Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
वर्गणी मागणाऱ्या तीन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा

व्हीएस न्युज - लघुउद्योजकांकडे जबरदस्तीने पाच हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या गणपती मंडळाच्या तीन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी भोसरी एमआयडीसी येथे घडली. जावेद पठाण (रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) आणि त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हलागौडा शिवलिंग ओंकार (वय ४३, रा. दुर्गा निवास इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी व त्याचे साथीदार हे फिर्यादी हलागौडा यांच्या भोसरी एमआयडीसी येथील साई इंजिनीअरिंग या कंपनीत आले. त्यांनी ‘क्रांतीवीर तरुण मित्र मंडळ’ असे नाव लिहिलेली पाच हजार रुपयांची पावती जबरदस्तीने फिर्यादी हलागौडा यांना दिली. तसेच पैसे नेण्यासाठी नंतर येतो, असे सांगून जर वर्गणी दिली नाही तर पाहून घेतो, अशी धमकी दिली. दोन महिन्यांपूर्वी मीच तुम्हाला मारले होते, ओळखले ना? असे म्हणून शिवीगाळ करून पुन्हा धमकी देऊन आरोपी निघून गेले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे करीत आहेत.

...Read More

V. S. News
पिंपरी येथून मातोश्री सामाजिक संस्थेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; पिंपरीला परतताना ट्रक कलंडला.

व्हीएस न्युज - कोल्हापूर, सांगली या महाराष्ट्रातील दोन सधन जिल्ह्यांना प्रलयकारी महापुराचा तडाखा बसला असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत शेतीचे तसेच जनावरांचे, प्रापंचिक साहित्याचे आतोनात नुकसान झाले आहे. देशात कोठेही आपत्ती ओढवली तर, सढळ हाताने मदत करणाऱ्या या दोन्ही जिल्ह्यांना आज मदतीची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील तांदुळवाडी,घोटावळे , फूलेवाडी ,वाघूर्डे ,दोनवडे या गावांमध्ये तसेच माने हाॅल येथे पूरात बेघर झालेल्या बांधवांनसाठी पिंपरी येथील मातोश्री संस्थांचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यंनी मदतीचा हात पुढे केला आहे.

यामध्ये पूरग्रस्त कुटुंबाला लागणाऱ्या सर्वे खाद्य वस्तू बरोबर पाण्याच्या बाटल्या,टूथपेस्ट,ब्रश,साबण,भांडी,कपडे, पांघरणे, बेडसीट, चादर या सर्व वस्तू पूरबाधितांची प्रत्यक्ष भेट घेऊन देण्यात आल्या.

पूर्गग्रस्तांसाठी मदतीस गेलेल्या मातोश्री संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोल्हापूर पासून ६५ किलो मिटर अंतरावर असणाऱ्या तांदुळवाडी गावाजवळील रस्त्यावर पिंपरी येथून नेलेल्या मालवाहतूक ट्रॅक रस्ता काच्चा असल्यामुळे कलंडला असल्यामुळे दुर्घटनेला सामोरे जावे लागले. अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

गणेश आहेर यांनी दिलेल्या माहितनुसार ट्रॅक बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांची मोठी मदत लाभली, जे.सी.बी च्या साहाय्याने ट्रक बाहेर कडण्यात आला. धीर आणि जिद्द न सोडता घेतलेला वसा पूर्ण करूनच घरी परतलो असल्याची माहिती गणेश आहेर यांनी दिली.

