Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
भोसरी - दिड लाखांच्या खंडणीसाठी केला स्वत:च्या अपहरणाचा बणाव; तरुण ताब्यात.

व्हीएस न्युज - वडिलांकडून दिड लाख रुपये उकळण्यासाठी एका तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक आणि खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे.

याप्रकरणी विनय राजेंद्र चव्हाण (वय २२, रा. गंधर्वनगरी, तापकीरनगर, मोशी) या तरुणाला ताब्यात घेण्यात आला आहे. त्याचे वडिल राजेंद्र किसन चव्हाण (वय ५३) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२८ नोव्हेंबर) सायंकाळी पावनेसहाच्या सुमारास विनय चव्हाण या तरुणाने घरातून निघून जाऊन स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला. त्यानंतर वडिलांच्या मोबाईल नंबरवर हिंदी भाषेत मेसेज करुन अपहरण करता बोलत असल्याचे भासवून दीड लाख रुपयांची खंडणी मागली. तसेच पैसे न दिल्यास आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यास मुलाला मारुण टाकण्याची धमकी दिली. यावर विनय याचे वडिल राजेंद्र यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक आणि खंडणी विरोधी पथकाने एकत्रीतरित्या तपास चक्र फिरवत तांत्रिक माहितीच्या आधारे धमकीचा मेसेज आलेला मोबाईल नंबर ट्रेस केला. मोबाईलचे लोकेशन मुंबईतले दाखवत होते. त्याआधारे पोलीसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले त्यांनी सीएसटी रेल्वे स्थानकावर शोध घेत असता त्यांना विनय तेथे आढळून आला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांने स्वत:च अपहरणाचा बनाव रचल्याचे कबुल केले. तसेच रेल्वे प्रवासात एकाचा मोबाईल चोरुन त्याव्दारे वडिल राजेंद्र यांना मेसेज करुन धमकावल्याचेही सांगितले. पोलिसांनी विनय याला ताब्यात घेतले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडळ एखच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पोलीस उपनिरीक्षक चाटे, हवालदार रविंद्र तिटकारे, लिंभोरे, दिपक महाजन, स्वप्नील लांडगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कलाटे, नवनाथ पोटे, करन विश्वासे, विशाल काळे, तसेच खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार महेश खांडे, काटकर, सागर शेंडगे, पुलगम यांच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड : भोसरी पोलिसांकडून दुचाकी चोरास अटक ; ३३ दुचाक्या जप्त

व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातून दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या चोरट्याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या एकूण ३३ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. सुभाष आसाराम तौर (वय २५, रा. माऊली कृपा निवास, वडगाव रोड, आळंदी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची दुचाकी विक्रीसाठी एकजण भोसरीत येणार असल्याची पोलिस हवालदार उत्तम कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा राहून आरोपी सुभाष याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरची दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून तब्बल ३३ वाहने चोरल्याचे सांगितले.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे, उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस कर्मचारी उत्तम कदम, जी. एन. हिंगे, एस. देवकर एस. एल. रासकर, एस. बी. महाडिक, एस. वाय, भोसले, बी. व्ही. विधाते, व्ही. डी. गाडेकर, फुले, ए. एम. गोपी सी.एस. साळवे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

...Read More

V. S. News
मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

व्हीएस न्युज - पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने गरीब मुला-मुलींच्या वस्ती शाळेत महात्मा फुले यांची १२४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. वक्ते म्हणून प्रा. संपत गर्जे यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे महाराष्ट्रातील एक कृतीशील थोर समाजसुधारक व क्रांतिकारक विचारवंत होते. समाजजीवनातील पारंपरिक जुन्या चालीरीती, वर्णव्यवस्था व गुलामगिरी यांच्याविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करुन त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची कल्पना समाजाला समजावून सांगितली. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे कार्य अनमोल आहे. शेतकरी,शेतमजूर इत्यादींच्या जीर्णोध्दारांच्या कार्यासाठी या उभयतांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रचला.

याप्रसंगी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक/अध्यक्ष अरुण पवार, नगरसेवक गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते वामन भरगंडे, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे, शिवाजी सुतार, नवेश पाटील, बाळासाहेब साळुंके, अभिमन्यु गाडेकर, माधव मनोरे, मारुती बानेवार, विजय देवकर, संपत गर्जे, सखाराम जोशी, दिनेश गाडेकर, कृष्णाजी खडसे, श्री. कुंदे सर, श्रीनिवास पानसरे, सुनील शिंदे, नामदेव गुट्टे, राजेश गाटे, गोटके व्ही.एल, बाळासाहेब चितळकर, नारायण वळसे, शंकर तांबे, चव्हाण पी.एल, पी.जी.तोरवणे आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
पुणे - पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग

व्हीएस न्युज - पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग भडकली आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त झोपडया या आगीत जळून खाक झाल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या ४० गाडया आग विझण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. झोपडपट्टीतील क्रमांक ३ च्या गल्लीमध्ये दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली. आगीचे रौद्ररुप पाहता पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातून अग्निशमन दलाच्या गाडया मागवाव्या लागल्या.

