व्हीएस न्युज - प्रभाग क्र २७ काळेवाडी राहटणीतील आदिनाथ कॉलनी येथील परिसरात पालिकेने चालु केलेल्या ड्रेनेज लाईनच्या दुरूस्तीचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना तिरोडा मतदार संघाचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी "ग" प्रभाग मुख्य अधिकारी (थेरगाव) सौ. झगडे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती.
या मागणीची दखल घेत ‘ग प्रभाग’ क्षेत्रीय प्रशासन अधिकारी यांनी स्थापत्य (ड्रेनेज दुरूस्ती) विभागाकडुन श्रीनगरमधील आदिनाथ कॉलनीमध्ये ड्रेनेज दुरूस्तीचे काम हाती घेउन पूर्ण केले आहे.
कामाच्या दिरंगाईमुळे कॉलनीतील महिला, जेष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थीं यांना मनस्ताप सहन करावा लागत होता, तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते व साथीच्या रोगांना आयतेच निमंत्रण मिळत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, शिवसेना तिरोडा मतदार संघाचे संपर्कप्रमुख युवराज दाखले, रहाटणी उपविभागप्रमुख प्रदिप दळवी, रहाटणी शाखा प्रमुख अंकुश कोळेकर आदींच्यावतीने प्रशासनाकडे पाठपुरावा चालू होता. प्रशासनाने प्रभागातील ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ पूर्ण न केल्यास, खोदकाम केलेल्या जागी वृक्षारोपण करू असा इशारा देण्यात आला होता.
त्यामुळे शिवसेनेच्या मागणीची दखल घेत ‘ग प्रभाग’ अधिकारी’ सौ. झगडे यांनी प्रशासनाच्या माध्यमातून या परिसरातील काम पूर्ण केले आहे.
परिसरातील नागरिकांच्या वतीने युवराज दाखले आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांका पालिका प्रशासनाचे आणि ‘ग प्रभाग’ अधिकारी’ सौ. झगडे यांचे आभार मानले असून, केलेल्या कामाचे समाधान व्यक्त केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002