यावेळी तांदूळवाडी गावचे सरपंच सिध्दार्थ कांबळे,वाघूर्डे गावचे कृष्णाकांत शिक्रे (उपतालूका प्रमूख, शिवसेना) गावातील सरपंच संगिता पाटील,पोलीस पाटील,खंडू शिरसाठ,दिपक कांबळे,प्रकाश झा,रविकिरण घटकार. गोरख पाटील,प्रदिप दळवी,नरसिंग माने, सचिन जाधव, अकूंश कोळेकर, माऊली जाधव,दत्ता गिरी,बाळासाहेब गायकवाड,मारूती म्हस्के,निलेश भोरे,छञपती यूवा प्रतिष्ठाण काळेवाडी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्यावतीने कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त भागात वैद्यकीयआरोग्य पथक रवाना

व्हीएस न्यूज - पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्यावतीने कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त भागात वैद्यकीय आरोग्य पथक रवाना करण्यात आले आहे. कोल्हापूर व सांगली या दोन भागासाठी दोन वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व सेवासुविधांनी युक्त रुग्णवाहिका,डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, दहा लाखांहून अधिक किमतीची आवश्यक औषधे तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय साहित्य, व उपकरणांचा यात समावेश आहे.

यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा मा. भाग्यश्रीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच चव्हाण उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ट्रस्टी डॉ स्मिता जाधव, कोशाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही वैद्यकीय आरोग्य पथके कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त भागात पाठविण्यात अली आहे.

...Read More

V. S. News
मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

व्हीएस न्युज - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानच्या सैन्याला नेस्तनाबूत करून भारतीय सैनिकांनी विजय संपादन केल्याचा दिन म्हणजे कारगिल विजय दिन उत्साहात साजरा आला. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड शहर तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अमर जवान स्तंभाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कारगील युद्धाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. सर्व उपस्थितांनी सर्व जवानांच्या शौर्याला सलाम केला. मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.दामोदर पतंगे, डॉ दामोदर पतंगे प्राचार्य गोरख घोडके, प्रा. अभयकुमार हिरास, भूगोल फाउंडेशन अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव वाळूंज, शंकर तांबे, प्रकाश इंगोले, शिवलाल कांबले, प्रीती काळे, समाजप्रबोधनकार शारदा मुंढे, साहेबराव गावडे, डी.एस. राठोड, राजेंद्र मोरे, शशिकांत दुधारे, रमेश जाधव, शिवलाल काबळे, आण्णा जोगदंड, तसेच भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ, संत गाडगे बाबा जेष्ठ नागरिक संघ, मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न झाल्यानंतरचे पहिलेच युध्द होते. हिंदुस्थानी सैन्याने आपल्या प्राणाची बाजी लावून व साहसाचे प्रदर्शन करीत अति उंचावरच्या लढाईत भारताच्या अजेय शक्तीचे जगाला दर्शन घडविले. दक्ष राहण्याचा निश्चय हीच त्या संग्रामातील हुतात्मांना आदरांजली आहे, असे डॉ. दामोदर पतंगे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव सूर्यकांत कुरुलकर यांनी, तर आभार प्रकाश इंगोले यांनी मानले.

...Read More

V. S. News
हृदयातील ८.६ सेमीची गाठ (ट्युमर) काढण्यात यश; डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाची यशस्वी कामगीरी.

व्हीएस न्युज - डॉ. डी. वाय पाटील रुग्णालय, पिंपरी, पुणे येथील हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या (CVTS) शस्त्रक्रिया विभागाच्या टीमने हृदयामधील ८.६ सेमीची गाठ (ट्युमर) यशस्वी रित्या बाहेर काढली. शस्त्रक्रियेच्या दोन दिवस आधी ७४ वर्षीय महिलेले अचानक दम लागल्याने व श्वास घेताना त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयाच्या आपत्कालीन विभाग दाखल करण्यात आले, लगेच सर्व तपासण्या करण्यात आल्या त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरले होते तसेच हृदयामधील असणाऱ्या चार कप्प्यामधील एका कप्प्यात गाठ (ट्युमर) असल्याचे दिसून आले. तसेच हृदयाची एक झडप कार्यकरत नव्हती. हृदयामधील गाठ आणि बंद पडलेली हृदयाची झडप, फुफ्फुसांमधील पाणी यामुळे रुग्णाचा जीव जाण्याचा धोका अधिक होता.