दोन दिवसांपूर्वी पाच नंबर गल्लीमध्ये आग लागली होती तेव्हा दोन घरे जळाली होती. झोपडीतील सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. सहा वर्षापूर्वी देखील अशीच घटना याच ठिकाणी घडली होती. पाटील इस्टेट झोपडपट्टीत जवळपास ४०० घर आहेत. संपूर्ण झोपडपट्टी रिकामी करण्यात आल्याची माहिती आहे.

पुणे-मुंबई मार्गावर ही पाटील इस्टेट झोपडपट्टी आहे. सहा ते सात सिलेंडरचे स्फोट झाल्यामुळे आग आणखी भडकली. धुराचे मोठ मोठे लोट आकाशाच्या दिशेने उठताना दिसत आहेत. आग अधिक पसरु नये यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जमलेल्या गर्दीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना काम करताना अडथळे येत आहेत. अग्निशमन दलाच्या वाहनांना झोपडपट्टीपर्यंत पोहोचण्यात अडथळे येऊ नये यासाठी वाहतूक रोखण्यात आली आहे. अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाला पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलीस घटनास्थळावरील गर्दीला आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.

...Read More

V. S. News
हॉकर्स धारकांचे आधी पुनर्वसन, मगच कारवाई …..अन्यथा…….. शिवशाही व्यापारी संघटना उभारणार जनआंदोलन!

व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील हॉकर्सधारकांवर कारवाईचे सत्र चालू आहे. या सर्व पात्र हॉकर्स धारकांचे सुरुवातीस पुनर्वसन करावे, मगच या हॉकर्सधारकांवर कारवाई करण्याची मागणी, शिवशाही व्यापारीसंघाच्यावतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड शहरात दाखल झालेल्या हॉकर्स धारकांना उपजिवीकेपोटी छोटे छोटे व्यवसाय करावे लागतात. अशा वेळी महापालिकेने त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असताना, त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचा उद्योग महानगरपालिका करीत आहे.

महानगरपालिकेने हा उद्योग बंद न केल्यास, आगामी काळात हॉकर्सधारकांच्या वतीने शिवशाही व्यापारी संघटना मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचे, शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी सांगितले आहे.

...Read More

V. S. News
पिंपळे गुरवमध्ये भरते गरिबांच्या मुलांसाठी वस्ती शाळा

व्हीएस न्युज - पिंपळे गुरवमधील सृष्टी चौकाकडून भवानी मंदिराकडे जाताना रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये वस्तीतील गरिब मुलांची भरलेली शाळा नजरेस पडते. हसतमुख मुले-मुली हातात कोरी पाटी घेऊन शिक्षणाचे धडे गिरविताना दिसून येतात. बालकांना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतू त्या योजना हातावर पोट असणाऱ्या गरिबांपर्यंत पोहोचताना दिसून येत नाहीत. म्हणूनच गरिबांच्या मुलांना शिकता यावे, यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने पिंपळे गुरव येथे वस्ती शाळा सुरू करण्यात आली आहे.

या शाळेत कोणतेही वर्ग नाहीत, बसायला बाक नाहीत, परीक्षा घेणे-उत्तीर्ण करणे-पुढच्या वर्गात प्रमोट करणे असलाही प्रकार नाही; येथे फक्त पैशांअभावी अज्ञानाचा अंधार पसरलेल्या गरिबांच्या घरात ज्ञानाचा दिवा पेटविण्याचे कार्य चालते. तेही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. आज प्रत्येकजण उच्च शिक्षण घेऊन आपल्या करियरच्या वाटा निवडून पैसे कमविण्याचे स्वप्न पाहतो. परंतू आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा खर्‍या अर्थाने समाजासाठी व्हावा, म्हणून गरिबांच्या मुला-मुलींना शिकविण्याचा विचार सहसा कोणी करीत नाही. रस्त्यावरच्या कुटूंबांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे मुलांचे शिक्षण घेणे तर अवघडच ... म्हणूनच आपण केलेल्या शिक्षणाचा उपयोग योग्य रितीने व्हावा, या कल्पनेतून त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्याचा विडा मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी उचलला आहे.

मराठवाडा जनविकास संघाने उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या शाळेत जवळपास 50 मुले-मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये बांधकाम मजुरांची, करचावेचक कामगारांची मुले-मुली शिकत आहेत.

