेध! निषेध! निषेध! माझ्या पत्नीने या जात गुंडांच्या कौमार्यपरिक्षणाच्या अमानुष प्रथेविरोधात हिंमतीने लढा दिला म्हणून तिला दांडिया, गरबा खेळण्यास मनाई करून बहिष्काराचं कृत्य करण्यात आलंय, कौमार्य परिक्षण करणाऱ्यांनी नवरात्रीत देवीची पूजा करणे हे निव्वळ ढोंग आहे.” अशी फेसबुक पोस्ट ऐश्वर्याचा पती विवेक तामचीकर याने लिहिली आहे.

...Read More

V. S. News
डिजीटल पिढीला जैन संस्कृतीच मार्गदर्शक ठरेल.....फुलचंद कटारिया 

व्हीएस न्युज - विविधतेने आणि परंपरेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत सण, उत्सवाला महत्व आहे. खंडप्राय देशात सर्वच धर्मात विविध सण साजरे केले जातात. या सर्व सण - उत्सवाला शास्त्रीय आधार असल्याचे दिसते. शेतीप्रधान देशात भुप्रदेशानुसार संस्कृती विकसित होत गेली. यामध्ये भगवान महावीर यांनी सांगितलेली अहिंसेची परंपरा जपणारी जैन संस्कृती हि देशातील प्राचिन संस्कृती आहे. मातृ - पितृ आणि गुरु परंपरेला महत्व देणारी, अहिंसेचे पालन करणारी जैन संस्कृतीच पाश्चिमात्यांचे अनुकरण करु पाहणा-या ‘युवा डिजीटल पिढीला’ मार्गदर्शक ठरेल असा विश्वास जैन समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फुलचंद कटारिया यांनी व्यक्त केला.

जैन एकता मंचच्या वतीने आहेर गार्डन चिंचवड येथे नवरात्री निमित्त 15 ऑक्टोबर 2018 रोजी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे चित्रपट कलाकार आलोक नरूला, अंशु मलिक - नरूला, संस्थापक संजय जैन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, नगरसेविका करुणा चिंचवडे, उद्योजक दिलीप सोनिग्रा, राजेंद्र मुथा, अशोक बाफना, राहुल मुनोत, करुणेश जैन, कृपाल गेहानी, पंकज सुराणा आदी उपस्थित होते.

जैन एकता मंचचे पदाधिकारी राहुल मुनोत, राजेश सोनिमिढे, भुपेश संकले, भारत बेदमूथा, किरण संचेती, प्रशांत बंब, जितेंद्र संचेती, पारस भटेवरा, विजय सोनी, दिलीप संचेती, संतोष नहार, संतोष लुणावत, आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला होता. सोनिका जैन यांनी नवकार महामंत्राचे पठण केले. स्वागत संजय जैन, सूत्रसंचालन सपना जैन तर आभार राहुल मुनोत यांनी मानले.

...Read More

V. S. News
नेहरु नगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे "स्वच्छता अभियान" ; परिसर स्वच्छ.

व्हीएस न्युज - भाजपा निगडी चिखली मंडल व प्रभाग क्र 9 च्या वतीने वतीने नेहरु नगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे आज रोजी "स्वच्छता अभियान"राबविण्यात आले. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगर पालिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथजी पवार,नगर सेवक बाबु नायर ,भाजपा सावुथ सेल प्रदेशअध्यक्ष राजेशजी पिल्ले , स्वीक्रुत नगर सदस्या सौ वैशाली खाडे ,सौ अक्षता पाताडे , सौ गायत्री सावंत.गीतांजली मोडक, नंदिनी जोगदंड , सौ मिराताई वाघमारे ,मनाली पाताडे , भुषण चव्हाण , भावेन पाठक , अरुण सदानंद यादव , सचीन देवकुळे , सुभाष पाठक , सचीन शिंदे ,विनोद पटिल ,यशवंत दनाणे, बाळा गुरव , दिपक सावंत , सुरेंद्र घाणेकर , राजकुमार दणाणे प्रशांत जाधव ,यश काजुल्कर , ओमकार सावंत , भाविक पाताडे , ओमकार आयरे व ईत्तर वॉकिंग ग्रुप चे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला .

यावेळी स्थानिक आरोग्य विभागानेही योग्य ते सहकार्य केले.

कार्यक्रमाचे नियोजन मंडलअध्यक्ष अजय पाताडे यांनी केले .यावेळी आण्णा साहेब मगर स्टेडियममधील सर्व परिसराची साफ सफाई करण्यात आली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!