रुग्णालयाच्या डॉक्टर्स टीमने तातडीने मेरॉथॉन सर्जरी करण्यात आली यामध्ये (Heart lung Machine) हृदयाचे कार्य चालविणाऱ्या मशीनवर रुग्ण ठेऊन पूर्णपणे हृदय बंद करून हृदयवर शस्त्रक्रिया करून ही गाठ बाहेर काढली सोबतच हृदयाची झडप पुन्हा कार्यरत करण्यात यश आले. शस्त्रक्रिया पूर्ण होण्यास ६ तासांचा अवधी लागला. शस्त्रक्रियेनंतर दोनतासांनी रुग्णाला जीवनरक्षक प्रणाली व्हेंटिलेटर वरून बाहेर काढले. रुग्ण महिलेची ताबेत आता स्थिर आहे. त्यांच्यावर योग्यते औषधोपचार सुरु आहेत. या शस्त्रक्रियेत विभागप्रमुख डॉ. अनुराग गर्ग, डॉ. आशिष डोळस, डॉ. स्मृती हिंदारिया, डॉ. रणजित पवार, भूल तज्ञ् डॉ. विपुल शर्मा, डॉ. संदीप जुनघरे यांचा सहभाग होता. सदर रुग्ण महिलेवर केली गेलेली शस्त्रक्रिया व उपचार हे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात आले आहे.

या आगोदर दोन महिन्यापूर्वी सहा महिन्याच्या बाळावर अश्याच प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यावेळी २.५ सेमीची गाठ काढण्यात आली होती अशी माहिती विभाग प्रमुख डॉ अनुराग गर्ग यांनी दिली ते म्हणाले या विभागाने आतापर्यंत ४०० हुन अधिक हृदय संदर्भातील शस्त्रक्रिया केल्याअसून त्यापैकी ९० टक्के शस्त्रक्रिया या मोफत करण्यात आल्या आहेत यामध्ये २३ दिवसांच्या बाळापासून ते ८७ वर्षीय वृद्ध रुग्णांचा समावेश आहे. या यशस्वी कामगिरीबाबत डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाच्या टीमचे कुलपती डॉ. पी. डी पाटील व उपाध्यक्षा भाग्यश्रीताई पाटील यांनी कौतुक केले आहे.

...Read More

V. S. News
पुणे : पत्रकार भवन येथे तारा मोबाईल क्रेशेस या संस्थे तर्फे बांधकाम मजुरांच्या मुलांचा कौतुक सोहळा संपन्न.

व्हीएस न्युज - पुणे येथे कार्यरत तारा मोबाईल क्रेशेस हि संस्था बांधकाम मजुरांच्या शिक्षणा पासून वंचित असणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी गेले ३५ वर्ष विविध प्रकारे साहाय्य करत आहे . त्यापैकी ३७ मुलांनी २०१८ - २०१९ या कालावधी मध्ये इयत्ता १० वी , १२ वी, व त्या पुढील शिक्षण पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले. तारा मोबाईल क्रेशेस या संस्थेने (दि.२०) पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या कौतुक सोहळ्यामध्येे या मुलांनी स्वतःच्या शब्दांमध्ये आव्हानाची यशोगाथा मांडली.

संस्थेची नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या साहाय्याने या मुलांचे भविष्य उज्वल करण्याची वाटचाल चालू आहे. या मुलांन मध्ये संधीचं सोन करण्याची जिद्द, स्वीकारलेलं आव्हान पूर्ण करण्याचा आत्मविश्वास आणि आव्हान पूर्ण करण्यासाठी लागणारी चिकाटी त्यांनी मांडलेल्या पॅनल डिस्कशन मधून स्पष्ट दिसून आली.

यावेळी या मुलांनी त्याच्या पालकांच्या व्यवसायामुळे होणाऱ्या स्थलांतरामुळे त्याच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी आणि अभ्यासापासून लक्ष विचलित करणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात या संदर्भात सर्वांपुढे आपली मते मांडली.