आपण आतापर्यंत छोटी-मोठी मजुरीची कामे करून हातावर पोट भरवित आलो आहोत, त्याचप्रमाणे आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवून खर्च करण्यापेक्षा त्यांनीही छोटी-मोठी कामे करून आर्थिक हातभार लावावा, अशी अपेक्षा प्रत्येक पालकांकडून व्यक्त करण्यात येते. परंतू त्यांच्या मुलांनी जर शिक्षण घेतले, तर आणखी चांगल्या ठिकाणी नोकरी करून पैसा कमवू शकतील, हा विचार या वस्तीत राहणार्‍या पालकांच्या गळी उतरविण्यासाठी आदिती निकम ही तरुणी दारोदारी भटकून शिक्षणाचा प्रसार करीत आहे. या शाळेत मुलांना फक्त अक्षरी धडे दिले जात नाहीत, तर त्यांचे राहणीमान लक्षात घेता आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी यासोबत त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षणही दिले जाते. मुलांमधील बहुआयामीपणा-कौशल्यबहुलता यांचा विकास समांतरपणे कसा साधता येईल, मुलांना ‘माणसे’ बनण्याचे आणि ‘माणसे’ म्हणून आत्मविश्वासाने जगण्याचे बळ कसे देता येईल, त्यांच्यात सर्वांशी मिळूनमिसळून राहण्याचा संस्कार कसा रुजवता येईल, असे अनेक प्रयोग तेथे चालू आहेत, असे आदिती निकम सांगतात.

या मुलांना शिकविण्यासाठी त्यांच्याकडे शैक्षणिक साहित्यही उपलब्ध असणे गरजेेचे आहे, हे लक्षात अरुण पवार स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून प्रत्येक मुलाला शैक्षणिक साहित्य पुरवतात. तसेच कधी कधी तर सर्व मुलांच्या न्याहरीची ही व्यवस्था करीत असतात. या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरविण्याची उत्सुकता ही आहेच, यातील विद्यार्थी हुशार देखील आहेत. या विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व सोयसुविधा मिळाल्या, तर ते भविष्यात चांगले करियर घडवतील, असा विश्‍वास अरुण पवार यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य आदिती निकम भरभरून मदत करीत आहेत. वामन भरगंडे, सखाराम वाळकोळी, कृष्णाजी खडसे, कृष्णाजी फिरके, संपत गर्जे आदीनी खारीचा वाटा उचलत अरुण पवार व आदिती निकम यांना मदत करीत आहेत.

...Read More

V. S. News
मुंबईच्या पीएसआयची पुण्यात संगम पुलाजवळ रेल्वेखाली आत्महत्या

व्हिएस न्युज - मुंबई पोलिसांच्या सेवेत असणाऱ्या एका पोलीस उपनिरिक्षकाने पुण्यातील संगम पुलाजवळील धावत्या रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, साजन सानप असे या आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरिक्षकाचे नाव आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथील अंबोली पोलीस ठाण्यात तो कार्यरत होता. एक महिन्यापूर्वीच खात्यातील अंतर्गत परिक्षेद्वारे त्याची हवालदार पदावरुन उपनिरिक्षक पदावर बढती झाली होती.

दरम्यान, सानप दोन दिवसांपूर्वी गावी नाशिकला गेला होता. येथे उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात एका महिलेने बलात्कार आणि अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीसांनी त्याला अटक करुन कोठडीत ठेवले होते.

दरम्यान, कोठडीतून तो पळून गेला आणि थेट पुण्यात दाखल झाला. दरम्यान, आज त्याने पुण्यातील संगम पुलाजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. नाशिकमध्ये सानपविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, ‘सानप आणि त्याचे मित्र आपल्याला सातत्याने त्रास देत होते. सानपने आपल्यावर अनेकदा बलात्कारही केला आहे. त्याने माझ्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकीही दिली होती.’ त्यामुळे सानपवर भादंवि कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

...Read More

V. S. News
पिंपरी न्यायालयात संविधान दिन साजरा

व्हीएस न्युज - संविधानामुळेच केवळ आपल्याला हक्क व अधिकार प्राप्त झाले. त्याआधारे आपण आपले जीवन जगले पाहिजे, असे मत अॅड. सतीश गोरडे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अॅड. विजय भोसले, अॅड. सुजाता बिडकर, अॅड. नाना रसाळ, अॅड. मुकुंद ओव्हाळ, अॅड. मोनिका सचवाणी, अॅड. संतोष मोरे, अॅड. महेश टेमगिरे, अॅड. रामचंद्र बोराटे आदी उपस्थित होते.

अॅड. पी. एस. कांबळे म्हणाले की, देशाचे संविधान हाच आपला अभिमान असून त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्य घटनेची प्रत माजी अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे यांनी पिंपरी चिंचवड बारचे अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर यांना देण्यात आले.