मुलांबरोबर पॅनल डिस्कशन मध्ये मुलांचे पालक, लेबर कँम्प मधील कॉम्युनिटीचे प्रतिनिधित्व करणारे सपोर्ट ग्रुप मेंबर्स , युवक गट या सर्वानी बांधकाम मजुरांची बाजू मांडताना पालक, युवक आणि कम्युनिटी प्रतिनिधी म्हणून ते कसे सहकार्य करीत आहेत आणि त्यात मुलांना शाळा प्रवेश, वैद्यकीय उपचार करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली मात या समस्यांना सर्वांपुढे मांडले.

या कौतुक सोहळ्यास, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले. आयुष्य संदर आहे आणि यशाचे मार्गही भरपूर आहेत. आयष्यातील निर्णय घेताना आणि आयुष्य व व्यवसाय यांचा मिलाप करताना काळजीपूर्वक असाच व्यवसाय निवडावा कि, ज्याची आपल्याला आवड आहे. हे निवडताना स्वतःचा शोध कसा घ्यायचा, बदलत्या जगातील उपलब्ध संधी आणि प्रत्येक कामाचे महत्व आणि त्या कामातील गुणवत्तेचे महत्व यावर काही यशाचे मंत्र दिले. पुढे जाऊन त्यांनी मुलांना मदतीचा हात पुढे करत असेही सांगितले कि आयुष्यात पुढे जाताना ५ गोष्टी कधीही करायच्या नाहीत, त्या म्हणजे, अंधविश्वास भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, जातीयवाद आणि आत्महत्या. संस्थेच्या प्रयत्नाचे कौतुक करताना ते म्हणाले कि समाजातील गरजूपर्यंत सामाजिक संस्था पोचताना दिसतात जिथे शासन कमी पडते .

या कार्यमास प्रशांत कोठाडिया, यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित केले गेले. बदलत्या समाजामधील शिक्षणाची वाट निवडताना पालक, शिक्षण तज्ञ् , व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांना कालानुरूप बदलणे गरजेचे आहे. आपले शिक्षण हे पारंपरिक पठडीतून बाहेर येऊन अध्ययन, अभियक्ती आणि सृजनशील करण्यासाठी त्यांनी सर्वाना आव्हान केले. मुलांना भावी आयुष्यात पुढे जाताना आणि शुभेच्छा देताना, शिक्षण, शिकलेल्या कौशल्याचा भविष्यात वापर, संवाद कौशल्य, विश्लेषण कौशल्य, सृजनशील विचार, यावर प्रभुत्व मिळविणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने बेहेरे अँड राठी ग्रुप तर्फे, राम कुमार राठी, नाईकनवरे डेव्हलप्सर्स यांच्या वतीने राम कदम, आणि रोहन बिल्डर्स यांच्या वतीने शिला म्हस्के हे मान्यवर म्हणून उपस्थिती लाभलीे. रामकुमार राठी यांनी समस्त मान्यवर आणि उपस्थितांना आपल्या भाष्यातून तारा मोबाईल क्रेशेस च्या सुरवातीच्या काळात घेऊन जाऊन, झालेल्या मुलांच्या आयुष्यातील बदलांचे श्रेय हे संस्थेला दिले. तसेच संधी मिळाली तर हीच मुले मजुरांपासून कुठपर्यंत जाऊ शकतात आणि त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी संवेदनशील राहून त्यांना सहकार्य करावे असे आव्हान केले. या मुलांना संधी देणे हि बांधकाम व्यावसायीक म्हणून आपली जबाबदारी आहे हेही सांगितले.

रामकुमार राठी पुढे गुरुदक्षिणा विषयी बोलताना मुलांना म्हणाले की " सर्व मुलांनी शिकून आयुष्यात अशसवी व्हावा आणि आपले आयुष्य अशस्वी करायला जशी मदत मिळाली तशी मदत आपणही दुसऱ्यांना करावी ,ही केलेली मदत हीच गुरुदक्षिणा."