यावेळी अॅड. स्मिता लांडे, अॅड. गोरख कुंभार. अॅड. सुनील कड, अॅड. योगेश थांबा, अॅड. किरण पवार, अॅड. आतिश लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी अॅड. मनीषा महाजन, अॅड. किरण पवार, अॅड. सुनील कड, अॅड. आतिश लांडगे, अॅड. सुनील माने, अॅड. पी. एस. कांबळे, अॅड. जिजाबा काळभोर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी 26/11 मधील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. गोरख कुंभार यांनी केले. स्मिता लांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

...Read More

V. S. News
रावेत येथील कारमध्ये आढळला दोघांचा मृतदेह; आत्महत्येचा संशय

व्हीएस न्युज - रावेत येथील कारमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२२) रात्री साडेआठच्या सुमारास कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील सेंटोसा हॉटेल जवळून उघडकीस आली.

अमोल रविंद्र शितोळे (वय ३०, रा. कासारसाई) आणि अनुपमा नवनाथ कारंडे ( वय ४१, रा. वाकड) अशी मयत दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास रावेतजवळील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील सेंटोसा हॉटेल समोरील एका कारमध्ये अमोल आणि अनुपमा या दोघांचे मृतदेह आढळून आले.

दोघांनी विष पिऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नाही. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
हिंजवडी - १ किलो ६६० ग्रॅम वजनाच्या गांजासह तरुणीला अटक

व्हीएस न्युज - विक्रीसाठी आणलेला २२ हजार ६५० रुपये किमतीचा एकूण १ किलो ६६० ग्रॅम वजनाच्या गांजासह एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील कोयते वस्तीकडून काटे वस्तीके जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.

जुबेर मौला अत्तार (वय २९, रा. संदिप गायकवाड यांची चाळ, माळवडी, पुनवळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विक्री विरोधात कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेकडी अंमली पदार्थ विरोधी पथक हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील कोयते वस्तीकडून काटे वस्तीके जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे. यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी स्टाफसह त्या ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी जुबेर अत्तार नावाचा तरुण संशयीतरित्या हातात पिशवी घेऊन उभा असलेला दिसून आला.

पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळीला पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये २२ हजार ६५० रुपये किमतीचा एकूण १ किलो ६६० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन आरोपी जुबेर अत्तार याला अटक केली. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला हिंजवडी पोलीसांच्या ताब्यात दिले. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, वसंत मुळे, पोलीस हवालदार प्रदिप शेलार, राजन महाडीक, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, प्रसाद जंगीलवाड, दादा धस, अशोक गारगोटे, प्रदिप गुट्टे, पांडुरंग फुंदे यांच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
पिंपरीतील ५ सराईत गुन्हेगार तडीपार

व्हीएस न्युज - पिंपरीत गंभीर गुन्हे नावांवर असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली.

शक्ती रामरतन बहोत (वय ३०, रा. सेनेट्री चाळ, पिंपरी) विशाल बबन गायकवाड (वय २२, रा. गिरजुबाबा मंदिरामागे, बौध्दनगर) मनोहर मारूती सुर्वे (वय रा. पत्राशेड, लिंकरोड), जिंतेद्र सावळाराम शिंदे (वय ३०, रा. भिमनगर, पत्राशेड पिंपरी) लक्ष्मण बाळू शिंदे (वय ३३, रा. वसंतदादा पाटील शाळेसमोर नेहरूनगर, पिंपरी) अशी तडीपारीची कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नांवे आहेत.

वरील सर्व गुन्हेगार सराईत असून त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, इतर काही गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी सांगितले.

दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या पिंपरी पोलीस ठाण्यात नियुक्तीमुळे पोलीस कर्मचारी, सामाजिक, राजकिय, क्षेत्रातील लोकांमध्ये चैतन्य पहावयास मिळत असुन नागरिकांकडुन चांगला अधिकारी मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

...Read More

V. S. News
अजमेरा- दुकानाचे शटर उचकटून सव्वादोन लाखांची रोकड चोरट्यांनी केली लंपास

व्हीएस न्युज - कपड्याचे दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील गल्ल्यामध्ये ठेवलेले तब्बल २ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरु नेली.ही घटना शुक्रवार (दि.२३) रात्री १० ते शनिवार (दि.२४) सकाळी साडेसातच्या दरम्यान अजमेरा "जे" सेक्टर शॉप नं.१ येथील वैष्णवी कलेक्शन या कपड्याच्या दुकानात घडली.

याप्रकरणी दुकानदार संभाजी धनराज मोरे (वय ३६, रा. वास्तु उद्योग कॉलनी १०/४ अजमेरा, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार,अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोरे यांचे अजमेरा जे सेक्टर येथे वैष्णवी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ते दुकानाला कुलूप लावून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातली गल्ल्यामध्ये ठेवलेले तब्बल २ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरु नेली.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!