बांधकाम साईटवर राहणाऱ्या मुलांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी तारा मोबाईल क्रेशेस संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात व त्यातून अनेक संधी उपलब्ध करून दिली जाते. मुलांना सरकारी शाळांमध्ये दाखल करण्यापासून, वैयक्तिक मार्गदर्शन, अध्ययनासाठी विविध संधी ते अर्थसहाय्या पर्यंत सर्वच बाजूने संस्था या मुलांच्या पाठीशी ऊभी राहते. तसेच संस्थेतर्फे मुलांना विकासाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. बिकट परिस्थिती आणि आर्थिक चणचणीस सतत संघर्ष करणाऱ्या निवडक मुलांना संस्था नामांकित वसतिगृहात प्रवेश मिळवून त्याचा सर्व खर्चही देणगीदारांच्या मदतीने करून त्यांचे शिक्षणात सातत्य राखण्याचा प्रयत्न करीत आहे. संस्थेच्या कामाची सुरवात पाय भरणीच्या काळात सुरु होते हे शास्त्रीय तत्वाच्या आधारावर संस्था शाळापूर्व संस्कार आणि अनुभवाची हि जोड लावत असल्याची संस्थेच्या माजी अध्यक्ष फ्रेनी तारापोर यांनी उपस्थितांना दिली .

...Read More

V. S. News
पिंपरी महापालिका कर्मचारी महासंघावर प्रशासकाची नेमणूक

व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करुन पुण्यातील श्रमिक संघाच्या उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. तसेच कर्मचारी संघटनेचा संपुर्ण ताबा आणि सर्व आर्थिक व्यवहार ताब्यात घेऊन प्रशासकांनी पुढील तीन महिन्यांत सभासदांची यादी तयार करावी, कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, असा आदेशही औद्योगिक न्यायालयाने दिला आहे.

कर्मचारी महासंघाचे खजिनदार तसेच वादी अंबर किसनराव चिंचवडे यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या मनमानी कारभाराविरोधात आपण ११ जून २०१८ रोजी कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर वेळोवेळी सुनावणी झाली. आपल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यावर कामगार आयुक्तांनी १ एप्रिल २०१९ रोजी या तक्रारींबाबत औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्याबाबत संमती पत्र दिले.

त्यानंतर ज्येष्ठ विधीज्ञ संतोष म्हस्के यांच्यामार्फत ३ मे २०१९ रोजी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन औद्योगिक न्यायालयाने कर्मचारी महासंघावर दैनंदिन कामकाज करण्यास मनाई करुन आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्याचा अंतरिम आदेश दिला या दाव्याव १८ जुलैरोजी अंतिम सुनावणी झाली. दोन्ही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून औद्योगिक न्यायालयाचे सदस्य एम. आर. कुंभार यांनी कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करण्याचे आदेश दिले. तसेच उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक केली. याबाबतचा चौकशी अहवाल औद्योगिक न्यायालयाकडे सादर करावा, असेही आदेशात नमूद आहे.

...Read More

V. S. News
पुणे सोलापूर रस्त्यावर कार आणि ट्रकची धडक, ९ जण जागीच ठार

व्हीएस न्युज - लोनी काळभोर वाक वस्ती येथे पुणे-सोलापूर मार्गावरट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील प्रवासी हे यवत येथील रहिवासी होते. हे सर्वजण रायगडला सहलीला गेले होते. सहलीवरून घरी परतत असताना लोणी काळभोर येथे काळाने या तरुणांवर झडप घातली.

पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास इर्टीका कार ही यवतच्या दिशेने जात होती. लोनी काळभोर वाक वस्ती येथे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधील दुभाजकावरून पलीकडच्या मार्गावर कार गेली. त्याच वेळेस शहराच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकने कारला सुमारे शंभर फूट फरफटत नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढणे अडचणीचे झाले होते. यामधील सर्व मृतदेह ही यवत परिसरातील रहिवासी आहेत. सर्वांना लोणी पोलिसांनी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असल्याची माहिती लोणी काळभोरचे सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

अपघातात मृत झालेल्यांची नावे:

शुभम रामदास भिसे (वय १९)

विशाल सुभाष यादव ( वय २०)

निखिल चंद्रकांत वाबळे (वय २०)

अक्षय चंद्रकांत शिगे ( वय २०)

ऋषिकेश गणेश यादव ( वय २०)

अक्षय भरत वायकर ( वय २२)

नूरमोहम्मद आबास दाया ( वय २२)

परवेज अशपाक आतार ( वय २१)

जुबेर अजीज मुलाणी (वय २१)

...Read More

V. S. News
लोकप्रतिनिधींबद्दल संशयाचे वातावरण तयार करणे हा चंद्रकांत पाटलांचा स्वभाव असून, त्याला औषध नाही - अजित पवार.

व्हीएस न्युज - 'लोकप्रतिनिधींबद्दल संशयाचे वातावरण तयार करण्यासाठी काही तरी बोलायचे, अशी सवयच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लागली आहे. त्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा त्यांना वर्षा बंगल्यावरच बोलावून घ्यावे. तेथे सीसीटीव्ही तसेच इतर सुविधाही असतात. तेथे बसून चर्चा करावी. परंतु, त्यांनी लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम थांबवावे,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

बालगंधर्व रंगमंदिरात गुरूजन पुरस्कारांच्या वितरणानंतर पवार यांनी माध्यमांशी बोलताना पाटील यांच्यावर टीका केली. 'पाटील हे वरिष्ठ नेते असून, एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. ते राज्य सरकारमधील मंत्री असून, विधान परिषदेतील नेते आहेत. लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज पसरविण्याचे काम त्यांनी थांबविले पाहिजे. काही गोष्टी राजकीयदृष्टीकोनातून बोलल्या जातात. परंतु, ते आता काहीही बोलत आहेत. त्यांच्या अशा बोलण्याने माध्यमांना खाद्य मिळते. त्यामुळे उलटसूलट बातम्या येतात. नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधीबद्दल उगाचच शंका निर्माण होते. आपला नेता आगळे-वेगळे करतोय का, असे वाटत राहते. परंतु, असे वागणे हा चंद्रकांत पाटलांचा स्वभाव असून, त्याला औषध नाही,' असा टोलाही पवार यांनी लगावला.

शिवसेनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चांचाही पवार यांनी समाचार घेतला. 'सरकार चालविणाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन कामे करायची असतात. कामे झाली नाही, तर अधिकाऱ्यांवर कारवाई करायची असते. मात्र, शिवसेनेचा तो वकूब नाही. सत्ताधारी मोर्चा काढत नाहीत. शिवसेनेला प्रश्न सोडवता येत नसल्याने मोर्चा काढण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातून आपण शेतकऱ्यांसाठी काही तरी करतोय, असे दाखविण्यात येत आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.

'विधानसभेत ज्या पक्षाकडे १४५ आमदार आहेत त्यांचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा केला असेल तरी आमदारांची संख्याच शेवटी महत्त्वाची असते,' असे पवार म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाबाबत पवार यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, 'प्रत्येक पक्ष्याच्या कार्यकर्त्याला आपआपली जागा मागण्याचा अधिकार असून, त्यादृष्टीने चर्चा होत आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा निर्णय हा वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरच होणार आहे,' असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाबाबत नोटीस बजावल्याचे बातम्यांमधूनच माझ्या वाचनात आले आहे. पक्ष्याची त्याबाबत रविवारी बैठक असून नेमके काय झाले आहे, हे त्याचवेळी समजेल. तसेच पक्ष्याचा राष्ट्रीय दर्जाबाबत नेमक्या कोणती त्रुटी राहिल्या आहेत, हे शोधून आयोगाच्या नोटिशीला उत्तर देण्यात येईल.

...Read More

V. S. News
भंगारमाफिया, माथाडीच्या गुंडगिरी आणि खंडणीखोरी मुळेच परदेशी कंपन्यांच्या काढता पाय - अजित पवार

व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढली आहे. चाकण, रांजणगावच्या औद्योगिक पट्टय़ातील खंडणीखोरी वाढल्याने परदेशी कंपन्या थांबायला तयार नाहीत. जागोजागी भंगारमाफिया तयार झाले आहेत. ही वाढलेली गुंडगिरी रोखण्यात सरकारला अपयश आल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगवीत केली.

राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पवार यांच्या उपस्थितीत झाली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, नगरसेवक दत्ता साने, भाऊसाहेब भोईर, नाना काटे आदी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले,की शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. नगरसेवकांवरील हल्ले वाढले आहेत. माथाडीच्या नावाखाली होणाऱ्या गुंडगिरीमुळे उद्योगधंदे चालवणे अवघड झाले आहे. भंगार मालाचे ठेके मिळवण्यासाठी मंत्रालयातून दूरध्वनी येत आहेत. सगळीकडेच गुंडगिरी वाढली आहे. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील सहभाग चिंताजनक आहे.

पिंपरी पालिकेचा कारभार चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. शहरहिताचे आणि जनहिताचे निर्णय होत नाहीत. कचऱ्याच्या निविदांचा घोळ घातल्याने हा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. १५-१५ दिवस कचरा उचलला जात नाही. शास्तीकराचा प्रश्न सुटल्याचा दावा खोटाच आहे. रेडझोनचा प्रश्न तसाच आहे. स्वच्छ भारत अभियानाचा नुसताच गाजावाजा असून सुंदर शहराची अवस्था वाईट शहरात करून ठेवली आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नाही.

पार्थच्या प्रश्नावर पवार भडकले

मावळ लोकसभेतील पराभवानंतर पार्थ पवार पुन्हा शहरात फिरकले नाहीत, पार्थचा पराभव पवार कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवार भडकले. पार्थपर्यंत तुमचा प्रश्न पोहोचवतो आणि त्याचे उत्तर तुम्हाला कळवतो, असे उत्तर देतानाच पार्थ एकटाच पराभूत झाला नाही. सर्व पराभूत उमेदवारांसाठी एकसारखेच दुख झाल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

...Read More

V. S. News
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां निर्मलाताई पुरंदरे प्रदीर्घ आजाराने निधन

व्हीएस न्युज - ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी गेली चार दशके काम केलेल्या ‘वनस्थळी’ संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां निर्मलाताई बळवंत पुरंदरे (वय ८६) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी, तर पुरंदरे प्रकाशनचे अमृत पुरंदरे, प्रसिद्ध गायिका-लेखिका माधुरी पुरंदरे आणि थिएटर अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या त्या मातोश्री होत. गेल्या काही वर्षांपासून निर्मलाताई आजारी होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या. शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

विद्यार्थी सहायक समिती आणि फ्रान्स मित्र मंडळाच्या माध्यमातून निर्मलाताई पुरंदरे यांनी मोलाचे योगदान दिले होते. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आदिशक्ती पुरस्कार आणि सावित्रीबाई पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

निर्मलाताई यांचा जन्म ५ जानेवारी १९३३ रोजी झाला. त्या माहेरच्या माजगावकर. ‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर आणि ‘राजहंस प्रकाशन’चे दिलीप माजगावकर यांच्या त्या भगिनी होत. पुरंदरे यांनी पुणे जिल्ह्य़ातील आयआयएम ट्रस्टच्या माध्यमातून फुलगाव येथे निराश्रित विद्यार्थ्यांसाठी बाल सदनाची स्थापना केली होती. गेल्या चार दशकांपासून अव्याहतपणे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांसाठी सर्वस्व देऊन झटणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.

वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी खेडय़ा-पाडय़ांतील अनेक हातांना एकत्र बांधले. मात्र, केवळ बालसदन किंवा बालवाडी निर्माण करून त्या थांबल्या नाहीत, तर तिथे शिकविण्यासाठी शिक्षिकासुद्धा तयार केल्या पाहिजेत, हे ओळखून त्यांनी तेथील महिलांसाठी सहा महिन्यांचा बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण वर्ग सुरू केला. त्यातूनच वनस्थळी संस्थेचे कार्य विस्तारले. तसेच हे प्रशिक्षण वर्गाचे जाळे विस्तारल.

त्यांच्या या कार्याची महती ग्रामीण भागांत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांला चांगलीच परिचित आहे. डॉ. अच्युतराव आपटे यांनी स्थापन केलेल्या विद्यार्थी सहायक समितीमध्ये निर्मलाताई सुरुवातीपासूनच सक्रिय होत्या. ग्रामीण भागातून मोठय़ा शहरांमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्यांची त्यांना जाणीव होती. स्नेहयात्रा हे त्यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक प्रसिद्ध आहे.

...Read More

V. S. News
कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ डी वाय पाटील मेडिकल महाविद्यालयाकडून सन्मान

व्हीएस न्युज - डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल महाविद्यालयातील अस्थीरोग व क्रीडा चिकित्सा (Sports Medicine) विभागाच्यावतीने क्रीडा चिकित्सा विषयक एक दिवसीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी २०१७- १८ चा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कॉमनवेल्थ गेम २०१७ चा सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू उत्कर्ष पंढरीनाथ काळे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे ट्रस्टी कोषाध्यक्ष डॉ यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, आर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्नल डॉ. दीप शर्मा, प्राध्यापिका डॉ. करुणा दत्ता, आदी उपस्थित होते.

कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांनी खडतर परिस्थितीतीवर मात करून कुस्तीला नवेस्थान निर्माण करून दिले. त्याच्या यशस्वी कारकीर्दीचा आढावा डॉ. डी. एस. भामरे विभाग प्रमुख क्रीडा चिकित्सा यांनी दिला. खेळाडूच्या आरोग्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या अस्थीरोग विभागामध्ये क्रीडा चिकित्सा बाह्यरुग्ण विभाग नुकताच सुरू करण्यात आला आहे. याचा फायदा खेळाडूना नक्कीच होईल. खेळाडूनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी केले. "

कुस्तीपटू उत्कर्ष काळे ने कुस्तीत केलेल्या यशस्वी कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याला पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आपले नाव जागतिक पातळीवर झळकत रोहो" असे अधिष्ठाता डॉ भवाळकर यांनी आपल्या मनोगतात म्हंटले.

सदर कार्यक्रम कुलपती डॉ. पी. डी. पाटील व उपाध्यक्षा भाग्यश्रीताई पाटील यांचा मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

क्रीडा चिकीत्सा विषयक परिसंवाद कार्यक्रमामध्ये खेळाडूचा आहार, व्यायाम, दिनचर्या, भौतिकोपचार, विविध व्याधी, दुखापती, विविध तपासण्या, योग्य उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना, परीक्षण, क्रीडा सराव आदी घटकांच्या माध्यमातून खेळाडूच्या आरोग्यासाठी आवश्यकते मार्गदर्शन व उपचार का गरजेचे आहेत आणि ते कोणकोणते या प्रमुख उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

विविध तज्ञानी यावेळी मार्गदर्शन केले यामध्ये क्रीडा चिकित्साशास्त्रची व्याप्ती विषयी – डॉ. डी. एस. भामरे, भोतिकोपचार पध्दती - डॉ बासू, खेळाडूचा ताणतणाव व तणावमुक्ती - डॉ आलोख देवधर, आहार मार्गदर्शन - डॉ. सुयश भंडारी, स्पोर्ट्स फिजियोलॉजी - कर्नल डॉ दीप शर्मा, स्पोर्ट्स ऍन्थ्रोपोमेट्री आणि बायोमेकॅनिक्स विषयक - डॉ उर्वशी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी डॉक्टर्स, आहार तज्ञ, भौतिकोपचार तज्ञ, सर्जन व भावी डॉक्टर्स विद्यार्थी असे एकूण १५५ सहभागीर्थी उपस्थित होते.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!